तूं पुराप्रमाणें मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणें क्षणिक आहे, सकाळी उगवणार्या गवताप्रमाणें ते आहेत; सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. ह्याकरिता आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव कीं, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. (स्तोत्र 90:5-6, 12)
माझ्यासाठीं वर्षाचा शेवट हा माझ्या आयुष्याच्या शेवटासारखा आहे. आणि 31 डिसेंबरला रात्री 11:59 वाजेचा क्षण माझ्या मृत्यूच्या क्षणासारखा आहे.
वर्षातील 365 दिवस हे अगदी थोडक्या जीवनासारखे असतात. आणि जेव्हां डॉक्टरांनी मला सांगितले कीं शेवट अगदी जवळ आहे तेव्हां हॉस्पिटलमधील हे शेवटचे तास शेवटच्या दिवसांसारखे आहेत. आणि या शेवटच्या तासांमध्यें, या वर्षाचे आयुष्य माझ्या डोळ्यांपुढे येते आणि मला अपरिहार्य प्रश्नाला तोंड द्यावे लागतेः मी माझे जीवन चांगले जगलो का? येशू ख्रिस्त, जो नीतिमान न्यायाधीश आहे तो असे म्हणेल का, ‘‘शाब्बास, भल्या व विश्वासू दासा’’ (मत्तय 25:21)?
मी स्वतःला खूप आशीर्वादित समजतो कीं अशाप्रकारे माझे वर्ष संपत आहे. आणि मी प्रार्थना करतो कीं वर्षाचा शेवट तुमच्यासाठीं देखील माझ्यासारखाच महत्वाचा व्हावा.
मी स्वतःला खूप आशीर्वादित समजण्याचे कारण म्हणजें अशा प्रकारे स्वतःच्या मरणाची चाचणी परीक्षा अनुभवण्याचा मोठा लाभ मला मिळाला आहे. तुमच्या आयुष्यातील शेवटच्या दृश्याच्या तयारीसाठीं वर्षातून एकदा रंगीत तालीम करणें खूप फायदेशीर आहे. हा एक मोठा फायदा आहे कारण 1 जानेवारीची सकाळ आपल्यापैकीं बहुतेकांना जिवंत, संपूर्ण नवीन आयुष्याच्या उंबरठ्यावर, पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास सक्षम असेल.
तालीम बद्दल मोठी गोष्ट अशी आहे कीं तालीम तुम्हांला तुम्हीं कुठे उणें आहात ते दाखविते, तुमची तयारी कुठे अयोग्य व दोषपूर्ण आहे हे दाखविते; आणि खर्या प्रेक्षकांसमोर नाटकीय स्वरूपातील खर्या घटनेपूर्वी तुम्हांला परिवर्तनाकरिता वेळ देते.
मला असे वाटते कीं तुमच्यापैकीं काहींसाठीं मृत्यूचा विचार इतका अस्वस्थ करणारा, उदास, दुःख आणि वेदनांनी भरलेला आहे कीं तुम्हीं तो तुमच्या मनातून दूर ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करता, विशेषतः सुट्टीच्या दिवसांमध्यें. मला असे वाटते कीं ते मूर्खपणाचे आहे आणि त्याद्वारे तुम्हीं स्वतःला हानी पोहंचविता. मला असे आढळले आहे कीं माझ्या स्वतःच्या मृत्यूबद्दल वेळोवेळी विचार करण्यापेक्षा माझ्या जीवनात अधिक क्रांती घडविणार्या काही गोष्टी आहेत, त्यावर मी विचार करावा.
उत्तमपणें कसे जगावे हे जाणून घेण्यासाठीं तुम्हांला शहाणपणाचे हृदय कसे मिळेल? स्तोत्रकर्ता उत्तर देतोः
तूं पुराप्रमाणें मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणें क्षणिक आहे, सकाळी उगवणार्या गवताप्रमाणें ते आहेत; सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. ह्याकरिता आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव कीं, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. (स्तोत्र 90:5-6, 12)
तुमचे दिवस मोजणें म्हणजें तुमचे आयुष्य कमी आहे आणि तुमचा मृत्यू लवकरच होणार आहे हे लक्षात ठेवणें. महान शहाणपण – महान, जीवन-क्रांतीकारक शहाणपण – वेळोवेळी या गोष्टींवर विचार केल्याने प्राप्त होते.
यशाची कसोटी, पौलाने त्याच्या आयुष्याचे मापन करण्यासाठीं वापरलेले मोजमाप कीं त्यानें विश्वास ठेवला कीं नाहीं हे होते. ‘‘जें सुयुद्ध तें मीं केलें आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे; आतां जें राहिलें तें हेंच कीं, माझ्यासाठीं नीतिमत्त्वाचा मुकुट ठेविला आहे; प्रभु जो नीतिमान् न्यायाधीश आहे तो त्या दिवशीं मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचें प्रगट होणें ज्यांना प्रिय झालें त्या सर्वांनाहि देईल” (2 तीमथ्य 4:7- 8). वर्षाच्या शेवटी ही आमची परीक्षा असू द्या.
आणि जर आपल्याला आढळून आले कीं या वर्षी आपण विश्वास ठेवला नाहीं, तर आपण आनंदी होऊ शकतो, माझ्याप्रमाणें, या वर्षाच्या शेवटी मृत्यू (कदाचित) फक्त एक तालीम आहे आणि संभाव्य विश्वासाचे संपूर्ण आयुष्य आपल्यापुढे पुढील वर्षात ठेवलेले आहे.