तुला निराळेपण कोणी दिलें? आणि जे तुला दिलेंले नाहीं असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेंले असता, दिलेंले नाहीं असा अभिमान तू का बाळगतोस? (1 करिंथ 4:7)
तुम्हीं ज्या घरांत राहता त्या घराप्रमाणें तारणाचे चित्रण उभारा.
ते तुमचे संरक्षण करते. त्यात तुम्हीं आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा साठा ठेवता ज्यामुळें त्यां वस्तू टिकून राहतांत. ते कधीही कुजत नाहीं किंवा त्याचा चुराडाही होत नाहीं. त्याच्या खिडक्या अशा दिशेनें उघडतांत जिथून तुम्हांला अशा वैभवाचा कळस दिसून येतो जो पाहून तुम्हांला सार्वकालिक संतुष्टी मिळते.
देवानें ते खुद्द स्वतःचे आणि त्याचा प्रिय पुत्र याचे प्रचंड मोल देऊन ते बांधले आणि त्यानें ते तुम्हांला विनामूल्य आणि लखलखीत अशा अवस्थेत दिलें.
या घराच्या “खरेदी” कराराला “नवा करार” म्हणतांत. त्यां कराराच्या अटींमध्यें असे लिहिले आहे: “जर तुम्हीं हे घर भेटवस्तू स्वरूपात स्वीकार करतां आणि पिता व पुत्र जे या घरात तुमच्याबरोबर वस्ती करतील त्यांच्याठायीं आनंद करतां तर हे घर तुमचे होईल आणि सर्वकाळासाठीं तुमचेच राहील. तुम्हीं इतर देवतांना आश्रय देऊन देवाच्या घराला अपवित्र करणार नाहीं किंवा इतर वस्तूंकडें आपलें मन वळवणार नाहीं, तर या घरात देवाच्या सहवासात आपलें सर्व समाधान शोधणार.”
या कराराला हो म्हणणें, पण नंतर मात्र त्या घराचे मासिक हप्ते भरण्यासाठीं या आशेने बँकेतून कर्ज घेणें कीं तुम्हीं या घरासाठीं किंमत मोजाल, हे मूर्खपणाचे ठरणार नाहीं का?
तुम्हीं त्यां घराला भेटवस्तू म्हणून मिळालेले नाहीं तर खरेदी करून मिळविलेले घर म्हणून मानाल. देव यापुढे विनामूल्य उपकार करणारा राहणार नाहीं. आणि तुम्हीं स्वतःला अशा विचित्र मागण्यांचे गुलाम बनवून घ्याल ज्यां त्यानें तुमच्यावर टाकण्याचे स्वप्नही पाहिले नव्हते.
जर कृपा ही विनामूल्य व्हावयाची असेल – जो कृपेचा खरा अर्थ आहे – तर आपल्याला त्या कृपेची परतफेड करावी लागेल अशी वागणूक आपण तिला देऊ शकत नाहीं.