
“कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे.” (अनुवाद 7:6)
कृपेचे सिद्धांत – कीं आमचे तारण हे केवळ देवाच्या सार्वभौम कृपेनेच होते ह्या कॅल्विनवादी शिकवणीसाठीं पारंपारिकरित्या उपयोगांत आणलेली जुनी प्युरिटन संज्ञा (TULIP) – ह्या झाडातील प्रत्येक फांदी जर संत ऑगस्टीन यांच्या आनंदाशी समतुल्य अशा आनंदाच्या भरात (ज्याला “ख्रिस्ती विश्वासाचा परमानंद म्हणतांत”) डोलत असेल तर या कृपेच्या सिद्धांतांची अनुभूती काय असेल बरे?
- सार्वत्रिक नैतिक अध:पात (Total depravity) म्हणजें केवळ स्वभावात असलेला वाईटपणा नव्हे, तर देवाचे वैभव पाहण्यापासून आंधळेपण आणि परम आनंद याविषयी मृतावस्था.
- अटविरहित निवड (Unconditional election) म्हणजें ख्रिस्तांत असलेला आपला परम आनंद, म्हणजें त्रिएक देव स्वतःमध्यें घेतो तो काठोकाठ आनंद, आपण अस्तित्वात येण्यापूर्वीच आपल्यासाठीं नियोजित करण्यात आला होता.
- (लोकसंख्येच्या दृष्टिने) मर्यादित प्रायश्चित्त (Limited atonement) हे या गोष्टीची खात्री आहे कीं देवामध्यें असलेला अविनाशी आनंद नव्या कराराच्या रक्ताद्वारे देवाच्या लोकांसाठीं निर्णायकपणें साध्य करण्यांत आला आहे.
- अप्रतिकारक कृपा (Irresistible grace) ही देवाच्या प्रीतिची वचनबद्धता आणि सामर्थ्य आहे ज्याद्वारे आपल्याला ह्या जगातील आत्मघातकीं सुखांना बिलगून राहण्यापासून व अविनाशी असा जो आनंद त्याच्या प्राप्तीसाठीं आपल्याला सार्वभौम सामर्थ्याने बंधमुक्त केलें जाते.
- पवित्रजनांच्या विश्वासाची चिकाटी (Perseverance of the saints) हे सर्वसमर्थ देवाचे कार्य आहे जे आपल्याला अति निकृष्ट दर्जाच्या आनंदाच्या कायमस्वरूपी बंधनात पडू देत नाहीं, तर आपल्याला त्याच्या सान्निध्यात विपुल आनंदाचा वारसा मिळावा म्हणून व आपल्याला त्याच्या उजवीकडें असलेले सार्वकालिक सुख प्राप्त व्हावें म्हणून आपल्याला सर्व संकटे व दु:खें यांमध्यें राखून ठेवते.
या पाच मुद्द्यांपैकीं, अटविरहित निवड हा मुद्दा माझ्या जिवाच्या बाबतींत सर्वात कठोर आणि अति गोड असे दोन न्यायनिवाडे देतो. ही निवड अटविरहित आहे हे सत्य माझा सर्व गर्विष्ठपणा उद्ध्वस्त करते (कठोर बाजू); आणि हे कीं ही निवड मला त्याचे अनमोल धन बनवते (अति गोड बाजू).
यां बायबलसम्मत कृपेच्या सिद्धांतांची एक वैभवी बाजू ही आहे : जे सिद्धांत आमचा गर्विष्ठपणा उद्ध्वस्त करतांत, तेंच खरे पाहता आपल्याला परम आनंदासाठीं सज्ज करतांत.
जर ही निवड कोणत्याही प्रकारे आमच्यातील सद्गुणांवर अवलंबून असती तर यां वचनाच्या प्रकाशांत जिथें देव म्हणतो कीं “कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे” (अनुवाद 7:6), आपण स्वतःला कसे श्रेष्ठ समजू शकतो? परंतु आढ्यता बाळगण्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीं, परमेश्वर आपल्याला शिकवतो कीं आपली निवड ही पूर्णपणें अट-विरहित आहे (अनुवाद 7:7-9). “त्यानें एक दयनीय जिवाला आपलें धन असे केलें” असे जे आपण एक भजन गातो अगदी त्याप्रमाणें.
कृपेने झालेंल्या ह्या निवडीची अटविरहित बाजूच आहे — ज्या पाठोपाठ ह्या तारणदायी कृपेचा इतर सर्व अनुक्रम येतो — जी आपल्याला कोणतीही आढ्यता न बाळगू देता अशा दानांचा आनंद घ्यावयांस समर्थ बनविते.