“अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहुंचा तुला आधार आहे.” (अनुवाद 33:27)
तुम्हीं कदाचित ह्या क्षणी अश्या काहीं परिस्थितीतून जात असाल जी तुम्हांला वेदनादायक रीतीने येशूच्या व त्याच्या लोकांच्या मौल्यवान सेवेकरिता तयार करत असेल. जेव्हां एखादा व्यक्ति शून्यतेने किंवा असहाय्यपणे रसातळास जातो, तेव्हां त्याला ह्या गोष्टीची जाणीव होईल कीं तो अनादि आश्रय दुर्गाला येऊन पोचला आहे.
मला माझ्या कुटुंबासोबतच्या सकाळच्या भक्तिच्या वेळी वाचलेले स्त्रोत्र 138:6 यातील एका सुंदर वचनाची आठवण झाली, “परमेश्वर थोर आहे, तरी तो दीनांकडें लक्ष देतो.”
तुम्हीं निराशेमध्यें इतकेपण खोल बुडून जाऊ शकत नाहीं कीं देव तुम्हांला पाहत नाहीं किंवा तुमची काळजी करत नाहीं. खरं तर, तो त्या तळाशी तुम्हांला धरण्याकरिता वाट पहात असतो. जसा मोशे म्हणाला, “अनादि देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहुंचा तुला आधार आहे” ( अनुवाद 33:27 ), अगदी त्या प्रमाणे.
होय, तो तुम्हांला थरथरतांना व घसरतांना पहात असतो. तुम्हीं तळाशी पोचण्यापूर्वी तो तुम्हांला पकडू शकतो ( जे तो नेहमी करतो ). पण या वेळी त्याला तुम्हांला कदाचित काहीं नवीन गोष्टी शिकवायच्या असतील.
स्त्रोत्रकर्ता स्त्रोत्र 119:71 मध्यें म्हणतो, “मी पीडित झाल्यांमुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.” तो असे म्हणत नाहीं कीं त्याला त्यात आनंद वाटला किंवा त्याला बरे वाटले. गत गोष्टींचा विचार करून तो केवळ हे म्हणतो कीं, “त्यामुळे माझे बरे झाले.”
मागील आठवडी मी जेम्स स्टुअर्ट ह्या स्कॉटलँड मधील पाळकाचे पुस्तक वाचत होतो. ते असे म्हणतात कीं, “प्रीतिच्या सेवेमध्यें, केवळ जखमी सैनिकच सेवा करू शकतात.” यासाठींच माझा असा विश्वास आहे कीं तुमच्या पैकीं काहीं जणांची कोणत्या तरी प्रीतिच्या मौल्यवान सेवेकरिता तयारी होत आहे. कारण तुम्हीं जखमी आहात.
असे समजू नका कीं तुमची जखम ही देवाच्या कृपेच्या रचने शिवाय आली आहे. ह्या वचनाचे स्मरण करा, “आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाहीं; प्राण हरण व प्राण दान करणारा मीच आहे.” ( अनुवाद 32:39 )
जे तुम्हीं कोणत्या तरी ओझ्या खाली दु:ख सोसत आहात, त्यां तुम्हांला देव विशेष कृपा देऊ करो. देव तुम्हांला सौम्यतेने जी नवी प्रीति देऊ करत आहे तिचा आतुरतेने शोध करा.