“तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहींस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहींस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असें म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपलें कामकाज करणार नाहींस, आपला धंदा चालवणार नाहींस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहींस. तर तू परमेश्वराच्या ठायीं हर्ष पावशील; तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असें मी करीन” (यशया 58:13)
देवाचे गौरव न करता देवाचा शोध घेणें शक्य आहे. जर तुम्हांला असें वाटते कीं तुम्हीं देवाचा जो शोध घेतां त्यांत त्याचे गौरव व्हावें, तर मग तुम्हीं त्याचा शोध घ्यावा तो तुम्हांला त्याच्या सहभागितेचा आनंद मिळावा म्हणून घ्या.
याचे उदाहरण म्हणून शब्बाथावर विचार करा. देवाचे लोक देवाचा पवित्र दिवस न पाळतां आपल्याच सुखविलासाचा शोध घेऊं पाहतांत म्हणून तो त्यांची कानउघाडणी करतो. “तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहींस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहींस.” पण त्याच्या बोलण्याचा अर्थ काय? प्रभूच्या दिवशी आपण आपल्या आनंदविलासात मग्न होऊ नये हा त्याचा अर्थ आहे का? नाहीं, कारण पुढे तो म्हणतो, “शब्बाथ आनंददिन आहे.” आणि 14 व्या वचनात तो म्हणतो, “तू त्याचा आदर करशील.” म्हणून तो त्यांना ज्या गोष्टीसाठीं दोष लावतोय ती ही कीं ते शब्बाथ दिवशी आपल्यां परमेश्वराच्या वैभवाठायीं आणि विश्रांतीठायीं आणि पावित्र्याठायीं, ज्याचा तो दिवस द्योतक आहे, हर्ष करण्याऐवजी स्वतःच्या कामकाजात रममाण होत आहेत.
ते पूर्णानंदाचा शोध घेतांत या गोष्टीसाठीं तो त्यांची कान-उघाडणी करित नाहींये. तर तें किती वायफळ गोष्टींत त्याचा शोध घेताहेत या साठीं तो त्यांची कानउघाडणी करत आहे. सी. एस. लुईस यांनी म्हटल्याप्रमाणें, “आम्हीं अगदी क्षुल्लक गोष्टींत आनंदी होतो.” त्यांनी आपला आनंद व समाधान यांचा शोध जगीक गोष्टींमध्यें घेऊ पाहिला आहे, आणि त्यामुळे त्यांनी त्यां गोष्टींचा परमेश्वरापेक्षा अधिक आदर केला आहे.
लक्ष द्या कीं शब्बाथाला “आनंद दिन” म्हणणें हे प्रभूच्या पवित्र दिवसाला “सन्मान्य दिन” म्हणण्यासारखे आहे. जर तू “शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असें म्हणून त्याचा आदर करशील.” याचा अर्थ असा आहे कीं तुम्हांला ज्या गोष्टीमध्यें आनंद वाटतो तुम्हीं त्यां गोष्टींचा आदर करता. किंवा तुम्हांला ज्या गोष्टीमध्यें आनंद वाटतो त्यांचा तुम्हीं गौरव करता.
परमेश्वरामध्यें आनंद घेणें आणि परमेश्वराचा गौरव करणें ह्यां दोन्ही गोष्टीं एकच आहेत. त्याचा सनातन सत्संकल्प आणि आपला सनातन आनंद उपासनेच्या अनुभवात एक होतो. परमेश्वराचा दिवस यासाठींच आहे. खरोखर, संपूर्ण जीवनाचा उद्देश्य हाच आहे.