ह्यामुळें ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणें तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. (इब्री 7:25)
हा शास्त्रलेख म्हणतो कीं ख्रिस्त पूर्णपणें तारण्यास समर्थ आहे – सर्वदा – कारण तो आमच्यासाठीं मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. दुसऱ्या शब्दांत, जर तो आमच्यासाठीं सर्वदा मध्यस्थी करित नाहीं, तर तो आम्हास सर्वदा तारावयास समर्थहि असणार नाहीं.
याचा अर्थ असा कीं आमचे तारण तितकेच सुरक्षित आहे जितके ख्रिस्ताचे याजकपण अविनाशी आहे. म्हणूनच आम्हास कोणत्याही मानवी याजकापेक्षा अति श्रेष्ठ अशा याजकाची गरज होती. ख्रिस्ताचे ईश्वरत्व आणि मेलेल्यांतून त्याचे झालेलें पुनरूत्थान आमच्यासाठीं त्याचे अविनाशी याजकपद सुरक्षित करते.
याचा अर्थ हा कीं आपण आपल्या तारणाविषयी निष्क्रिय शब्दांत बोलता कामा नये जसे आम्हीं बरेचदा बोलतो – जणू कांहीं मी माझा एकदाचा निर्णय घेऊन माझे कर्तव्य केलें, आणि ख्रिस्तानें मरण सोसून व परत जिवंत होऊन त्यानें एकदाचे त्याचे काम संपविलें, बस इतकेच काय ते. परंतु ते इतकेच नाहीं.
स्वर्गात येशूच्या सार्वकालिक मध्यस्थीद्वारे मी आजहि तारला जात आहे. येशू आमच्यासाठीं प्रार्थना करीत आहे आणि हे आमच्या तारणासाठीं आवश्यक आहे.
आम्हीं आमचा महायाजक म्हणून स्वर्गातील येशूच्या सर्वदा सक्रिय असलेल्यां प्रार्थनांद्वारे (रोम 8:34) आणि मध्यस्थीद्वारे (1 योहान 2:1) सार्वकालिकरित्या तारण पावतो. तो आमच्यासाठीं प्रार्थना करतो आणि त्याच्या प्रार्थनांची उत्तरे मिळतात कारण तो त्याच्या सिद्ध बलिदानाच्या आधारे सिद्धपणें प्रार्थना करतो.