
“पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाहीं व ओरडणार नाहीं, व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाहीं. चेपलेला बोरू तो मोडणार नाहीं, व मिणमिणती वात तो विझवणार नाहीं; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.” (मत्तय 12:18-21, यशया 42 मधून अवतरण)
आपल्या पुत्राची सेवक-सदृश्य नम्रता आणि करुणा पाहून पित्याचा जीव आनंदाने उल्लासतो.
जेव्हा बोरू चेपलेला असतो व तो मोडणार तोच हा सेवक तो बरा होईपर्यंत त्याला आपल्या करुणेंने सरळ धरून ठेवतो. जेव्हा एखादी वात मिणमिणती असते आणि विझणारच असते तेव्हां हा सेवक ती वात बाहेर उपटून काढत नाहीं, तर आपला हात तिच्या सभोताल ठेवतो व जोवर ती पुन्हा जळू लागत नाहीं तोवर तिजवर हळूवारपणें फुंकर मारतो.
त्यामुळें पिता घोषणा करतो, “पाहा, हा माझा सेवक, त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे!” पुत्राची ही योग्यता आणि त्याचे हे तेज केवळ त्याच्या वैभवीपणातून किंवा केवळ त्याच्या सौम्यतेतून येत नाहीं, तर ह्या दोन्ही गुणविशेषांच्या सिद्ध एकात्मतेतून उफळून येतांत.
प्रकटीकरण 5:2 मध्यें एक देवदूत, “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” असे मोठ्याने पुकारतो, तेव्हां उत्तर आलें, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे” (प्रकटीकरण 5:5).
‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’ याच्या सामर्थ्यात देव उल्लासतो. म्हणूनच तो इतिहासाच्या गुंडाळीवरचे शिक्के फोडून शेवटच्या दिवसाचा उलगडा करण्यासाठीं देवाच्या दृष्टित पात्र आहे.
पण हे चित्र पूर्ण नाहीं. या सिंहाने जय कसा मिळवला? पुढील वचन त्याच्या स्वरूपाचे वर्णन करते: “तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्यें व वडीलमंडळ ह्यांच्यामध्यें, ज्याचा जणू काय ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मी पाहिला” (प्रकटीकरण 5:6). येशू केवळ ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’ म्हणूनच नव्हे तर ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ म्हणूनही पित्याच्या आनंदास पात्र ठरला आहे.
देवाचा देहधारी झालेंला पुत्र येशू ख्रिस्ता याच्या गौरवाचे हेच वैशिष्ट आहे – वैभव आणि सौम्यता या अद्भुत मिश्रणातून उद्भवलेली एकात्मता.