हे सर्व तुम्हांसाठीं आहे, जितके अधिक लोक त्याच्या कृपेने त्याच्याजवळ येतील, तितके त्याच्या अपार दयेबद्दल त्याचे आभार मानतील आणि परमेश्वराचे अधिक गौरव होईल. (2 करिंथ 4:15)
देवाचे कृतज्ञ असणें ही एक आनंदी भावना आहे. त्याच्या कृपेसाठीं आम्हांमध्ये आनंदाने भरलेली उपकार-स्तुतीची जाणीव आहे. म्हणून एका अर्थानें जर पाहिलें तर आभारप्रदर्शनाच्या भावनेंतच, आम्हीं आजही लाभार्थी आहोत. पण आभारप्रदर्शनाचा गुणच असा आहे कीं त्यामुळें कृपा करणाऱ्याचे गौरव होते. आम्हीं आभारप्रदर्शन करतो तेव्हा आम्हीं आमची गरज आणि परमेश्वराचा दानशील गुण, परमेश्वराची पूर्णता, व त्याच्या गौरवाच्या संपत्तीची कबूली देतो.
ज्याप्रकारे मी रेस्टॉरेंटमध्ये अन्न वाढणाऱ्यास, “धन्यवाद” म्हणतो, तेव्हा मी स्वतःस नम्र करतो आणि त्याची वाखाणणी करतो, त्याचप्रमाणें जेव्हा मी परमेश्वरासाठीं आभारप्रदर्शनाची जाणीव बाळगतो तेव्हा मी स्वतःस नम्र करतो आणि त्यास गौरव देतो. अर्थात फरक हा आहे कीं देवानें मजवर जी कृपा केलीं त्याबद्दल मी त्याचा अतिशय ऋणी आहे, आणि जे कांहीं तो माझ्यासाठीं करतो ते सर्व तो विनामूल्य करतो ज्यांस मी पात्र नाहीं.
मुद्दा हा आहे कीं आभारप्रदर्शन देणाऱ्याचे गौरव करते. त्यामुळें परमेश्वराचे गौरव होते. पौलाच्या सर्व परिश्रमात त्याचे हेच अंतिम ध्येय होते. होय, त्याचे परिश्रम मंडळीसाठीं होते – मंडळीच्या उन्नतीसाठीं. पण मंडळी सर्वोच्च ध्येय नाहीं. पुन्हा ऐका: “हे सर्व तुम्हांसाठीं आहे, जितके अधिक लोक त्याच्या कृपेने त्याच्याजवळ येतील, तितके त्याच्या अपार दयेबद्दल त्याचे आभार मानतील आणि परमेश्वराचे अधिक गौरव होईल.” सर्व तुम्हांसाठीं – परमेश्वराच्या गौरवासाठीं!
सुवार्तेविषयी अद्भुत गोष्ट ही आहे कीं परमेश्वराच्या गौरवासाठीं आमच्याकडून तिला जो प्रतिसाद हवा आहे तो असा प्रतिसाद देखील आहे जो अतिशय स्वाभाविक आणि आनंदाने भरलेला असतो; अर्थात, कृपेसाठीं उपकारबुद्धी किंवा आभार. कृपा करण्यांत परमेश्वराचे सर्व-संपन्न गौरव आणि प्राप्त करण्यात आमचा विनम्र आनंद यांत तोड नाहीं. आनंदानें आभार मानण्याद्वारे परमेश्वराचे गौरव होते.
त्याच्या कृपेसाठीं परमेश्वरास गौरव देणारे जीवन आणि अतिशय आनंदाचे जीवन हे एकच जीवन आहे. आणि यांस जे एकत्र करते ते म्हणजें आभारप्रदर्शन अथवा कृतज्ञता.