ArchivesAsk Pastor John

Episode #3: मंडळीला अनौपचारिक संस्कृतीतून बाहेर आणणे.

Alethia4India
Alethia4India
Episode #3: मंडळीला अनौपचारिक संस्कृतीतून बाहेर आणणे.
Loading
/

मंडळीला अनौपचारिक संस्कृतीतून बाहेर आणणे.

पुन्हा एकदा पास्टर जॉन यांना विचार या मराठी पोडकास्ट मध्ये तुमचेस्वागत आहे,   

आम्ही “गोंधळ” म्हटल्या गेलेल्या ऑनलाईन वादामध्ये परत आलेलो आहोत. पास्टर जॉन आपण 30 सप्टेंबर रोजी कॉफी बाबत ट्वीट केले. आणि तुम्ही इब्री 12:28 पोस्ट केले जे असे म्हणते, “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू.” आणि ह्या आदर व भययुक्त आराधनेच्या दृष्टांताच्या प्रकाशात आपण हा खुला प्रश्न मांडला: “रविवारी भक्तिमंदिरात कॉफी पिणे योग्य आहे का, ह्या बाबत पुनर्विचार करता येईल का?”

मी मागेच सांगितल्याप्रमाणे, ह्या ट्वीटला पसंत करण्यात आले आणि नापसंतही करण्यात आले आणि ती इंटरनेटवर इतकी पसरली की काही आठवड्यातच तिला 1000 ट्वीट्स, 1500 कॉमेंट्स, 3000 लाईक्स, 2.5 दशलक्ष व्ह्यूज, आणि अमेरिकेतील फॉक्स न्युजद्वारे आणि युके मधील डेली मेल द्वारे ऑनलाईन विशेष लेख प्राप्त झाले. आता त्या ट्वीटमागे भरपूर काही आहे, खरेतर पूर्ण जगिक दृष्टिकोण. म्हणून आम्ही त्यामागील संदर्भ उभारत आहोत, आणि तुम्ही रविवारी सकाळी जे सर्व घडते त्यामध्ये मंडळीला ह्या आदरयुक्त अनुभूतीने कसे आकार देऊन उभारता येईल ह्याबाबत बोलत आहात. मागील वेळी तुम्ही असे दर्शविले की तुम्ही मंडळीच्या पुढार्‍यांना मंडळीला अनौपचारिक भक्ती पासून इब्री लोकांस पत्र आणि पवित्र शास्त्र पाचारते त्या अधिक उत्तम आणि योग्य अशा भक्तिप्रत घेऊन जाण्याचे वास्तविक महत्व काय ह्या विषयात प्रवेश करू इच्छिता. म्हणून वास्तविक व्हा, आणि आम्हाकरिता ह्या मुद्दयावर आपली चर्चा हाती घ्या.

मी मागच्यावेळी युक्तिवाद मांडला की मंडळीतील आराधनेच्या पवित्र वेळी कॉफी पिणे हे इब्री. 12:28 मध्ये अपेक्षित आदर व भयाशी सुसंगत नाही. कारण इब्री लोकांस पत्र म्हणते, “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू.

परंतु मी युक्तिवाद केला की कॉफी पिणे हा मध्यवर्ती मुद्दा नाही. मध्यवर्ती मुद्दा हा आहे की रविवारी सकाळच्या मंडळीच्या आराधनेच्या तासाची पवित्रता ज्याला मी “आदर आणि भय” आणि पावित्रता म्हणतो, ती प्रतिध्वनित करणारी हृदये लोक आणि पुढारी बाळगत नाहीत. त्या वास्तविकता, त्या आदरयुक्त वास्तविकता त्यांच्या मनात आणि हृदयात प्रमुख नाहीत. त्यांना आदर, भय हे शब्द माहित आहेत. त्यांना शब्द माहित आहेत, परंतु त्या शब्दांमध्ये सक्तिचा अस्तित्ववादी मान नाही, लोकांना आदर आणि भयाची ओढ लावणारा गंभीर आनंद नाही. ते केवळ शब्द आहेत.

