30 जानेवारी : विजय मिळविणारी कृपा

Alethia4India
Alethia4India
30 जानेवारी : विजय मिळविणारी कृपा
Loading
/

मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.” (यशया 57:18)

ईश्वर-ज्ञानाचे सुशिक्षण (सिद्धांत) पवित्र शास्त्रातून जाणून घ्या. ते जर पवित्र शास्त्रातून असेल तरच ते स्थिर राहते, आणि आत्म्याचे पोषण करते.

उदाहरणार्थ, जर तुम्हांला अप्रतिकारजन्य कृपा म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचे असेल तर ते सुशिक्षण पवित्र शास्त्रातून शिका. अशा पद्धतीने शोध केल्यांस, तुम्हांला कळेल की अप्रतिकारक कृपेचा अर्थ असा नाही की कृपेचा प्रतिकार केला जाऊ शकत नाही; तर त्याचा अर्थ असा की जेव्हा देव निर्णय घेतो तेव्हा तो त्या प्रतिकाराचा पराभव करण्यांस समर्थ आहे आणि तो  पराभव करेल.

उदाहरणार्थ, यशया 57:17-19 मध्ये देव त्याच्या बंडखोर लोकांना ताडन करून आणि त्यांच्याशी विन्मुख होऊन शिक्षा देतो: “त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडन केले, मी विन्मुख झालो, मी त्याच्यावर कोपलो” (वचन 17).

तरी त्यांनी पश्चात्ताप केला नाही. उलट ते विश्वासापासून अजूनहि बहकत गेलें. त्यांनी विरोध केला: “पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला” (वचन 17).

तर मग कृपेचा विरोध केला जाऊ शकतो. वास्तविकता पाहता, स्तेफन यहूदी अधिकाऱ्यांना म्हणाला, “तुम्हीं तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता” (प्रेषितांची कृत्ये 7:51).

मग देव काय करतो? जें पश्चात्ताप करत नाहींत तर विरोध करतांत अशांना तो आपल्याकडे वळवू शकणार नाहीं इतका तो अशक्त आहे का? नाही. तो अशक्त नाही. पुढील वचन म्हणते, “मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन” (यशया 57:18).

तर मग, देवाला प्रतिकूल असलेल्या आणि कृपेचा विरोध करणाऱ्यांविषयीं, देव म्हणतो, “मी त्याला सुधारीन.” तो “मार्ग दाखवील”. तो समाधान करील.”समाधान करीन” या शब्दांचा अर्थ “पूर्ण करणें किंवा बरे करणे” असा होतो. हा शब्द ‘शालोम” म्हणजे “शांती.” ह्या शब्दाशी संबंधित आहे. पुढील वचन त्या संपूर्णतेचा आणि शांतीचा उल्लेख करते, आणि स्पष्ट करते की देव कसा कृपेचा विरोध करणाऱ्या हट्टी मनुष्याला आपणाकडे वळवतो.

तो हे अशा प्रकारे करतो “मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो (शालोम, शालोम); मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो” (यशया 57:19). देव जे अस्तित्वांत नाही ते निर्माण करतो – म्हणजे समाधान, शांती, पूर्णता. अशा प्रकारे आपण तारले जातो. आणि अशा प्रकारे आपल्याला फिरवून मागे देवाकडे परत आणले जाते.

जिथे आभारवचन अस्तित्वात नाहींत तिथे त्यां आभारवचनांची निर्मिती करून देवाची कृपा आपल्या विरोधीपनावर विजय मिळवते. तो जें जवळ आहेत आणि जें दूर आहेत त्यांना शालोम, शालोम देतो. तो जें जवळ आहेत आणि जें दूर आहेत त्यांना पूर्णता देतो. तो असें “समाधान” देऊन करतो, म्हणजेच तो आम्हांला आमच्या विरोधीपनाच्या आजारापासून बरे करतो आणि त्या ठिकाणी आमच्यांत एक दृढ शरणागती शरण निर्माण करतो.

अप्रतिकारजन्य कृपेचा अर्थ असा होत नाही की आपण प्रतिकार किंवा विरोध करू शकत नाही. आपण विरोध करू शकतो, आणि आम्हीं विरोध करू. विषय हा आहे की जेव्हा देव निर्णय घेतो, तेव्हा तो आपल्या विरोधावर मात करतो आणि एक नम्र आत्मा पुनर्स्थापित करतो. तो निर्माण करतो. तो म्हणतो, “प्रकाश होवो!” तो बरा करतो. तो मार्ग दाखवितो. तो सुधारतो. तो समाधान देतो.

म्हणून आपण स्वतः त्याच्याकडे परत वळलो असा अभिमान आम्हीं बाळगत नाही. आणि ज्याने आमच्या सर्व विरोधीपनावर विजय मिळवला त्यां परमेश्वराच्या पायांजवळ आम्हीं पडतो आणि थरथरत आनंदाने त्याचे आभारवचन उच्चारितो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *