31 जानेवारी : दु:खाचे पाच उद्देश

Alethia4India
Alethia4India
31 जानेवारी : दु:खाचे पाच उद्देश
Loading
/

परंतु आपल्याला ठाऊक आहे कीं, देवावर प्रीति करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. (रोमकरांस 8:28)

आमच्यावर येणाऱ्या तात्कालिक व हलक्या संकटाची लहान लहान कारणे आम्हांला क्वचितच माहीत असतात, परंतु तरी आपण विश्वासांत का टिकून राहतो याची लहान लहान कारणे बायबल आपल्याला सांगते.

त्यांपैकी काही कारणें लक्षात ठेवण्याचा एखादा मार्ग शोधून काढणे बरे राहील जेणेकरुन ज्यां ज्यां प्रसंगी आपल्यावर अचानक संकट किंवा दु:ख येते किंवा विश्वासांतील आपल्या प्रिय जनांना त्यांच्या दुःखात मदत करण्याची संधी मिळते, त्यां त्यां प्रसंगी आपण देवाने आपल्याला दिलेल्या काही सत्यांची आठवण करू शकतो ह्यासाठी कीं आपण आशा सोडू नये.

ती कारणें लक्षात ठेवण्याचा एक मार्ग आहे: इंग्रजी शब्दांचे 5 R’ (किंवा उपयुक्त असल्यांस त्यांपैकी फक्त तीन निवडा आणि त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा).

आपल्याला जें दु:ख होतांत त्यांमागे असलेले देवाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:

Repentance: म्हणजे पश्‍चात्ताप – दुःख हे आपल्यासाठी आणि इतरांसाठीं देवाची हाक आहे कीं आपण पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीला देवाच्या वर ठेवण्यापासून वळावे. लूक 13:4-5:

“किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्हीं पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”

Reliance  म्हणजे भिस्त : दुःख या गोष्टीची हाक आहे कीं आपण ह्या जगाच्या जीवन-रक्षक साधनांवर नव्हे तर देवावर भरवसा ठेवावा. 2 करिंथकरांस1:8-9:

आम्हीं आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्हीं जगतो की मरतो असे आम्हांला झाले. फार तर काय, आम्हीं मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्हीं स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले

Righteousness म्हणजे नीतिमत्त्व : दुःख हे आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची शिस्त आहे जी तो आपण त्याच्या नीतिमत्वाचे आणि पवित्रतेचे वाटेकरी व्हावें म्हणून लावतो. इब्री 12:6, 10-11:

“कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीति करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” . . . तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.

Reward म्हणजे प्रतिफळ : दुःख आपल्यासाठी स्वर्गात एक मोठे प्रतिफळ उत्पन्न करत आहे जे आपल्याला इथें होत असलेल्या प्रत्येक दुखाच्या तुलनेने हजारपट मोठे आहे. 2 करिंथकरांस 4:17:

कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते.

शेवटी, Reminder म्हणजे स्मरणपत्र: दु:ख आपल्याला याची आठवण करून देते की देवाने आपल्या पुत्राला दु:ख भोगण्यासाठी जगात पाठवले ह्यासाठी की आपल्यावर येणारे दुःख हे देवाचा न्याय नसून त्याचे शुद्धीकरणाचे कार्य असावें. फिलिप्पैकरांस 3:10:

. . . हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी.

यास्तव, ख्रिस्ती अंत:करण दुःखात जर ओरडत असेल, “का?” तर हे समजण्यासारखे आहे कारण आपल्या जी दु:खे होतांत त्यांची  तात्कालिक व हलकी कारणे आपल्याला माहित नसल्यामुळे – म्हणजे, आताच का, असे का, इतक्या दिवसांपासून का? परंतु ह्या लहान लहान कारणांविषयी आपल्याला असलेल्या या अज्ञानामुळे आपण देवाच्या त्या मोठ्या मदतीकडे दुर्लक्ष करूं नये जी तो आमची त्याच्या वचनांत ह्या दुखामागे असलेला त्याचा हेतू प्रकट करून करतो.

“तुम्हीं ईयोबाच्या धीराविषयी ऐकलें आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्हीं पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले” (याकोब 5:11).

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *