मग त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. (मत्तय 26:37)
ज्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलें त्याच्या आदल्या रात्री येशूचा अंतरात्मा ज्यां अति कष्टांत होता त्याचे पवित्र शास्त्र आम्हांला एक अद्भुत ओझरते दर्शन देते. येशूनें ज्या प्रकारे औदासिन्य अथवा खिन्नतेविरुद्ध आपला गंभीर लढा दिला तो पहा आणि त्याद्वारे शिका.
1. त्यानें त्याच्यासोबत राहण्यासाठीं काहीं जवळच्या मित्रांची निवड केलीं. “त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले” (मत्तय 26:37).
2. त्यानें आपलें अंतःकरण त्यांच्यापुढे मोकळे केलें. त्यानें त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्हीं येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा” (मत्तय 26:38).
3. त्यानें या लढ्यात त्यांस मध्यस्थीची आणि सहभागी होण्याची विनंती केलीं. “त्यानें पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले” (मत्तय 26:38).
4. त्यानें प्रार्थनेत पित्यासमोर आपलें अंतःकरण ओतले. “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो” (मत्तय 26:39).
5. त्यानें देवाच्या सार्वभौम बुद्धीत आपल्या अंतःकरणास विसावा दिला. “तथापि माझ्या इच्छेप्रमाणें नको तर तुझ्या इच्छेप्रमाणें होवो” (मत्तय 26:39).
6. वधस्तंभाच्या दुसऱ्या बाजूला त्याची वाट पाहत असलेल्या गौरवी भविष्यातील कृपेवर त्यानें आपलें डोळे लावले. “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडें बसला आहे” (इब्री 12:2).
जेव्हा तुमच्या भविष्यास भेडसावणारी अशी काहीं गोष्ट तुमच्या जीवनात घडते, तेव्हा हे लक्षात ठेवा: तुमच्या अंतःकरणातील स्फोटकाचे पहिले आघात-तंरग, जसे येशूनें गेथशेमाने येथे अनुभवले, पाप नाहीं. खरा धोका त्याच्या अधीन होणें आहे. त्यास बळी पडणें पाप आहे. कुठलाही आत्मिक लढा न देणें. आणि त्या पापमय शरणागतीचे मूळ आहे अविश्वास – भविष्यातील कृपेत विश्वासासाठीं लढा देण्यात अपयश. येशूमध्यें देव आपल्यासाठीं जे अभिवचन देतो त्यास जोपासण्यात अपयश.
गेथशेमानेमध्यें येशू आपल्याला दुसरा मार्ग दाखवतो. तो वेदनारहित नाहीं, आणि उदासीन नाहीं. त्याचे अनुसरण करा. तुमचे विश्वासू आत्मिक मित्र शोधून काढा. आपलें अंतःकरण त्यांच्यापुढे मोकळे करा. त्यांना विनंती करा कीं त्यांनी तुमच्यासोबत जागे राहावे आणि प्रार्थना करावी. तुमचे अंतःकरण पित्यापुढे ओता. देवाच्या सार्वभौम बुद्धीत विसावा घ्या. आणि देवाच्या मौल्यवान आणि आलिशान अभिवचनांत तुमच्यापुढे जो आनंद ठेवण्यात आला आहे त्यावर तुमचे डोळे लावा.