आणि मी युक्तिवाद केला की तुम्ही बाह्यात्कारी नियम बनवून ही समस्या सोडवू शकत नाही. अंतर्गत, हृदयस्पर्षी आदर जागृत करून ही समस्या सोडविली जाऊ शकेल. म्हणजे, ज्या गोष्टी सुसंगत नाहीत त्या बहिष्कृत होत नाहीत; त्या आपोआपच गळून जातात. मला असे वाटते मी त्याप्रमाणेच ते करण्याचा प्रयत्न केला आहे. मी 33 वर्षाच्या माझ्या उपदेशांमध्ये कधीच असे नियम मांडले नाहीत.

मला ह्या ठिकाणी पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये पाळक लोकांना मंडळीला क्रमश: पुढे चालविण्याचा वास्तविक मार्ग दाखवायला आवडेल.  आपण अनौपचारिक, स्वस्त, कॉफीचे घोट घेणार्‍या, मनोरंजन केंद्रित सामुहिक सभांपासून देवाच्या अधिक गांभिर्ययुक्त आनंदी, आदरयुक्त, सखोल समाधानकारी भेटीकडे जाण्यास संयम बाळगला पाहिजे.  म्हणून, टोनी, ह्या एपिसोडमध्ये आपण काही मिनिटे अशा उपदेशांबद्दल बोलू शकतो जे त्या दिशेने आपणास चालवू शकतील.

देवाप्रत असणारी वृत्ती विकसित करणे

परंतु ते म्हणण्यापूर्वी, पाळकाची एकून वृत्ती अशी असावी की आठवड्यातून तास-दिड तास देवाचे लोक त्यांच्यासोबत अशा क्रांतिकारी देवाप्रत असणार्‍या मनाने भेटतील ज्यामध्ये भारदस्तपणा आणि गांभीर्य आहे, आणि तो देवकेंद्रितेचा भारदस्तपणा आणि गांभीर्य हे आमच्या लोकांच्या जिवनांमध्ये सर्वात समाधानकारक अनुभव व्हावा. आम्हाला अशी वृत्ती असावयास हवी : “मला हे असे करायचे आहे की त्यांना ते आवडेल, त्यांना ते पाहिजे असेल, ह्याकरिताच ते येतील. “आता हे सहन करावे लागणार असे नाही तर ह्याची अपेक्षा केली जाईल.” अशी वृत्ती त्यांच्या ठायी निर्माण व्हावी.

आपण जगापेक्षा जास्त मनोरंजन कधीच करू शकणार नाही. हे मला ह्या ठिकाणी शिक्कामोर्तब करू द्या. आपण जगापेक्षा जास्त मनोरंजन कधीच करू शकणार नाही, आणि आपण त्याचा प्रयत्नही करू नये, कारण आमच्याजवळ त्याच्यापेक्षा अमर्यादरीत्या उत्तम काहीतरी आहे, असे की ज्याकरिता आमचे आत्मे निर्माण केलेले आहे.

आणि आमच्या बहुतांश लोकांना हे माहित नाही. व्हीडीओज बघणे आणि इतर मनोरंजनाच्या मजेशीर साधनांपेक्षा अधिक उत्तम काय आहे हे त्यांना माहित नाही. त्यांना हे माहितच नाही. त्यांनी खर्‍या गोष्टीचा कधी स्वादच घेतलेला नाही. असे काहीतरी जे आमच्या अंतर्यामी सर्वांगीणरीत्या स्थैर्य देणारे, शक्ती देणारे, शुद्ध करणारे, आणि समाधान देणारे जे आहे त्याची ओढ लोकांना असते, आणि त्यांना कशाची ओढ आहे हे त्यांना ते वारंवार दाखविल्याशिवाय समजणार नाही.

 म्हणूनच उपदेशाच्या संदर्भात पाळकांना ह्या पाच विनंत्या आहेत.

1. पवित्र शास्त्राचे लोक उभारा

लोकांचे लक्ष पवित्र शास्त्रावर, त्याच्या शब्दांवर खिळवा. महान वास्तविकता हाताळा, आणि त्यांना त्या वास्तविकता पवित्र शास्त्रभागांमधून दाखवा. पवित्र शास्त्रावर भरवसा निर्माण करा. पवित्र शास्त्राचा व्यक्ती म्हणून तुमच्यामध्ये भरवसा निर्माण करा, जेणेकरून लोक म्हणतील, “आपण त्याच्यावर भरवसा ठेऊ शकतो कारण तो पवित्र शास्त्राचा माणूस आहे.”

ह्या भुमिकेमुळे काही लोक मंडळी सोडून जातील; पवित्र शास्त्राला अशा प्रकारे अधीन होणे हे जास्तच भीतिदायक आणि धाकात ठेवणारे आहे.  इतर ह्यासाठी भुकेले आहेत, आणि ते घरी जातील. कालंतराने, लोकांना असे घडविण्याचा प्रयत्न करा की ज्यांची मनोवृत्ती आत्मजागृतीने आणि आनंदाने पवित्र शास्त्राच्या अधिकाराच्या अधीन आहे.  असे लोक घडविण्याचा प्रयत्न करा जे पवित्र शास्त्रा आधारे सर्व बाबींचे मुल्यमापन करतील. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, ही पवित्र शास्त्राच्या शिक्षणाच्या चाळणीतून चाळून, आणि पवित्र शास्त्र सर्व गोष्टींबाबत खरेच काय शिकवते हे बघितले जाईल.  

आपण पवित्र शास्त्र कसे हाताळता आणि त्यातील गौरव कसे बघता त्याद्वारे अशी मंडळी तयार होईल. ते त्यांचे स्वत:चे नाहीत. ते ख्रिस्ताचे आहेत, आणि त्याचा शब्द त्यांचे जीवन आणि त्यांचे नियम आहे.  आपल्या पवित्र शास्त्रात मुरलेल्या उपदेशांमधून हे अस्तित्वात येणे गरजेचे आहे.

2. देवाला वर्चस्वकारी वास्तविकता बनवा.

तुम्हाला दर आठवड्यात उपदेश देतांना लोक ऐकतात तेव्हा देवाचे गौरव आणि येशू मध्ये देव जे सर्वकाही आहे ते प्रमुख वास्तव लोक अनुभवतील ह्याची पुढील वर्षांमध्ये खातरी करून घ्या. “देव ह्या ठिकाणी प्रमुख वास्तविकता आहे. देव मोठा आहे. देव भारदस्त आहे. देव अमुल्य आहे. देव समाधान देणारा आहे. देव जवळ आहे. देवाशी खेळ करू नका. देव आपल्यावर प्रीती करतो.” म्हणजे देवाचे हे दर्शन प्रचंड आणि भारदस्त आहे. देवाची महानता, त्याचे सौंदर्य आणि त्याची किंमत ही प्रमुख वर्चस्वकारी वास्तविकता बनवा. 

पाळकांनो देवाबाबत सतत विस्मित व्हा, तो प्रारंभाविना जो आहे तो आहे! हे एखाद्या चार वर्षाच्या लेकराचेही चित्त वेधून घेणारे आहे, बरोबर? लेकरू विचारतं, “डॅडी, देवाला कोणी बनवले?” वडील प्रतिसाद देतात, “देवाला कोणीच बनवले नाही.” “वॉह.” डोळे विस्फारतात. “तो नेहमीच होता.” देव सर्वोच्च वास्तविकता आहे. इतर सर्वकाही, तारामंडळापासून तर उपअनु कणांपर्यंत सर्व दुय्यम आहे. आपण बघतो ते सर्व दुय्यम आहे.

देव प्राथमिक वास्तविकता आहे. आपल्या लोकांना देव त्यांच्या जीवनातील प्रत्येक बाबीशी, सर्वदा संबंधीत आहे ही प्रमुख बाब आहे हे बघण्यास आणि जाणण्यास मदत करा. तो त्यांच्या जीवनातील प्रमुख बाब आहे. तो सर्वोच्च खजिना, प्रमुख मुल्य, सर्वात प्रखर आशा, आणि असा आहे ज्या करिता ते जगतील आणि मरतील.

3. त्याच्या क्रोधापुढे कंपायमान व्हा.

आपल्या लोकांना आपल्यातील आणि जगातील पापाच्या विकाराची विदृपता आणि त्याविरुद्ध असणार्‍या देवाच्या क्रोधाची भयंकरता ह्याची जाणीव असल्याची खातरी करा.  जर आपले लोक देवाच्या श्रेष्ठ शुद्धतेच्या वैभवापुढे आणि पापाविरुद्ध त्याच्या पवित्र क्रोधापुढे कंपायमान होणार नाहीत, तर देवाची कृपा, मौल्यवान कृपा ही जशी असावयास पाहिजे तशी विस्मयकारी राहाणार नाही. जर त्यांना पापाविरुद्ध देवाच्या क्रोधाचा प्याला ओतल्या जाण्याच्या कार्यक्षमतेबद्दल जाणीव झाली नाही तर त्यांना ते तारलेले असण्याबाबत कधीच आश्चर्य होणार नाही.  

गंभीर आदराद्वारे प्राप्त होणार्‍या आनंदामध्ये हा एक प्रमुख सहभाग देणारा आहे. देवाचा क्रोध हा गंभीर आदराद्वारे प्राप्त होणार्‍या आनंदामध्ये एक प्रमुख सहभाग देणारा असावा हे विरोधाभासात्मक आहे, हे मला माहित आहे. परंतु ते तसेच आहे

इमारतीच्या 1500 डिग्री अग्नितून आम्हाला अग्निशामकाद्वारे नुकतेच खेचून काढण्यात आलेले आहे हे अजूनही दिसते. आम्ही बघतो. आम्हाला हे जाणवते. आम्ही सर्व धूर बघतो. तडतडणे आम्हाला ऐकू येते. आणि आमच्या निशब्द आनंदी कृतज्ञतेने कंपायमान होणे हे केवळ अनौपचारिकता आहे. 

4. ख्रिस्त आणि त्याच्या कार्याला उंचवा.

ख्रिस्ताला त्याच्या वैभवासाठी आणि त्याच्या साधेपणासाठी उंचवा, त्याच्या दु:खसहनासाठी आणि त्याच्या पुनरुत्थानासाठी, आणि त्याने आमच्याकरिता विकत घेतलेल्या अकल्पनिय श्रीमंतीकरिता त्याला उंचवा. रोम. 8:32, “ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?” निवडलेल्यांना जी प्रत्येक चांगली बाब आतापासून सार्वकालिकतेपर्यंत मिळते ती येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आहे. मी पात्र नाही आणि त्याला त्याची काय किंमत मोजावी लागली हे जाणणे मला माझ्या आनंदातिशयात/ परमानंदात  कंपायमान व्हायला लावते.

5. नवीन जन्माबाबत आश्चर्य करा.

शेवटी, आपल्या लोकांना त्यांच्या स्वत:च्या परिवर्तनाच्या चमत्काराबद्दल शिकवा. नव्या जन्माच्या चमत्काराचे गौरव अनुभवाने कोणालाच माहित नाही. आम्हाला शास्त्र लेखांमधून नवीन जन्माचे केवळ आश्चर्य माहित आहे.

“आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने [देवाने]… ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले” (इफिस. 2:4-6)—हे कोणालाच माहित नाही. ही विस्मयकारी वास्तविकता अनुभवाच्या आधारे कोणालाच माहित नाही. आम्हाला ते माहित आहे कारण ते तसे असल्याचे देव आम्हाला सांगतो. आमच्या लोकांना आम्ही शिकवले पाहिजे की ते अलौकिक प्राणी/ जीव आहेत. बहुतांश लोक भक्तिमंदिरात अगदी नैसर्गिक वाटत/ स्वाभाविक वृत्ती ठेवून येतात, बरोबर? त्यांना वेगळे वाटण्यास आपण मदत केली पाहिजे : “तुम्ही एक चमत्कार आहात. तुम्ही मृतांमधून पुनरुत्थित होऊन चालणारे आहात. तुम्ही ह्यापुढे नैसर्गिक/ स्वाभाविक वृत्तीचे नाही. नैसर्गिक / स्वाभाविक वृत्तीच्या लोकांचा एकत्र येण्याचा हा प्रसंग नाही. आमचा विश्वास, जे आमचे जीवन आहे, तो एक चमत्कार आहे. देवाने तो निर्माण केला. तो एक भरवसा आहे. आमचा विश्वास हा सर्वोच्चरीत्या मौल्यवान तारणारा आणि प्रभू ह्यावरील भरवसा आहे.” 
असे म्हणण्याचे मी धाडस करू का, ह्याप्रमाणे उपदेश करणे,  कालांतराने आपल्या लोकांमध्ये देवाला त्याच्या वचनामध्ये असे भेटण्याचे औत्सुक्य निर्माण करेल की कॉफीचे घोट घेणे हे आपोआपच चुकीचे वाटायला लागेल,?

