आपणांला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यांत जावें लागतें. (प्रेषितांची कृत्ये 14:22)
आंतरिक शक्तीची गरज फक्त रोजच्या ताणतणावानें भरलेल्यां उणीवांतूनच उद्भवत नाहीं, तर वेळोवेळीं येणारी दु:खें आणि संकटें यांतून सुद्धा उद्भवतें. आणि ती संकटें येतांतच.
आपण स्वर्गाच्या वाटेवर असतांना आमच्या भाराक्रांत झालेल्या मनाबरोंबर दु:खाची जोड अटळ आहे. जेव्हां दु:ख येते तेव्हां आपलीं मनें डगमगून खचूं शकतांत आणि जीवनाकडें घेऊन जाणारा अरुंद मार्ग कदाचित कठीण वाटू शकतो. अरुंद रस्ता आणि उंच टेकड्या हेंच स्वतःमध्यें अगदी कठीण असतांत ज्यां जुन्या खटारगाडीच्या शक्तीची मर्यादेपर्यन्त कसोटी घेतांत. पण अशात जर गाडीच नादुरुस्त झालीं तर काय करायचं?
पौलानें त्याच्या जीवनांत असलेल्या काहीं दुःखामुळें हाच प्रश्न उचलून तीनदा ओरड केलीं. त्याच्या शरीरांत असलेल्या काट्याचे पीडानिवारण व्हावें अशी त्यानें विनंती केलीं. पण देवाच्या कृपेच्या ज्यां स्वरूपासाठीं त्यानें विनंती केलीं त्या स्वरूपांत त्याला ती मिळाली नाहीं. तर ती दुसऱ्या स्वरूपांत मिळाली. ख्रिस्तानें उत्तर दिलें, “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते” (2 करिंथ 12:9).
येथें आपण पाहूं शकतो कीं पीडानिवारण नसलेल्या दुःखात कृपा ही ख्रिस्ताच्या पोषक शक्तीच्या स्वरूपांत दिलीं जातें – म्हणजे आपण असें म्हणूं शकतो कीं ज्यां वर्तुळांत एका स्वरूपाची कृपा नाकारली जातें तेव्हां तिथेंच एका दुसर्या स्वरूपाची कृपा पुरवली जातें. आणि पौलानें या भावी कृपेचा पुरेशेपणा लक्ष्यांत घेऊन विश्वासानें असा प्रतिसाद दिला: “म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मीं विशेषेंकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदानें मिरवीन” (2 करिंथ 12:9).
तर मग, देव अनेकदा “नाकारलेली कृपा” च्या वर्तुळात “पुरवलेली कृपा” ओतून आशीर्वादित करतो.
उदाहरणार्थ, (लेखक त्यांचा अनुभव सांगतात) जुलैच्या एका भयंकर उष्ण दिवशी, आमच्या कारवरील पाण्याचें पंप नादुरुस्त झालें आणि आम्हीं टेनेसी या आंतरराज्यात एका अशा ठिकाणी अडकून बसलो जेथून वीस मैल दूरवर कोणतेंहि शहर नव्हतें.
आमचीं गाडी चांगली चालावी आणि आम्हीं आमच्या गंतव्यस्थानी सुखरूप पोहचावें अशी मीं त्या दिवशी सकाळीच प्रार्थना केलीं होती. पण आता मात्र गाडी पूर्णपणें बंद पडलीं होती. आम्हांला त्रासमुक्त प्रवासाची कृपा नाकारलीं गेलीं. आम्हीं आमच्या गाडीभोंवतीं उभें राहून ये-जा करणाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच थांबत नव्हतें. मग माझा मुलगा अब्राहम (त्यावेळी सुमारे अकरा वर्षाचा) असें म्हणाला, “बाबा, आपण प्रार्थना केली पाहिजें.” म्हणून आम्हीं गाडीच्या मागे नतमस्तक झालों आणि देवाला भावी कृपेसाठीं– म्हणजें गरजेच्या वेळीं लागणाऱ्या मदतीसाठीं –प्रार्थना केलीं. प्रार्थना केल्यांवर आम्हीं आमच्या नजरा वर केल्यां, तर पाहिले काय, तर एक पिकअप वाहन समोर एका बाजूला उभें होतें.
त्या वाहनाचा चालक एक मेकॅनिक होता जो काम करण्यासाठीं सुमारे वीस मैल प्रवासांवर होता. तो म्हणाला कीं तो गाडीचा स्पेअर पार्ट घेण्यासाठी शहरांत जायला तयार आहे आणि परत येऊन गाडी दुरुस्त करेल. मीं पण त्याच्याबरोंबर शहरांत गेलों आणि त्याला सुवार्ता सांगण्याची मला संधी मिळाली. जाऊन परत येण्याच्या ह्या प्रवासाला साधारण पाच तास लागले असतील.
तर आमच्या प्रार्थनेच्या ह्या उत्तराबाबंत उल्लेखनीय गोष्ट अशी कीं ते उत्तर ‘नाकारलेल्या प्रार्थनेच्या’ वर्तुळात आलें. आमचा प्रवास सुखरूप आणि त्रासमुक्त व्हावा अशी आम्हीं प्रार्थना केलीं होतीं. देवानें आम्हांला संकटांत पाडलें. पण जिथें एक कृपा नाकारली गेलीं, तिथें त्यानें आम्हांला एक दुसरी कृपा पुरवलीं. आणि जी कृपा माझ्यासाठीं, त्या अविश्वासू मेकॅनिकसाठीं आणि हे सर्व पाहत असलेल्या माझ्या अकरा वर्षांच्या मुलांच्या विश्वासासाठीं सर्वोत्तम होती त्या कृपेसाठीं मीं देवाच्या बुद्धीवर विश्वास ठेवायला शिकूं लागलों.
आपल्याला यांत आश्चर्य वाटू नये कीं ज्यां दुःखांपासून देवानें आपणांस सुखरूप ठेवावें अशी प्रार्थना आपण त्याला केलीं होती, तो आम्हांला नेमक्या त्यांच दुःखांत पाडून आपणांला एका मागून एक अशी अद्भुत कृपा पुरवितो. आपल्या कल्याणासाठीं आणि त्याच्या गौरवासाठी त्याची कृपा कधीं आणि कशी द्यावीं हे त्याला चांगले कळते.