“तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजें तो तुमच्यांपासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजें तो तुमच्यांजवळ येईल.” (यशया 58:13)
याकोब येथें आम्हास शिकवतो कीं असा एक गोड किंवा मौल्यवान अनुभव आहे ज्याला “अधिक कृपा” पावणें आणि देवाचे “आमच्याजवळ येणें” असें म्हटलें जाते. नक्कीच हा एक अद्भुत अनुभव आहे – अधिक कृपा आणि देवाची विशेष अशी जवळीक. पण मी विचारतो : परमेश्वराच्या प्रीतिचा हा अनुभव बिनशर्त आहे का? नाहीं. असें नाहीं. आमचे स्वतःला लीन करणें आणि देवाजवळ येणें या दृष्टीने प्रीतिचा हा अनुभव सशर्त आहे. परमेश्वर “लीनांवर कृपा करतो… देवाजवळ या म्हणजें तो तुमच्यांजवळ येईल.”
देवाच्या प्रीतिचे अनमोल असें अनुभव आहेत ज्यांच्या प्राप्तीसाठीं आपणास गर्वाशी लढा देण्याची, लीन होण्याची आणि पूर्ण मनाने देवाच्या जवळ येण्याची गरज आहे. ह्यां अटी आहेत. म्हणजें, अशा अटी ज्यां पूर्ण व्हाव्यांत अशी कृति स्वतः देवच आमच्यामध्ये साधून देतो. पण तरी त्यां अशा अटी आहेंत ज्या आमच्यांत पूर्ण होतांत.
जर हे खरे असेल, तर माझ्या चिंतेचे प्रमुख कारण म्हणजें हे कीं देवाची प्रीति ही पूर्णपणें बिनशर्त आहे याविषयीची अशास्त्रीय आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टीनें गाफील अशी आश्वासनें लोकांना त्या सर्व गोष्टी करण्यापासून थांबवू शकतांत ज्यां करण्यांस पवित्र शास्त्र त्यांना आज्ञा देते ज्यां पूर्ण केल्यानें त्यांना त्यां सर्व शांतीचा आनंद प्राप्त होतो जो प्राप्त करण्याची त्यांना तळमळ असते. आपण जर लोकांना “अटीविरहित” शांतीचे आश्वासन देण्याचा प्रयत्न करतो, तर आपण कदाचित त्यांना त्यां निरोगी आध्यात्मिक जीवनापासूनच दूर करून बसणार ज्याच उल्लेख पवित्र शास्त्रांत केलेला आहे.
निश्चितच, देवानें आपली प्रीतिने केलेली निवड, आणि ख्रिस्ताच्या मरणाद्वारे देवाची प्रकट झालेली प्रीति आणि त्याच प्रीतिने त्यानें आपल्याला दिलेला नवा जन्म, या सर्व गोष्टीं पूर्णपणें बिनशर्त आहेत या सत्याची आपण उच्च आणि अगदी स्पष्ट स्वरात घोषणा केली पाहिजें, यांत शंका नाहीं.
शिवाय, आपण अथकपणें या सुवार्तेची घोषणा केलीं पाहिजें कीं आमचे नीतिमान ठरविले जाणें हे ख्रिस्ताचे आज्ञापालन आणि त्यानें स्वतःचे केलेलें अर्पण यांवर आधारित आहे, आपल्या कर्मावर नाहीं (रोम 5:19, “कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगानें पुष्कळ जण पापी ठरलें होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनानें पुष्कळ जण नीतिमान ठरतील.”)
परंतु त्यांच बरोबर, आपण पवित्रशास्त्राच्या या सत्याची घोषणाहि करणें आवश्यक आहे कीं जो कोणी स्वतःला आपल्या दैनदिन जीवनांत लीन करतो आणि देवाजवळ येतो, त्याला देवाची कृपा आणि देवाचा जवळीकपणा यांचा परिपूर्ण आणि मधुर अशा आनंदाचा अनुभव प्राप्त होईल.