Episode #2: माझे अंतःकरण कठीण आहे का ?

Alethia4India
Alethia4India
Episode #2: माझे अंतःकरण कठीण आहे का ?
Loading
/

“We avoid getting a hard heart by being in a healthy community of believers who exhort us every day.”

February 1, 2024

पास्टर जॉन यांना विचारा या मराठी पोडकास्ट मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वाचे स्वागत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आत्म-संशयाच्या संघर्षात असलेल्या श्रोत्यांकडून येणारे बरेच प्रश्न आम्ही हाताळले आहेत- याबद्दल की ते खरंच विश्वासात आहेत कि नाही असा प्रश्न; त्यांनी अक्षम्य पाप केले आहे का हे विचारणे; ते विश्वासात आहेत कि मागे गेले आहेत, ते देवाने निवडलेल्यांपैकी एक आहेत का हे विचारणे. यासारखे बरेच विचारशील, भयभीत, आत्मचिंतन करणारे प्रश्न आम्हाला ईमेलमध्ये नेहमीच येतात. आज अहरोनच्या प्रश्नात हे खरे आहे.

“सलाम, पास्टर जॉन! मी प्रथम सांगू इच्छितो की तुम्ही माझ्यासाठी खरोखरच आशीर्वादित आहात. मी तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो. माझे अलीकडेच प्रभूसोबत अधिक चांगले नाते जोडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन करारात मला ‘कठोर अंतःकरणाविषयी’ चा वाक्प्रचार अनेकदा आढळतो. माझा प्रश्न असा आहे:  देवाविरुद्ध माझे मन कठोर झाले आहे हे मला कसे कळेल? याचा अर्थ काय? आणि देवाप्रती माझे मन कठोर होणार नाही याची मी खात्री कशी करू शकतो?”


पास्टर जॉन

प्रथम आपण पवित्र शास्त्रातील “हृदयाची कठोरता” या संकल्पनेचा सामान्य अर्थ समजून घेऊया. त्यानंतर आपण देवाशी संबंधित ख्रिस्ती दृष्टिकोनातून “हृदयाची कठोरता” काय आहे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करूया

भावनाशुन्य हृदय

कठोर हृदयाचा सर्वात सामान्य अर्थ म्हणजे असे हृदय ज्यामध्ये कोमलता आणि करुणेचा अभाव असणे – उदाहरणार्थ, गरीबांबद्दल दया. (अनुवाद 15:7-8) “जर  . . . तुमचा एक भाऊ गरीब झाला असेल तर  . . तुम्ही तुमचे हृदय कठोर करू नका. . . पण तुमच्या गरीब भावासाठी, तुमचा हात आखडू नका ”

“आम्हाला दररोज प्रोत्साहन देणाऱ्या विश्वासणार्यांच्या निरोगी समुदायात राहून आपण कठोर हृदय मिळवणे टाळतो”.

केवळ गरीबांबद्दलच सहानुभूती असणे असे नाही, तर आजारी किंवा अपंगांसाठी देखील दया असणे. मार्क 3 मध्ये, येशू सभास्थानात हात वाळलेल्या एका माणसाला पाहतो आणि त्याला बरे करतो.  मग तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते सशास्त्र आहे?” पण ते उगेच राहिले (मार्क 3:4). इथे ह्या प्रश्नाचे उत्तर देणे काही कठीण नव्हते, बरोबर? जीव वाचवायचा की मारायचा? पण ते गप्प बसले. आणि वचन असे सांगते कि  “मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले” (मार्क 3:5).

म्हणून, “हृदयाची कठोरता” ह्याचा सर्वात सामान्य अर्थ म्हणजे असे हृदय आहे ज्याला इतरांच्या दुःखा प्रती भावना, सहानुभूती, कळवळा वाटत नाही. हे हृदय ज्याला काहीहि वाटत नाही, जाणवू शकत नाही ते दगडासारखे आहे.  तर, जोनाथन एडवर्ड्स, यांच्या ‘रिलिजियस अफेक्शन्स’ या पुस्तकात जे लिहिले आहे ते तुम्हीं वाचावे अशी मी शिफारस करतो; माझ्या आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यावर सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ते माझ्यासाठी  सामर्थ्यवान होते — अनेक शास्त्रभागांचे अध्ययन केल्यावर, हृदयाच्या कठोरपणाची व्याख्या ते अशी करतात,  “कठोर हृदय म्हणजे अप्रभावित हृदय किंवा सद्गुणांच्या भावनांनी सहजासहजी प्रभावित होऊ न शकणारे किंवा दगडासारखे, संवेदनाहीन, मूर्ख, गतिहीन आणि अप्रभावित असे हृदय, ही एडवर्ड्सची व्याख्या आहे.

पश्चात्ताप न करणारे हृदय

“पवित्र शास्त्रामध्ये हीच वास्तविकता आपल्याला दिसते, ज्यामध्ये सुरुवातीला गरीब आणि अपंग लोकांबद्दल सहानुभूती नसणे यापासून ते पुढे जाऊन देवाच्या आवाजाला प्रतिसाद न देणे या स्तरावर पोहोचते.

कठोर हृदय देवाचे ऐकण्यास, पश्चात्ताप करून देवाकडे वळण्यास नकार देते. सिदकिया बद्दल पवित्र शास्त्र सांगते की, “त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.” (2 इतिहास 36:13). दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर त्याला पश्चात्ताप करण्याची आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा वाटली नाही. त्याच्या जीवनात सत्य बोलण्यासाठी संदेष्ट्यानी केलेल्या सर्व प्रयत्नांना तो दगडासारखा अविचारी, प्रतिसाद न देणारा झाला.

रोमकरांस पत्र 2:4-5 मध्ये आपण ते अधिक सामान्यपणे पाहतो: “देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस?” पॉल म्हणतो, देवाचा दयाळूपणा, संयम, सहनशीलता, ह्यामुळे आपले हृदय कृतज्ञता, नम्रता व पश्चात्तापाने वितळले पाहिजे त्याऐवजी ते पाषाणासारखे कठीण निरुत्तर, निश्चल, कृतघ्न, गर्विष्ठ, उद्धट असे हृदय बनले आहे. जेव्हा जखऱ्या संदेष्ट्याद्वारे प्रभूचे वचन लोकांपर्यंत पोहोचले, तेव्हा ते असे म्हणाले,” सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठवलेले नियमशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले”; (जखऱ्या ७:१२).

म्हणून, पवित्रशास्त्रामधील हृदयाची कठोरता हे पाषाणासारखे हृदय असणे असे आहे कारण ते कधीकधी मानवी दुःखांना न समजणारे, अचल, भावनाशून्य, प्रतिसादहीन असते, , परंतु, सर्वात वाईट म्हणजे देवाच्या वचनाबद्दल, देवाच्या दयेबद्दल आणि देवाच्या सुवार्तेबद्दल निरुत्साही, अचल, भावना नसलेले असे आहे.  देवाच्या दयेचा उबदारपणा  त्यावर चमकतो तरी ते वितळत नाही. देवाची कृपा त्यावर ओतली  जाते तरी, ते मऊ होत नाही. हिऱ्यासारखे कठोर हृदय असल्याने तो देवाचा प्रतिकार करतो.

पाषाणाला मांसमय बनवले.

तर, आपण विचारतो, कठोर हृदयापासून कसे मुक्त होऊ शकतो किंवा ते होऊ न देण्यासाठी काय करावे? कठोर हृदयापासून मुक्त होणे हे निर्णायक आहे, पवित्रशास्त्र  म्हणते, ते देवाचे कार्य – एक चमत्कार, एक देणगी आहे  – आणि आपल्याकडे नसल्यास ते आपण मागावे.

यहेज्केल 36:26-27 — हे नवीन कराराचे एक सुंदर विधान आहे जे येशूने पाप्यांसाठी आपले रक्त सांडल्यानंतरच त्याचे पूर्णत्व साध्य झाले.

मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन. म्हणजे, असे कोमल हृदय जे भावनांचा अनुभव घेऊ शकते आणि ज्याला भावनांची जाणीव होऊ शकते. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन.. आणि मी माझा आत्मा तुमच्या ठायी घालीन, तुम्हाला माझ्या नियमांनुसार चालायला लावीन आणि तुम्ही माझे नियम पाळण्याची काळजी घ्या.

मला वाटते कि, हे तेच आहे, ज्याला आपण नवीन जन्म होणे किंवा जिवंत होणे किंवा अंधारातून प्रकाशाकडे बोलावणे म्हणतो. ही एक देवाची देणगी आहे, हा एक चमत्कार आहे, हे देवाचे कार्य आहे आणि आपण ते भेट म्हणून स्वीकारले पाहिजे.

कोमल हृदय ठेवणे

दुसरे म्हणजे, एकदा आपल्याला सौम्य हृदय देण्यात आल्यानंतर, आपल्याला दररोज उपदेश देणाऱ्या आणि पापाचे फसवे स्वरूप ओळखण्यास मदत करणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या निरोगी समुदायात राहून आपण कठोर हृदय होणे किंवा कठोर हृदयाकडे परत जाणे टाळतो. आता, मी असे म्हणतो कारण इब्री 3:13 मला तेच तुम्हाला सांगायला सांगते. ते म्हणते, “जोपर्यंत ‘आज’ म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये”. हे आश्चर्यकारक आहे. अशा चांगल्या समुहात सामील व्हा जिथे तुम्हाला दररोज पापाच्या धोकादायक स्वरूपाविषयी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले जाईल.

पाप हे फसवे असते. ते खोट बोलते आणि ते खोट हृदयाला कठोर करते. जर आपण सत्याने खोट्या पापाचा प्रतिकार केला नाही तर आपली अंतःकरणे कठोर होतील. आणि देवाने सहख्रिस्ती लोकांना सौंदर्य, मौल्यवानता, मूल्य, देवाचे समाधानकारक स्वरूप आणि त्याचे मार्ग आणि पापाचा खोटेपणा या सत्याची आठवण करून देण्यासाठी तयार केले आहे. लोकांनी आपल्या जीवनात ह्या गोष्टी बोलने गरजेचे आहे.

पाप आपल्याला सांगते की देव आणि त्याचे मार्ग समाधानकारक नाहीत. पापाचा हाच मुख्य संदेश आहे. मी पुन्हा सांगतो: पापाचे मुख्य खोटेपणा म्हणजे देव आणि त्याचे मार्ग समाधानकारक नाहीत. आणि जर आपण त्या खोट्या गोष्टींना स्थान दिले तर आपण ते स्वीकारतो; ते आपल्या हृदयात वाढू लागतात मग आपण सर्व-समर्थ  देवासाठी दगड बनतो. देवाऐवजी, पाप आपले समाधान बनते. मग आपल्यालाला पाप आवडू लागते. पाप आपल्याला अश्या प्रकारे फसवते कि आपण त्यात समाधानी आहोत असे वाटते आणि देव कंटाळवाणा आणि असमाधानकारक वाटू लागतो. देवाचा आपल्याला कंटाळू येवू लागतो, आणि जर कोणतेही पाऊल उचलले नाही व आपल्या पापाचा भ्रामक मूर्खपणा जाणवला नाही, तर आपण एखाद्या दिवशी पूर्णपणे दगडासारखे  होऊ, आणि देवाचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. 

म्हणून, इब्री 3:13 म्हणते, “ते होऊ देऊ नका.” त्याऐवजी, तुम्ही बोलावलेले आहात व तुमची निवड केलेली आहे ह्याची पुष्टी करा. तुम्ही कसे खरे ख्रिस्ती आहात हे दाखवा? “तुम्हापैकी कोणीही पापाच्या फसवणुकीने कठोर होऊ नये म्हणून प्रतिदिवशी एकमेकांना देवाच्या वचनातून बोध घ्या व बोध करत रहा.”

Episode #1: लपवून ठेवलेले पाप शारीरिक वेदना देतात का?

Alethia4India
Alethia4India
Episode #1: लपवून ठेवलेले पाप शारीरिक वेदना देतात का?
Loading
/

We should take the Psalms seriously when they picture physical ailments as sometimes owing to unconfessed sin.