
अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. (इब्री 11:17)
सध्या तुमच्यापैकीं बऱ्याच जणांसाठीं – आणि तुमच्यापैकीं जें इतर कांही आहेंत त्यांच्यासाठींहि ती वेळ येत आहे – आज्ञापालन हे स्वप्न भंग झाल्यासारखे जाणवते. तुम्हाला असे वाटते कीं देवाचे वचन किंवा देवाचा आत्मा तुम्हाला जे करण्यास पाचारण करित आहे ते तुम्हीं केले तर ती गोष्ट तुम्हाला दळभद्र परिस्थितींत आणून ठेवील आणि देव हे सर्व तुम्हांसाठीं कल्याणकारक असे बनवेल असा कोणताही मार्ग दिसत नाही.
कदाचित तुम्हीं नुकताच देवाकडून आज्ञा किंवा हाक ऐकलेली असूं शकते ती अशी कीं तुम्हीं वैवाहिक स्थितींत राहावे किंवा अविवाहित स्थितींत राहावे, जी नोकरी करित आहां तींत टिकून राहावे, किंवा ती नोकरी सोडावी, बाप्तिस्मा घ्यावा, जिथें तुम्हीं काम करता तिथें ख्रिस्ताची साक्ष द्या, प्रामाणिकपणाच्या मानकांशी तडजोड करण्यास नकार द्या, पाप करित असलेल्या व्यक्तीला त्याचा दोष दाखवा, नवीन व्यवसाय सुरू करा, सुवार्तिक बना. आणि ज्यां क्षणी तुम्हीं तुमच्या संकुचित अंत:करणांत पाहता, तेव्हां ते साध्य करण्याची शक्यता भयंकर आहे – म्हणजे एकुलता एक पुत्र असा जो इसहाक वारस होऊ शकतो त्याला गमावल्यासारखे हे आहे.
तुम्हीं प्रत्येक मानवी शक्यता लक्ष्यांत घेऊन त्यावर विचार केला आहे, आणि ते कल्याणकारक ठरेल हें अगदी अशक्य दिसतयं.
अब्राहामसाठीं ती जाणीव किंवा भावना कशी होती हें आता तुम्हीं समजू शकता. तो घटनाक्रम तुम्हीं बायबलमध्ये वाचूं शकता.
तुम्हीं इतर सर्व गोष्टींपेक्षा देवाची आणि त्याच्या मार्गाची आणि त्याच्या वचनांची अधिक उत्कंठा धरता का, आणि तुमचा विश्वास आहे का कीं तो आपणाला तुमचा देव म्हणवून घेण्यास कोणतीही लाज न बाळगता तुमच्या विश्वासाचा आणि आज्ञापालनाचा आदर करू शकतो आणि करील, आणि तुमच्या आज्ञाधारकतेच्या मार्गाला जीवन आणि आनंदाचा मार्ग असा प्रकट करण्यासाठीं आपले सर्व शहाणपण आणि सामर्थ्य आणि प्रीती यांचा उपयोग करील?
आज तुम्हीं ज्या संकटाला सामोरे जात आहांत हे तेच आहे: तुम्हीं त्याची उत्कंठा धरता का? तुम्हीं त्याच्यावर भरवसा ठेवाल का? तुमच्यासाठीं देवाचे वचन हें: देव करूं शकतो व देव समर्थ आहे.
हो माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि त्या शिवाय आपणाला दुसरा मार्ग किंवा पर्याय नाही