14 फेब्रुवारी : ख्रिस्त हांच माध्यम व शेवट

Alethia4India
Alethia4India
14 फेब्रुवारी : ख्रिस्त हांच माध्यम व शेवट
Loading
/

मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्यानें माझ्यावर प्रीती केलीं व स्वत:ला माझ्याकरता दिले. (गलती 2:20)

देवानें हें विश्व का निर्माण केले? आणि ज्यां पद्धतीने तो त्यांवर सत्ता चालवित आहे ती त्यां पद्धतीने का? देव काय साध्य करित आहे? येशू ख्रिस्त हांच हे साध्य करण्याचे माध्यम किंवा हे साध्य करण्यामागे मुख्य शेवट आहे का?

येशू ख्रिस्त हा देवाच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप आहे. तो मानवरूपात असलेला देव आहे. यां दृष्टिने, तो माध्यम नसून शेवट आहे.

देवाच्या गौरवाचे प्रकटीकरण हेंच विश्वाच्या अस्तित्वाचा खरा अर्थ देतो. देव हेच साध्य करत आहे. आकाशें आणि जगाचा इतिहास, “देवाचा महिमा वर्णितांत.”

पण येशू ख्रिस्ताला ह्या जगांत असे काहीतरी पूर्ण करण्यासाठीं पाठवण्यात आले होते जें करणें अगत्याचे होते. तो पापाचा प्रश्न सोडविण्यासाठीं आला. तो पापी लोकांना त्यांच्या पापांमुळें त्यांच्यावर येणाऱ्या विनाशापासून वाचवण्यासाठीं आला. हे सोडविलेलें लोक देवाचा महिमा पाहतील आणि त्याची चव घेतील आणि सार्वकाळासाठीं आनंद करित त्याचा महिमा दर्शवतील.

इतर लोक देवाच्या महिमेचा तिरस्कार करित दुष्कर्माचा ढीग लावतील. अशाप्रकारे, देवाला आपल्या प्रजेच्या आनंदासाठीं आपल्या महिमेचे प्रकटीकरण करून जें साध्य करावयाचे होते, येशू ख्रिस्त हा त्याचे माध्यम आहे. ख्रिस्तानें तारणासाठीं जे कार्य केलें त्यां वाचून कोणीहि मनुष्य देवाचा महिमा पाहूं शकला नसता किंवा त्याची चव घेऊं शकला नसता. ह्या विश्वाच्या अस्तित्वाचा हेतूच रद्द होईल. तर मग, ख्रिस्त माध्यम आहे.

परंतु जें त्यानें वधस्तंभावर साध्य केलें, कारण तो पापी लोकांसाठीं मरण पावला, ख्रिस्तानें पित्याचे प्रेम व त्याचे नितीमत्व यांचे सर्वश्रेष्ठत्व प्रकट केलें. हा देवाच्या महिमेच्या प्रकटीकरणाचा शिखर होता – त्याच्या कृपेचा गौरव.

म्हणून, देवाच्या उद्देशाचे माध्यम म्हणून जेव्हां त्याच्या परिपूर्ण कृतीचा क्षण आला, अगदी त्यां क्षणी येशू त्या उद्देशाचा शेवट असा बनला. तो पापी लोकांसाठीं त्यांचा स्थानापन्न म्हणून मरण पावलं व त्यांना जीवन देण्यासाठीं मेलेल्यांतून पुन्हा उठला, त्यांत तो देवाच्या गौरवाचा केंद्रस्थान व सर्वोच्च प्रकटीकरण असा सिद्ध झाला.

म्हणून वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त हा विश्वासाठीं देवाच्या उद्देशाचे माध्यम आणि शेवट असा दोन्ही आहे. त्याच्या ह्या कार्याशिवाय, तो शेवट — म्हणजे देवाच्या प्रजेच्या आनंदासाठीं देवाच्या गौरवाची पूर्णता प्रकट करणें — साध्य झाला नसता.

आणि ज्यां कार्याचा माध्यम बनला, त्यां कार्याचा शेवटहि तोच बनला – म्हणजे तो आपल्यासाठीं शाप बनला तेव्हां त्यानें देवाविषयी जे प्रकट केले त्याचा आपण अनंतकाळासाठीं अधिकाधिक आनंद घेऊं तेव्हां तोंच सदासर्वकाळासाठीं आपल्या उपासनेचा केंद्रबिंदू असेल.

हे विश्व ज्यां उद्देश्याने निर्माण केले गेले, येशू हा त्याचा शेवट आहे, आणि नीतिमान ठरविलेले लोग ज्याचा आनंद घेऊं शकतांत तो शेवट साध्य करणारा माध्यमहि तोंच आहे.

1 Comment

  1. दिलीप के पावरा February 16, 2025at8:21 am

    हो येशू हाच मध्यम आहे येशू ने माझ्यासाठी आणि या जगा साठी आपलं बलिदान देऊन आम्हाला सार्व कालीन जीवन दिले आहे

    Reply

Leave a Reply to दिलीप के पावरा Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *