“तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल?” (इब्री 2:3)
तुमचे तारण किती मोठे आहे ह्याची जाणीव तुम्हांला आहे का? कीं तुम्हीं त्याकडे दुर्लक्ष करतां?
तुम्हीं तुमच्यां ह्या मोठ्या तारणाकडे कसे पाहतां? कीं तुम्हीं त्याच्याशी तुमची अंतिम इच्छा आणि मृत्युपत्र, किंवा तुमच्यां कारचा अधिकार किंवा तुमच्यां घराचे विक्रीपत्र यांशी व्यवहार करावा तसे वागता? तुम्हीं त्यावर एकदा स्वाक्षरी केली आणि ते आता कुठेतरी फाईलच्या एका कपाटात आहे, पण तुमच्यां दृष्टीनें ती खरें पाहतां इतकी पण मोठी गोष्ट नाहीं. तुम्हीं त्या विषयीं क्वचितच विचार करता. रोज पडावा तसा त्याचा तुमच्यांवर काहीं फरक पडत नाहीं. मुळांत तुम्हीं त्याकडे दुर्लक्ष करता.
पण जेव्हां तुम्हीं तुमच्यां अशा मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करता तेव्हां तुम्हीं खरोखर कशाकडे दुर्लक्ष करत असतां? “तुमच्यां मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करूं नका!“ असें जेव्हां तो म्हणतो तेव्हां त्याला हेंच म्हणायचे आहे.
- देवानें तुमच्यांवर प्रीति केलीं याकडे दुर्लक्ष करूं नका.
- सर्वशक्तिमान परमेश्वरानें तुम्हांला तुमच्यां पापांची क्षमा प्राप्त केलीं आणि तुम्हांला आपलें केलें आणि सुरक्षित केलें आणि तुम्हांला बळ दिलें व तो तुमचे मार्गदर्शनहि करित आहे याकडे दुर्लक्ष करूं नका.
- वधस्तंभावर ख्रिस्तानें त्याचे जीवन अर्पण केलें याकडे दुर्लक्ष करूं नका.
- विश्वासाद्वारें गणिले गेलेले जे नीतिमत्व त्याच्या विनामूल्य देणगीकडे दुर्लक्ष करूं नका.
- देवाचा कोप तुमच्यांपासून दूर करण्यांत आला आणि देवाबरोबर तुमचा सुखद समेट करण्यांत आला त्याकडे दुर्लक्ष करूं नका.
- तुमच्यांत पवित्र आत्म्याचा निवास आणि जिवंत ख्रिस्ताची सहभागिता व तसेच त्याशी तुमचे सौख्य याकडे दुर्लक्ष करूं नका.
- येशू ख्रिस्ताच्या मुखावर प्रकट झालेल्या देवाच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप याकडे दुर्लक्ष करूं नका.
- कृपेच्या सिंहासनासमोर तुम्हांला जो विनामूल्य प्रवेंश दिला गेला आहे याकडे दुर्लक्ष करूं नका.
- परमेश्वराच्या अभिवचनाच्या अफाट खजिन्याकडे दुर्लक्ष करूं नका.
हे खरोखर मोठे तारण आहे. त्याकडे दुर्लक्ष करणें म्हणजें अति दुष्टपणाच. इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करूं नका. कारण जर तुम्हीं दुर्लक्ष्य केलें तर न्यायाच्या दिवशी तुमचा कसा निभाव लागेल? लेखक हांच प्रश्न विचारत आहे: “एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल?”
म्हणून, ख्रिस्ती असणें ही एक अतिशय गंभीर बाब आहे – ही सामान्य गोष्ट नाहीं तर एक गंभीर विषय आहे. आपल्या मोठ्या तारणात आनंद करण्याविषयी आपल्याला कळकळ असली पाहिजे.
आपण या जगाद्वारें पापाच्या क्षणिक आणि आत्मघाती सुखविलासाकडे ओढले जाऊ नये. आपण परमेश्वराठायीं आमच्या सनातन आनंदाकडे दुर्लक्ष करूं नये – हेंच या तारणाचे ध्येय होय. एवढ्या मोठ्या तारणापासून दूर वाहवत जाण्यापेक्षा आपण आपलें डोळे उपटून काढलें तर बरे होईल.