8 जानेवारी: जे तुम्हीं हरवूं शकत नाहीं ते मिळवां

Alethia4India
Alethia4India
8 जानेवारी: जे तुम्हीं हरवूं शकत नाहीं ते मिळवां
Loading
/

येशूनें त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटलें, “मनुष्यांना हें अशक्य आहे, परंतु देवाला नाहीं; ‘देवाला सर्व कांहीं शक्य आहे.”

(मार्क 10:27)

येथें जागतिक दर्जाचें ख्रिस्ती होण्यासाठीं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवार्ता प्रसाराच्या कामासाठीं स्वतःला समर्पित करण्यासाठीं येशूपासून दोन मोठ-मोठे उत्तेजनं आहेत. एक तर पाठवलेलें किंवा पाठवणारे म्हणून.

1. मनुष्यांना अशक्य असणारी प्रत्येक गोष्ट देवाला शक्य आहे (मार्क 10:27). मनानें कठोर असलेल्या पापीजनांचे मन-परिवर्तन हे देवाचे कार्य आहे आणि ते त्याच्या सार्वभौम योजनेनुसार होईलच. आपल्या दुर्बळपणामुळें आपल्याला घाबरण्याची किंवा खचून जाण्याची गरज नाहीं. युद्ध परमेश्वराचे आहे आणि तोंच विजय देईल.

2. ख्रिस्त आमच्या वतीनें काम करेल असें अभिवचन तो देतो, आणि तो आपल्यासाठीं अशा रीतीनें सर्वकांही असेल कीं, जेव्हां सुवार्तिक म्हणून आपलें जीवन संपेल, तेव्हां आपण खूप कांही त्याग केला आहें असें आपण म्हणूं शकणार नाहीं (मार्क 10:29-30).

जेव्हां आपण सुवर्तेचे मिशनरी या नात्यानें त्याचे नियम पाळतो तेव्हां आपल्याला समजून येतें कीं या कार्यामुळें उद्भवणारें वेदनादायक दुष्परिणाम हें सुद्धा आमच्या कल्याणासाठींच कार्य करतात. आपले आध्यात्मिक आरोग्य आणि आपला आनंद शंभरपटीने वाढतो. आणि जेव्हां आपण मरतो त्यावेळीं आपण खरें मरण मरत नाहीं. आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतें.

मीं तुम्हांला असें विनवित नाहीं कीं तुम्हीं ख्रिस्तासाठीं तुमचें धैर्य आणि बलिदान व्यर्थ लेखावें. मीं तुम्हांला इतकेंच विनवितों कीं तुम्हांकडे असलेल्या सर्व गोष्टींचा त्याग करा, म्हणजे तुम्हांला तुमच्या खोलवर असलेल्या आंतरिक इच्छांना तृप्त करणारे जीवन मिळेल. मीं तुम्हांला विनवितों कीं राजांचा जो राजा त्याच्या सेवेंसाठीं उभे राहण्याच्या श्रेष्ठत्वामुळें तुम्हीं सर्व गोष्टीं केरकचरा अशा लेखा. मीं तुम्हांला विनवितों कीं तुम्हीं दुकानांतून विकत घेतलेल्या तुमच्या चिंध्या काढून टाका आणि देवाच्या राजदूतांचे वस्त्र धारण करा.

तुमचा छळ आणि उपासमार होईल याची मीं तुम्हांला खात्री देतो- परंतु त्यानंतर येणारा आनंद लक्षात ठेवा! “नीतिमत्त्वाकरितां ज्यांचा छळ झाला आहें ते धन्य, कारण स्वर्गाचें राज्य त्यांचे आहे” (मत्तय 5:10).

8 जानेवारी 1956 रोजी, जिम इलियट आणि त्यांच्याबरोंबर काम करणारे चार मिशनरी सहकारी जेव्हां साठ लोकसंख्या असलेल्या इक्वाडोरच्या वाओरानी आदिवासी जमातीपर्यंत सुवार्ता पोहोचवण्याचा प्रयत्न करित होतें तेव्हां त्या जमातीच्या पाच जणांनी त्या सर्वांना जिवें मारलें.

चार तरुण स्त्रियांनी आप-आपलें नवरें गमावलें आणि नऊ मुलांनी आप-आपलें वडील गमावलें. एलिझाबेथ इलियटने तिच्या पुस्तकांत लिहिलें कीं जगानें या घटनेला भयावह शोकांतिका म्हटलें. नंतर ती पुढें लिहिते , “जगानें जिम इलियटच्या सैद्धांतिक विश्वास कथनाच्या दुसर्‍या खंडाचें सत्य ओळखलेलें नाहीं: ‘जो मनुष्य अशी गोष्ट  मिळविण्यासाठीं जी तो कधीच हरवूं शकत नाहीं अशा गोष्टीचा त्याग करतो जी तो सांभाळू शकत नाहीं, तो मूर्ख असूच शकत नाहीं.'”

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *