आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेंलें रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते; तसे असते तर जगाच्या स्थापनेंपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागलें असते; पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहींशी करण्यासाठीं प्रकट झाला आहे. (इब्री 9:25-26)
आपण हे गृहीत धरता कामा नये कीं स्वर्गात पापी लोकांचा मोठ्या स्वगोस्तवाने प्रवेश होत असावा.
देव पवित्र आणि शुद्ध आणि पूर्णपणें न्यायप्रिय आणि नीतिमान असा आहे. तरीही संपूर्ण बायबलची गोष्ट अशी आहे कीं असा पवित्र आणि थोर परमेश्वर तुमच्यां आणि माझ्यासारख्या घाणेंरड्या आणि अमंगळ लोकांचे त्याच्या कृपेत कसे स्वागत करू शकतो. हे कसे शक्य आहे?
इब्री 9:25 म्हणते कीं पापासाठीं ख्रिस्ताचा आत्मयज्ञ यहूदी महायाजकांच्या बलिदानांसारखा नव्हता. ते दरवर्षी लोकांच्या पापांसाठीं प्रायश्चित करण्याकरिता पशूंचे अर्पण घेऊन पवित्र स्थानी जात असत. पण ही वचनें म्हणतात कीं ख्रिस्तानें “वारंवार दुःख सोसण्यासाठीं” स्वर्गात प्रवेश केला नाहीं… “तसे असते तर जगाच्या स्थापनेंपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागलें असते” (इब्री 9:26).
जर ख्रिस्तानें याजकांच्या नमून्याचे अनुसरण केलें असते, तर त्याला दरवर्षी मरावे लागलें असते. आणि जी पापे झाकावयाची होती त्यात आदाम आणि हव्वेच्या पापांचा समावेश होता, म्हणून त्याला त्याच्या वार्षिक मरणाचा आरंभ जगाच्या उत्पत्तिच्या सुरूवातीलाच करावा लागला असता. परंतु लेखकाच्या दृष्टिने हे अशक्य आहे.
हे अशक्य का आहे? कारण त्यामुळें परमेश्वराच्या पुत्राचे मरण दुर्बळ आणि निष्प्रभ दिसलें असते. जर अनेंक शतके वर्षानुवर्षे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावे लागले असते, तर विजय कोठे असता? आपण परमेश्वराच्या पुत्राच्या आत्मयज्ञाचे अमर्याद मूल्य कोठे पाहिलें असते? ते वार्षिक क्लेशात आणि मृत्यूच्या लज्जेत अदृश्य झालें असते.
वधस्तंभाठायीं लज्जा होती, पण ती विजयी लज्जा होती. “(येशूनें) लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री 12:2)
ही ख्रिस्त, जो देवाचे प्रतिरूप आहे, त्याच्या गौरवाची सुवार्ता आहे (2 करिंथ 4:4). माझी प्रार्थना आहे कीं तुम्हीं पापानें कितीही घाणेंरडे किंवा अपवित्र का असेनात, त्यां तुम्हांला या गौरवाचा प्रकाश पाहता यावा आणि तुम्हीं ख्रिस्तावर विश्वास ठेवावा.