दैनिक सुभक्तिपर बोध
सत्याने दैनंदिन आपल्या मनाचे भरण-पुरण केल्याने, आपली अंतःकरणे देवाला समाधान देणारी संपत्ती म्हणून ओळखण्यासाठी विकसित होतील. वर्षातील प्रत्येक दिवसासाठी जॉन पायपर ह्यांनी लिहिलेला एक लघु, देव-केंद्रित भक्तीपर संदेश वाचा किंवा ऐका.
आपले आयुष्य वाया घालवू नका - आपले आयुष्य वाया न घालवणे म्हणजे इतरांना देवामध्ये आनंदित करण्यासाठी जगणे होय. जर तुम्ही असे केले तर तुमचे जीवन कठीण होईल, तुम्हाला मोठमोठे धोके जोखमी पत्करावे लागतील आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. मराठी पॉडकास्ट ऐका कारण ते तुम्हाला देवाच्या गौरवासाठी आत्मिक तृप्ती करणारे जीवन जगण्याचे आव्हान देईल.
आम्हीं भस्म झालो नाहीं ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाहीं.ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. (विलापगीत 3:22-23).
परमेश्वराची करुणा रोज सकाळी नवी होते कारण दररोज त्या दिवसासाठीं पुरेशी करुणा मुबलक प्रमाणांत उपलब्ध असते. देव प्रत्येक दिवसाचे दुःख ठरवितो. तसेंच देव प्रत्येक दिवसासाठीं करुणा देखील ठरवितो. त्याच्या मुलांच्या जीवनात, दु:ख व करुणा परिपूर्णपणे ठरविण्यात आलेलें आहेंत. येशूनें म्हटलें, ”ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.“ (मत्तय 6:34). ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रत्येक दिवशी त्याची दया किंवा करुणा ठरविली आहे. प्रत्येक दिवस दर सकाळी नवा होतो.
परंतु जेव्हां आपल्याला वाटते कीं आजच्या साधनसामुग्रीवर उद्याचा भार आपल्याला सहन करावा लागू शकतो तेव्हां आपण कित्येकदा निराश होतो. देवाला वाटते कीं आपण हे जाणावे कीं असे होणार नाहीं. आजची करुणा आजच्या दुःखांसाठीं आहे. उद्याची करुणा ही उद्याच्या दुःखांसाठीं असणार आहे.
कधीकधी आपण विचार करतो कीं भयंकर परीक्षेत स्थिर उभे राहण्यासाठीं आम्हांवर करुणा केलीं जाईल कीं नाहीं. होय, केलीं जाईल. पेत्र म्हणतो, ”ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्हीं धन्य आहात; कारण गौरवाचा आत्मा म्हणजें ‘देवाचा आत्मा’ तुमच्यावर येऊन ‘राहिला आहे.’ त्यांच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो“ (1 पेत्र 4:14). जेव्हां निंदा होते, तेव्हां गौरवाचा आत्मा येतो. स्तेफनाला दगडमार होत असतांना असे घडले. तुमच्यासाठीं देखील असेंच घडेल. जेव्हां आत्म्याची आणि गौरवाची गरज भासेल, तेव्हां ते येतील.
रानात मान्ना एका दिवसाला एकदाच दिला जात असे. साठवणूक करायची नव्हती. देवाच्या दयेवर आपण अशाच प्रकारे अवलंबून राहिले पाहिजे. उद्याची ओझी उचलण्याचे बळ तुम्हांला आज प्राप्त होणार नाहीं. आजच्या दुःखांसाठीं तुम्हांला करुणा देण्यात आली आहे.
उद्या करुणा नवी होईल. ”ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.“ (1 करिंथ 1:9).
“तुम्हांला जीवनांत एकच संधी मिळते, बस एवढेच. फक्त एकच. आणि त्या जीवनाचा चिरकाळ टिकणारा मापदंड म्हणजे येशू ख्रिस्त.”
"तुमचे मन यासाठीच बनवले गेलें होते कीं तुम्हीं देवाला ओळखावे आणि त्याजवर प्रीति करावी."
“तुमच्या जीवनातून काहीं तरी पराक्रमी अशी गोष्ट घडून यावीं अशी अपेक्षा करा! तुमच्या आयुष्याला चिरकाळ टिकणारा अर्थ प्राप्त व्हावा अशी उत्कंठा बाळगा. त्यासाठी तहानलेले असां! जीवनाचा प्रवास आवेशविरहित पूर्ण करूं नकां."
"जेव्हां आपण देवामध्यें सर्वात जास्त आनंदी व समाधानी असतो तेव्हां तो आपल्यामध्यें सर्वात जास्त गौरवविला जातो."
“देवाचा देवाकरिता असणारा आवेश आमच्यासाठी असणार्या देवाच्या करुणेचा पाया आहे.”
"भारतातील मंडळीला सत्यात आणि
विश्वावासात वाढण्यास सुसज्ज
करण्यासाठी पवित्र शास्त्र केंद्रित
साहित्याचा अभ्यास करा."