जर आपण आपली पापें पदरी घेतलीं, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. (1 योहान 1:9)
तुमच्या मनाची ही अंधुक, दुर्दैवी भावना कीं तुम्हीं एक अपूर्ण व्यक्ती आहां खरे पाहता पापाची खात्री पटविणारी भावना नाहीं. स्वतःविषयीं वाईट भावना जोपासणें म्हणजे पश्चात्ताप करणें असें होत नाहीं.
आज सकाळी मी प्रार्थना करूं लागलो, आणि लगेच मीं स्वतःला या जगाच्या निर्माणकर्त्याबरोबर संभाषण करण्यांस अयोग्य समजूं लागलो. आणि अर्थातच, ती स्वतःला अयोग्य समजण्याची एक अंधुक, दुर्दैवी भावना होती. आणि मी माझी ती अगोग्यता कबूलही केलीं. पण आता यापुढें काय?
जोपर्यन्त मी माझ्या पापांविषयीं योग्य आणि स्पष्ट वास्तविकता लक्षांत घेतली नाहीं, तोपर्यंत खरेंच कांहीहि बदललें नाहीं. मनाच्या अशा दुर्दैवी भावना योग्यच आहेत जर त्यां मला एखाद्या अशा विशिष्ट पापाविषयीं दोषी ठरवितांत जे मीं माझ्या सवयींमुळें सज्ञानाने वारंवार करतो. पण खरें पाहता, मी एक पापी मनुष्य आहे ह्या अस्पष्ट भावना सहसा फारशा लाभाच्या ठरत नाहीं.
मी अयोग्य आहे ही अंधुक व दुर्दैवी भावना केवळ तेव्हांच योग्य ठरते जेव्हां मी स्वत:कडे आज्ञा न पाळणारा मनुष्य म्हणून पाहतो. अशी खात्री पटल्यावर तुम्हीं तुमची पापें कबूल करून पश्चात्ताप करू शकता आणि देवाला क्षमा मागू शकता आणि ज्यां शुभवर्तमानावर तुम्हीं विश्वास ठेविला आहे त्याचे स्मरण करून तुम्हीं तुमची पापें जणूं नाहीशी करूं शकता.
मग मी त्यां सर्व आज्ञा ज्यां मीं वारंवार मोडतो, स्मरण करूं लागलो. तेव्हा ज्यां आज्ञा मी तोडल्याचे माझ्या लक्ष्यांत येते त्यां ह्यां :
- तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर. म्हणजे 95% नाहीं, तर 100%. (मत्तय 22:37)
- आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीति कर. म्हणजे ज्या ज्या चांगल्या गोष्टीं तुमच्याकडे असाव्यांत अशी तुम्हीं आतुरतेने उत्कंठा करता त्यां त्यां वस्तु तुमच्या शेजार्यांकडेहि असाव्यांत अशी तितक्यांच आतुरतेणें उत्कंठा बाळगा. (मत्तय 22:39)
- जे काही तुम्हीं कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा; – मग ते आंतरिक असों वा बाह्य (फिलिप्पैकर 2:14)
- त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’- म्हणजे यापुढे तुम्हीं त्यांच्या ओझ्याने भारावून जाणार नाहीं. (1 पेत्र 5:7)
- तुमच्या मुखातून जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की ऐकणार्यांना कृपादान प्राप्त व्हावे — विशेषत: तुमच्या जवळच्या लोकांना. (इफिस 4:29)
- वेळेचा सदुपयोग करा. म्हणजे वेळ वाया घालवू नका, किंवा दिरंगाई करू नका. (इफिस 5:16)
हाय हाय! मीं खूप पवित्र आहों अशी फुशारकी मारणें कोठे! माझा ढोंगीपणा तर उघड झाला आहे.
माझी ही अवस्था तर त्यां अंधुक, दुर्दैवी भावनांपेक्षाहि अति वाईट आहे. अहाहा, पण आता मला माझा शत्रू स्पष्टपणे दिसतोय. माझी पापें विशिष्ट आहेत. ती आता अस्पष्ट धुक्यातुन उघड झाली आहेत. ती अगदी माझ्या समोर आहेंत. मी ह्या अपराध भावनेवर कुरकुर करत बसत नाहीं. त्या ऐवजी, मी ख्रिस्तानें मला आज्ञापिलेल्या गोष्टींचे पालन न केल्याबद्दल त्याला क्षमा मागतो.
माझे हृदय भग्न झालें व मी माझ्याच पापावर क्रोधाविष्ट झालों आहे. मला ते जिवे मारायचे आहे, नाहीं नाहीं, मी आत्महत्या करणार असें नाहीं. मी आत्मघातकीं नाहीं. तर मी पापाचा द्वेष करणारा आणि पाप-घातकी असा आहे. (“पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ…..हे जिवे मारा,” कलस्सै 3:5; “शरीराची कर्मे ठार मारा,” रोमकरांस 8:13.) मला जिवंत राहावयाचे आहे. म्हणूनच मी आत्म-रक्षक मारेकरी आहे — माझ्या स्वतःच्या पापाचा मारेकरी!
मी पापाबरोबर माझ्या ह्या संघर्षात असतांना, माझ्या कानावर हें अभिवचन येते, “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील” (1 योहान 1:9). मनांत शांती उदय पावते.
आता प्रार्थना करणे पुन्हा शक्य होते, आणि प्रार्थना करणे योग्य आहे आणि सामर्थ्याने भरलेली असें जाणवते.