March 9 : देव तुमची काळजी घेतो

Alethia4India
Alethia4India
March 9 : देव तुमची काळजी घेतो
Loading
/

“म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठीं कीं, त्यानें योग्य वेळी तुम्हांला उंच करावे. त्याच्या वर तुम्हीं आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (1 पेत्र 5:6-7)

भविष्याबद्दल काळजी करणे हे गर्व करण्यासारखे का आहे ?

देव अशा प्रकारे उत्तर देईल ( यशया 51:12  – दुसर्‍या शब्दात ):

मी- परमेश्वर, तुझा निर्माणकर्ता – तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे, तुझी काळजी घ्यायचे मी वचन देतो; जे तुला धमकावतात, ते तर मर्त्य लोक आहेत. त्यामुळे तुझ्या भयाचा असा अर्थ होतो कीं तुझा माझ्यावर विश्वास नाहीं – आणि तुझी काळजी घेण्याकरिता तुझा, तुझ्या स्वत:च्या संसाधनांवर देखील विश्वास नाहीं, तरी तू माझ्या भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत: च्या कमकुवत स्वयंपूर्णेतेवर अवलंबून आहेस. त्यामुळे तुझे सर्व थऱथऱ कापणे- कितीही कमकुवत असेल तरी – ते तुझा गर्व प्रकट करते.

यावर उपाय? स्वतावर विसंबून राहण्याऐवजी देवावर विसंबून रहा, आणि भविष्यातील कृपेसाठीं देवाच्या स्वयंसिद्ध अभिवचनांच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवा.

1 पेत्र 5:6-7 मध्यें, तुम्हीं पाहू शकता कीं, चिंता करणे हे एक प्रकारच्या गर्वा प्रमाणे आहे, “देवा च्या…. पराक्रमी हाताखाली…. लीन व्हा” (आणि वचन 7)” त्याच्यावर तुम्हीं आपली सर्व चिंता टाका”  यातील व्याकरण पहा. वचन 7 हे नवीन वाक्य नाहीं, ते संयुक्त वाक्य आहे, ते एकमेकाला जोडलेले आहे. ते आपण अशा शब्दांत मांडू शकतो : “त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाकून लीन व्हा.”

याचा अर्थ देवावर आपल्यां सर्व चिंता टाकणे म्हणजे त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन होणे असा होतो. हे असे म्हणण्यासारखे आहे कीं, “नम्रपणे जेव…. आपले तोंड बंद ठेवून,” किंवा, “लक्षंपूर्वक गाडी चालव …. तुझी दृष्टि रस्त्यावर ठेवून,” किंवा, “दानशूर हो…. कोणाला तरी घरी भोजनाला आमंत्रित करून,” किंवा,  स्वत:ला लीन कर…. सर्व भय देवावर टाकून.”

स्वत:ला नम्र करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्यां सर्व चिंता देवावर टाकणे. याचा अर्थ, देवावर सर्व चिंता टाकण्यामध्यें आपला गर्व अडथळा निर्माण करतो. याचा अर्थ, आपली गैरवाजवी चिंता एक प्रकारचा गर्वच आहे. कितीही कमकुवत वाटला किंवा दिसला तरी.

तर मग, आपली चिंता देवावर टाकणे हे गर्वाच्या विपरीत कसे आहे ? कारण गर्व हे मान्य करीत नाहीं कीं त्याला चिंता आहेत. किंवा आपण त्यांची काळजी स्वत: घेऊ शकत नाहीं. जर गर्वाला हे मान्य करायचे असेल कीं आपले भयावर नियंत्रण नाहीं, तरी देखील त्याला यावरील उपाय, कीं आपण दुसर्‍या कोणावर तरी विसंबून राहायचे जो आपल्यांपेक्षा जास्त सामर्थ्यशाली आणि ज्ञानी आहे, ते मान्य करायचे नसते.  

दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर, गर्व हा एक प्रकारचा अविश्वास आहे, ज्याला देवाच्या भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवायचा नसतो. पण याउलट, विश्वास हे मान्य करतो कीं त्याला सहाय्याची गरज आहे. गर्व हे मान्य करीत नाहीं. विश्वास देवाच्या सहाय्यावर भरवसा ठेवून राहतो, गर्व हे नाहीं करत. विश्वास सर्व चिंता देवावर टाकतो, गर्व टाकींत नाहीं.

ह्यास्तव, गर्वाच्या अविश्वासावर लढा द्यायचा असेल तर हे कबूल करावें कीं मला चिंता आहेत, आणि देवाचे भविष्यातील कृपेचे अभिवचन “तो तुमची काळजी करतो” याचे मनात जतन करा. आणि मग सर्व चिंता त्याच्या सामर्थ्यशाली बाहुंवर सोपवून द्या.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *