“हेरोद राजाने हे ऐकले तेव्हां तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेलें;” (मत्तय 2:3)
जे लोक येशूची उपासना करू इच्छित नाहीं त्यांच्यासाठीं तो भीतीदायक आहे, आणि जे त्याची उपासना करतात त्यांच्यासाठीं तो विरोधकांना चीथावतो. शक्यतः मत्तयाच्या मनात हा मुख्य मुद्दा नसावा, पण जस-जशी गोष्ट पुढे वाढत जाते, हे एक अटळ तात्पर्य म्हणून प्रकट होते.
या गोष्टीत, दोन प्रकारचे लोक आहे ज्यांना येशूची उपासना करावयाची नाहीं.
पहिला प्रकार, ते लोक आहेंत ज्यांना येशूबरोबर कांहींहि देणेंघेणें नसते. तो त्यांच्या जीवनात अस्तित्वच ठेवत नाहीं. या गटाचे प्रतिनिधित्व येशूच्या जीवनाच्या सुरूवातीला मुख्य याजक आणि शास्त्री लोकांद्वारे करण्यात आले आहे. मत्तय 2:4 म्हणते, “आणि त्यानें प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले कीं, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे?” आणि त्यांनी सांगितलें, बस इतकेच : आणि नेहमीप्रमाणें ते आपल्या दिनचर्येवर परत गेलें. या पुढार्यांची भयाण शांती आणि औदासिन्यपणा जे काही घडत होते त्या मानानें धक्कादायक आहे.
आणि पाहा,“हेरोद राजाने हे ऐकले तेव्हां तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेलें.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ही अफवा पसरली होती कीं कोणालातरी वाटते कीं ख्रिस्ताचा, म्हणजें मशीहाचा जन्म झाला आहे. पण मुख्य याजकांचे कांहींच न करणें मात्र आश्चर्यचकित करणारे आहे. ते मागी लोकांबरोबर का गेलें नाहीं? त्यांना कांहीं स्वारस्य नव्हतें. देवाच्या पुत्राचा शोध घेऊन आपण त्याची उपासना करावीं याविषयी त्यांना उत्साह नाहीं.
दुसऱ्या प्रकारचे लोक जे येशूची उपासना करू इच्छित नाहींत ते अशाप्रकारचे लोक आहेत ज्यांना त्याची खूप भिती वाटते. या गोष्टीत असा मनुष्य म्हणजें हेरोद. तो खरोखर घाबरला आहे, इतका कीं तो कारस्थान रचतो आणि खोटे बोलतो आणि मग येशूपासून मुक्त होण्यासाठीं जनसामान्यांचा खून करतो.
म्हणून हे दोन प्रकारचे विरोध ख्रिस्ताविरुद्ध आणि त्याच्या उपासकाविरुद्ध उद्भवतील : दुर्लक्ष्य करणारे आणि शत्रूत्व ठेवणारे. मला निश्चितच आशा आहे कीं तुम्हीं त्यापैकीं एकाही गटांत नाहीं.
आणि जर तुम्हीं ख्रिस्ती असाल, तर नाताळाचा हा हंगाम तुम्हांला ख्रिस्ताची उपासना करण्याचा आणि त्याचे अनुसरण करण्याचा अर्थ काय आहे – त्यासाठीं काय किंमत चुकवावी लागते – यावर मनन करावयास संधी देऊ करो.