शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र… (2 तीमथ्य 3:1-2)
लक्षात घ्या कीं कृतघ्नतेसोबत गर्व, गैरवर्तन, आणि अवमान यांचा प्रादुर्भाव कसा होतो.
एका ठिकाणी पौल म्हणतो, “तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहींत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो” (इफिस 5:4). म्हणून, असें दिसते कीं कृतज्ञता आणि आभारी असणें ही विद्रपुता आणि हिंसेच्या सर्वथा उलट आहे.
हे असें असण्याचे कारण हे आहे कीं उपकारबुद्धीची म्हणजें कृतज्ञतेची भावना ही अहंकाराची भावाना नसून नम्रतेची भावना आहे. ही स्वतःचे गौरव शोधणारी नसून, ती इतरांची प्रशंसा करणारी भावना आहे. आणि ती रागीष्ट नसून प्रसन्नचित्त असते. ती कटुत्व बाळगत नाहीं. कटु उपकारशीलता ही जणू शब्दांचा विरोधाभास आहे.
कृतज्ञतायुक्त अंतःकरणास उघडणारी आणि कटुत्व व कुरूपता आणि अनादर व हिंसा यावर मात करणारी किल्ली म्हणजें आपला उत्पन्नकर्ता आणि प्रतिपालक व प्रदाता आणि आशा देणाऱ्या परमेश्वराठायीं दृढ विश्वास असणें. आम्हीं जर हा विश्वास धरत नाहीं कीं आमच्याजवळ जे कांहीं आहे आणि जे प्राप्त करण्याची आम्हीं आशा धरतो त्या सर्व गोष्टींसाठीं आम्हीं परमेश्वराचे अतिशय ऋणी आहोत, तर मग कृतज्ञतेचा झराच ओसरला आहे.
म्हणून, मी असें म्हणून शेवट करतो कीं अंतिम समयी हिंसाचार आणि पवित्र वस्तू भ्रष्ट करणें आणि कुरूपता आणि अवज्ञा ही परमेश्वराची समस्या आहे जी तो स्वतः हाताळेल. जर आमची मूळ समस्या जर आहे तर ती आमच्या निर्भरतेच्या उच्च पातळीवर कृतज्ञतेची भावना नसणें ही आहे.
जेव्हा आपण देवाचे आभार न मानण्याचा कळस पार करतो, तेव्हा आभारपणाचा सर्व तलाव डोंगराखाली जाऊन आणखीच कोरडा होऊ लागतो. आणि जेव्हा आभारपणा नाहींसा होतो, स्वतःचे प्रभूत्व त्याच्या सुखासाठीं भ्रश्टाचाराकडे आणखी डोळेझाक करू लागते.
विनम्र भावानें आभारी असण्याविषयीं मोठे संजीवन यावे म्हणून प्रार्थना करा.