संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे… म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेंसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहींत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहींत त्यांचा तो सूड उगवील. आपल्या पवित्र जनांच्या ठायीं गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्या सर्वांच्या ठायीं आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्हीं दिलेल्या साक्षीवर तुम्हीं विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल (2 थेस्सल 1:7-10).
प्रभू येशूनें अभिवचन दिल्याप्रमाणें जेव्हां तो या जगांत परत येईल, त्यावेळी ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला नाहीं त्यांच्याविषयी पौल म्हणतो, “त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.” हे एक असें भयानक दृश्य असणार आहे कीं ज्यामुळें हे सत्य ऐकणाऱ्या सर्वांचा थरकांप उडायला पाहिजें.
आणि हो, आम्हीं जे विश्वास ठेवणारे आहों त्यां आम्हांला यांपासून किती सांत्वन मिळायला पाहिजें आणि कोणती गोष्ट पणास लागली आहे याविषयी आम्हांला किती गंभीर व्हावयाला पाहिजें. आह, जे सुवार्तेवर विश्वास ठेवीत नाहींत आणि सुवार्ता ज्यांच्या कानीही पडत नाहीं अशा लोकांविषयी आपली अंतःकरणें किती कळवळ्याने भरून गेलीं पाहिजेंत.
पण आमच्या सर्व संकटांत आम्हीं धीर धरावा म्हणून येथे पौल आम्हांला उत्तेजन आणि आशेचे दोन शब्द देतो. “संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणें, हे देवाच्या दृष्टीनें न्याय्य आहे.” जर आपल्याला इतिहासाच्या शेवटाजवळ दुःखाची भयानक तीव्रता अनुभवास येत असेल, तर परमेश्वराचे वचन हे आहे: खंबीर असां: तारण जवळ आहे. तुमची संकटे शेवट हा नाहीं. आणि बाह्यरूपाने सामर्थ्यवान दिसणारे तुमचें शत्रू त्या दिवसावर पश्चाताप करून आक्रांत करतील ज्या दिवशी त्यांनी प्रभूच्या लोकांस स्पर्श केला होता.
पण मग उत्तेजन आणि आशेचा उत्तम शब्द येतो. प्रभू आल्यावर आपल्याला केवळ विश्रांती देणार नाहीं, तर आपल्याला सर्वप्रथम ज्यासाठीं उत्पन्न करण्यात आलें आहे, त्याचा सर्वात मोठा अनुभवहि आम्हांस प्राप्त होईल. आपण त्याचे गौरव पाहूं, आणि आपल्यामध्यें त्याचा गौरव होईल यासाठीं कीं सर्व जगानें ते पाहावें हे जाणून आपण आश्चर्यपात्र होऊं.
वचन 10: “आपल्याला पवित्र जनांच्या ठायीं गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठायीं आश्चर्यपात्र व्हावें म्हणून तो येईल,” आपण आश्चर्यपात्र व्हावें यासाठींच आपल्याला घडविण्यात आलें होते. ज्याला वधस्तंभावर खिळण्यांत आले, जो मरणातून पुन्हां उठला, व जो परत येणार आहे असा जो गौरवी राजा, येशू ख्रिस्त ह्याच्यापेक्षा अधिक अद्भुत कांहींही नाहीं आणि कोणीही नाहीं. तो त्याचे गौरव प्राप्त करील, आणि आम्हांला परिपूर्ण, पापरहित, असें होण्याच्या आनंदाची प्राप्ती होईल व आपण सर्वात अद्भुत अशा गोष्टीचे आश्चर्यपात्र होऊं जिचा कधीच शेवट होणार नाहीं.