21 फेब्रुवारी : आमचा सेवक, येशू

Alethia4India
Alethia4India
21 फेब्रुवारी : आमचा सेवक, येशू
Loading
/

“कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठीं आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे” (मार्क 10:45).

केवळ पृथ्वीवर राहत असतांना तो आपल्या लोकांचा सेवक नव्हता, तर तो जेव्हां परत येईल तेव्हां देखील आमचा सेवक असेल. “आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य; मी तुम्हांला खचीत सांगतो कीं, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील” (लूक 12:37). तो परत आल्यानंतर काय करील याचे चित्र म्हणून येशूनें हे दिले.

एवढेच नव्हे, तर तो आताहि आमचा सेवक आहे. “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” म्हणून आपण धैर्याने म्हणतो ‘प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?’ (इब्री 13:5,6).

तो आपल्या लोकांचा सेवक  होता आणि आहे आणि सदैव असेल असे म्हणणे हे पुनरूत्थित ख्रिस्ताचे महत्व कमी करते का? जर “सेवक” याचा अर्थ “आदेशाचे पालन करणारा” असा असेल किंवा आपण त्याचे मालक आहोत असा जर आपण विचार केला तर. होय, त्याद्वारे त्याचा अपमान होईल. पण आम्हीं दुर्बल आहोत आणि त्याच्या मदतीची आम्हांला गरज आहे असे म्हटल्याने त्याचा अनादर होत नाही.

असे म्हटल्याने कीं केवळ तोच आहे जो आम्हास ज्याची सर्वात जास्त गरज आहे ते पुरवू शकतो, त्याचा अनादर होत नाही.

असे म्हटल्याने त्याचा अनादर होत नाही कीं तो प्रीतीचा अनंत झरा आहे, आणि तो आपली जितकीं जास्त मदत करतो आणि जितके जास्त आपण त्याच्या सेवेवर अवलंबून राहतो, तितकी अद्भुत त्याची साधनसामुग्री दिसते. म्हणून, आपण पूर्ण विश्वासाने म्हणू शकतो, “येशू ख्रिस्त सेवा करावयास जिवंत आहे.” 

तो तारण करावयास जिवंत आहे. तो देण्यासाठीं जिवंत आहे. आणि आपल्या ह्या भूमिकेवर तो रोमांचित होतो. तो तुमच्या काळजीच्या ओझ्याने दबलेला नाही. तो ओझे वाहण्याद्वारे उंचावला, ओझे देण्याद्वारे नाही. “आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम” करणे त्याला आवडते (यशया 64:4). तो “जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर संतुष्ट होतो” (स्तोत्र 147:11). त्याचे “नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात“ (2 इतिहास 16:9). येशू ख्रिस्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांप्रीत्यर्थ सर्वसमर्थ सेवेने ओसंडत असतो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *