मोशे प्रौढ झाल्यावर’ त्यानें आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणें ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणें हे त्यानें पसंत करून घेतले. ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणें’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्यानें गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. (इब्री 11:24-26)
किंवा, सारांश रूपांत थोडक्यांत सांगायचे तर : “मोशे विश्वासाने. . . पापाचे क्षणिक सुख भोगणें ह्यापेक्षा. . . कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती” (इब्री 11:24-26).
विश्वास हा “क्षणिक सुख भोगण्यांत” समाधानी राहत नाहीं. तो आनंदासाठीं व्याकुळ (कासावीस) झालेंला असतो, म्हणजें अशा आनंदासाठीं जो टिकून राहील. कायमचा. आणि देवाचे वचन म्हणते, “जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातांत सौख्ये सदोदित आहेत.” (स्तोत्र 16:11). म्हणून, विश्वास पापाच्या फसव्या सुखांकडें पाहून आपल्या उद्दिष्टांपासून विचलित होत नाहीं. तो ज्या परम आनंदाच्या शोधात असतो तो मिळविण्यापासून तो इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीं.
देवावरील विश्वासाची भूक भागवणें हीच देवाच्या वचनाची भूमिका आहे. आणि, असे करत असतांना, ते माझ्या मनाला वासनेच्या भ्रामक चवींपासून सोडवते.
सुरुवातीला, वासना मला फूस लावून अशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते कीं जर मी शुद्धतेचा मार्ग स्वीकारला तर मी खरोखरच असे काहीं तरी गमावून बसीन जे मला मोठे सुख व समाधान देऊं शकते. पण मग मी आत्म्याची तलवार उचलतो आणि लढायला लागतो.
- मी शास्त्रांत वाचतो कीं वासनेच्या आहारी जाण्यापेक्षा मी माझा डोळा उपटून टाकणें हे अधिक बरे आहे (मत्तय 5:29).
- मी वाचतो कीं जर मी जे काहीं शुद्ध, जे काहीं प्रशंसनीय, जे काहीं श्रवणीय, जो काहीं सद्गुण, जी काहीं स्तुती, त्यांचे मनन केलें तर शांतिदाता देव मजबरोबर राहील (फिलिप्पै 4:8-9).
- मी वाचतो कीं देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे (रोमकरांस 8:6).
- मी वाचतो कीं दैहिक वासनां या माझ्या जिवात्म्याबरोबर युद्ध करतांत (1 पेत्र 2:11), आणि धन व विषयसुख आत्म्याच्या जीवनाची वाढ खुंटवून टाकतांत (लूक 8:14).
- पण सर्वात महत्त्वाचे म्हणजें, मी असे वाचतो कीं जे सात्त्विकपणें चालतांत त्यांना उत्तम ते दिल्यावाचून देव राहणार नाहीं (स्तोत्र 84:11), आणि जें अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील (मत्तय 5:8).
माझा विश्वास देवामध्यें असलेले जीवन व शांती यांत समाधानी असावा अशी प्रार्थना मी करत असताना, आत्म्याची तलवार वासनेच्या विषावर असलेले साखरेचे आवरण कोरून टाकते. मग मला दिसून येते कीं ते काय आहे. आणि मला फूस लावणारी त्याची मोहक शक्ती देवाच्या कृपेने धूळीस मिळते.