अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा; परमेश्वराचा गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा! (स्तोत्र 96:7)
जेव्हां स्तोत्रकर्ता “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणा” असें म्हणतो तेव्हां तो येथें त्याला आलेल्या अनुभवाचे किमान कांही प्रमाणांत वर्णन करित आहे. आपण “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणतो” तेव्हां आपण नेमके काय करत असतो?
प्रथम, देवाच्या कृपेने, आपण देवाकडे चित्त लावतो आणि तो किती सामर्थ्यवान आहे हे पाहतो. आम्हीं त्याच्या सामर्थ्यकडे निरखून पाहतो. मग आम्हीं त्याचे सामर्थ्य किती महान आहे ह्याविषयी साक्ष देतो. आम्हीं त्याचे महत्व लक्षात घेऊन जसे कौतुक केले पाहिजे तसे ते करतो.
त्याचे सामर्थ्य अद्भूत असल्याची आपल्याला जाणीव होते. पण ती अद्भुत गोष्ट ज्यांमुळें आपण इतके आश्चर्यचकित होतों कीं आपल्या तोंडून “परमेश्वराचे सामर्थ्य वाखाणा” असें शब्द उसळून निघतांत- – ती गोष्ट म्हणजे ही कीं आपल्याला विशेषकरून याचा आनंद होतो कीं ही सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमची नाही.
तो अति सामर्थ्यवान आहे आणि आपण दुर्बळ आहों या वस्तुस्थितीत आम्हीं स्वतःला सामर्थ्यवान समजतो. हे सत्य अशाप्रकारे आहे हे आपल्याला आवडते. देवाच्या सामर्थ्याचा आपल्याला हेवा वाटत नाहीं. आम्हीं त्याच्या सामर्थ्याचा लोभ करित नाहीं. सर्व सामर्थ्य त्याचे आहे यांत आम्हीं आनंदाने भारावून जातो.
आपले संपूर्ण व्यक्तित्वमत्व, म्हणजे जे कांही मी आहे ते सर्व, स्वतःतून बाहेर निघून त्याच सामर्थ्याकडे निरखून पाहण्यात आनंदित होते – जणू काही आपण आपल्या बाजूच्या धावपट्टीवर धावत असलेल्या धावपटूचा विजयोत्सव साजरा करतो ज्याने आपल्याला शर्यतीत पराभूत केले होते आणि आपण आपल्या पराभवावर दांत खात बसण्याऐवजी त्याच्या सामर्थ्याचे कौतुक करण्यात आपला सर्वात मोठा आनंद मानतो.
जेव्हां आपली अंतःकरणे स्वतःच्या शक्तीवर अभिमान बाळगण्याऐवजी किंवा स्वतःची प्रौढी मिरविण्याऐवजी देवाच्या सामर्थ्याचे वाखाणे करण्यासाठीं स्वतःहून फुटून पडतात तेव्हां आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन काय आहे तें समजते. आपल्याला एका अद्भुत सत्याचा शोध लागतो: आपण देव नाहीं हे सत्य अत्यंत समाधान देणारे आहे, म्हणून देव बनण्याच्या सर्व व्यर्थ कल्पना किंवा इच्छा यांचा आम्हीं त्याग करतो.
देवाच्या सामर्थ्यावर चिंतन केल्यांमुळें आपल्यामध्ये एक अशी जाणीव निर्माण होते कीं देवानें हें विश्व पुढील हेतूनें निर्माण केलें आहे: ह्यासाठीं कीं, आपल्याला आपण देव नाहीं, तर देवाचे देवपण – म्हणजे देवाचे सामर्थ्य- याचे कौतुक करण्याचा अत्यंत समाधानकारक आनंद घेता यावा. ह्या सर्वसमर्थाचे वाखाणे हाच सर्व गोष्टींचा अंतिम व पूर्णानंद देणारा शेवट (निष्कर्ष) आहे याची अनुकूल जाणीव आपल्या अंत:करणांत कायम स्थिरावते.
कोणतेहि सामर्थ्य आपल्यापासून आलें आहे अशी फुशारकी मारण्याचा क्षुल्लकहि मोह झाल्यांस आपण थरथरतो. यापासून आपले रक्षण करण्यासाठीं देवानें आपल्याला दुर्बल असें भांडे बनविले आहे: “ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने कीं, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे” (2 करिंथ 4:7).
अहाहा, काय ही प्रीति, कीं देव त्याच्या सामर्थ्याचे वाखाण करण्याचा जो सार्वकालिक शिखर आहे त्या जागी आपण आपल्या स्वतःचा अभिमान बाळगण्याचा व्यर्थ प्रयत्न करूं नये म्हणून आपले संरक्षण करतो! देव असण्या ऐवजी देवाकडे पाहणे यापेक्षा मोठा आनंद नाहीं!