13 August : चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय विश्वासाने कसा पूर्ण होतो याची तीन उदाहरणें

Alethia4India
Alethia4India
13 August : चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय विश्वासाने कसा पूर्ण होतो याची तीन उदाहरणें
Loading
/

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्या देवानें तुम्हांला झालेंल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. (2 थेस्सलनीका 1:11)

जेव्हा पौल म्हणतो कीं देवानें…..चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे (तो आमच्या कर्मांना “विश्वासाची कार्ये” म्हणतो), तेव्हा त्याचा अर्थ आपण पापाचा पराभव करावा आणि आपण विश्वासाने नीतिमत्वाला योग्य अशी कर्मे करावी असा होतो, म्हणजेंच पुढील पाच मिनिटे, पाच महिने, पाच दशके आणि अनंतकाळ यां एकूणच सर्व टप्प्यांमध्यें देव ख्रिस्ताठायीं आपल्यासाठीं काय काय करेल अशी जी त्यानें आम्हांला अभिवचने दिलीं आहेंत त्यांवर आपण अवलंबून राहतो.

तुमच्या जीवनात ह्याचे परिदृश्य कसे दिसते याची तीन उदाहरणें पुढीलप्रमाणें आहेत :

1. जर तुम्हीं तुमच्या अंतःकरणांत त्याग व औदार्याने देण्याचे ठरविता, तर चांगुलपणाचा हा मनोदय पूर्ण करण्यासाठीं तुम्हांला देवाचे सामर्थ्य प्राप्त होईल कारण या संदर्भांत त्यानें भावी कृपा पुरविण्याची जी जी अभिवचनें दिलींत त्यांवर तुम्हीं विश्वास ठेवता, ती अभिवचनें अशी : “माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायीं गौरवाच्या द्वारे पुरवील” (फिलिप्पै 4:19); आणि “जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील” (2 करिंथकर 9:6); त्याचप्रमाणें, “तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्हीं संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे ” (2 करिंथ 9:8).

2. जर तुम्हीं तुमच्या अंतःकरणांत पोर्नोग्राफीचा त्याग करण्याचे ठरविता, तर चांगुलपणाचा हा मनोदय पूर्ण करण्यासाठीं तुम्हांला देवाचे सामर्थ्य प्राप्त होईल कारण या संदर्भांत त्यानें भावी कृपा पुरविण्याची जी जी अभिवचनें दिलींत त्यांवर तुम्हीं विश्वास ठेवता, ती अभिवचनें अशी : “जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील” (मत्तय 5:8); आणि “तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे” (मत्तय 5:29). हे किती बरे. अद्भुत कार्य. पूर्णपणें समाधान देणारे सामर्थ्याचे काम.

3. आणि जर तुम्हीं तुमच्या अंतःकरणांत असे ठरविता कीं जेव्हां जेव्हां संधी येईल, तुम्हीं ख्रिस्ताच्या साक्षीसाठीं आपलें तोंड उघडाल, तर चांगुलपणाचा हा मनोदय पूर्ण करण्यासाठीं तुम्हांला देवाचे सामर्थ्य प्राप्त होईल कारण या संदर्भांत त्यानें जी भावी कृपा पुरविण्याचे अभिवचन दिलें त्यावर तुम्हीं विश्वास ठेवता, ते अभिवचन असे, “जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्हीं काय बोलायचे ते तुम्हांला सांगितले जाईल” (मत्तय 10:19).

देवानें त्याच्या मौल्यवान अभिवचनांवर आपला दैनंदिन विश्वास वाढवावा – म्हणजें भावी कृपेविषयी असलेल्या त्याच्या अक्षय, रक्ताने विकत घेतलेल्या, व ख्रिस्ताला उंचविणाऱ्या अभिवचनांवर असलेला विश्वास.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *