त्या दिवसांत असे झालें कीं, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली. क्विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हां सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेलें. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळें तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला, व नावनिशी लिहून देण्यासाठीं, त्याला वाग्दत्त झालेंली मरीया गरोदर असताना तिलाही त्यानें बरोबर नेले. (लूक 2:1-5)
मशीहाचा जन्म बेथलेहेमात व्हावा (मीखा 5:2 मधील भविष्यवाणी दाखविते त्याप्रमाणें) हे देवानें आधीच योजून ठेवले होते हे किती अद्भुत आहे ह्याचा आपण कधी विचार केलात का; आणि त्यानें काही बाबी अशारीतीने योजल्या कीं काळाची पूर्णता झाल्यावर, मशीहाची आई आणि अधिकृत पिता हे बेथलेहेमात नव्हे तर नासरेथात राहात होते; आणि त्याच्या वचनाची पूर्ती करण्याकरिता दोन अप्रसिद्ध, अत्यंत गरीब, हीन-दीन लोकांना त्या पहिल्या नाताळासाठीं बेथलेहेमास आणण्याकरिता, देवानें कैसर औगुस्ताच्या मनात घातले कीं संपूर्ण रोमी जगताची आपापल्या गावी नावनिशी व्हावी? दोन लोकांना सत्तर मैल स्थलांतरित करण्याकरिता संपूर्ण जगाला आज्ञा!
सात अब्ज लोकसंख्या असलेल्या या जगामध्यें, जिथे सर्व बातम्या ह्या मोठ्या राजकिय आणि आर्थिक आणि सामाजिक चळवळी आणि जागतिक स्तरावरील लक्षणीय महत्व प्राप्त व भरपूर सामर्थ्य आणि प्रतिष्ठा असणार्या लोकांबाबत असतात, तिथें मला जाणवते तसे तुम्हांला सुद्धा आपण दीन आणि अप्रसिद्ध आहोत असे कधी जाणवलें आहे का?
आपणास तसे वाटले असेल, तर त्यामुळें स्वत:ला निराश आणि दु:खी होऊ देऊ नका. कारण पवित्र शास्त्रात हे गृहित धरण्यात आलेले आहे कीं सर्व भव्य राजकिय शक्ती आणि विशाल औद्योगिक जाळे, या सर्वांना त्यांच्या नकळकत स्वतः देव चालवितो, त्यांच्या स्वत:करिता नव्हे तर देवाच्या दीन लोकांकरिता—कनिष्ठ मरीया आणि कनिष्ठ योसेफाला नासरेथाहून बेथलेहेमेला आणण्याकरिता. देव त्याचा शब्द पूर्ण करण्याकरिता आणि त्याच्या लेकरांना आशीर्वाद देण्याकरिता एका साम्राज्याला हाती धरून त्याचा उपयोग करतो.
आपण आपल्या अनुभवाच्या जगतामध्यें विपत्ती अनुभवली म्हणून देवाचा हात तोकडा पडला असा विचार करू नका. आमची समृद्धी किंवा प्रसिद्धी नव्हे तर देव त्याच्या संपूर्णमनानें आमचे पावित्र्य शोधत आहे. आणि त्याकरिता तो संपूर्ण जगावर हुकुमत करतो. नीतिसूत्रे 21:1 म्हणते, “राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणें परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडें तो ते वळवतो.” आणि त्याच्या लोकांमध्यें त्याचे तारण आणि त्याचे पवित्रीकरण आणि सनातन संकल्प सिद्धीस नेण्याकरिता तो ते नहेमीच वळवतो.
हीन-दीन लोकांकरिता थोर असा देव आहे, आणि आम्हांला आनंद करण्याचे फार मोठे कारण आहे कीं जगाचे सर्व राजे आणि अध्यक्ष आणि पंतप्रधान आणि कुलपती आणि मुख्य लोक नकळतआमच्या स्वर्गीय देवाची सार्वभौम आज्ञा पाळतात, जेणेंकरून, आम्हीं जी त्याची लहान बालकें त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त ह्याच्या प्रतिरूपाशी एकरूप व्हावे— आणि त्याच्या सार्वकालिक गौरवात प्रविष्ट व्हावे.