
“यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळें भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणें तिच्यात वस्ती होईल. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायीं मी तेजोरूप होईन.” (जखऱ्या 2:4-5)
असे काहीं पहाटेचे प्रसंग आहेत जेव्हा मला बिछान्यावरून उठताच दुर्बळपणा जाणवतो. म्हणजें असहाय. असे का हे अनेकदा कळत नाहीं. धोका कसलाही नसतो. कसलीही कमजोरी नसते. असते ती केवळ एक अशी स्वरूप नसलेली भावना कीं काहींतरी वाईट होणार आहे आणि त्यासाठीं मीच जबाबदार असेल.
असे सहसा तेव्हां होते जेव्हां माझी बरीच टीका झालेंलीं असते. किंवा कदाचित तेव्हां जेव्हां माझ्याकडून बऱ्याच अपेक्षां केल्यां जातांत ज्यांच्या मुदती ठराविक आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनें खूप मोठ्या आणि खूप जास्त वाटतांत.
जेव्हां मी अशा नियतकालिक पहाटे झालेंल्या प्रसंगावर विचार करतांना सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ मागे वळून पाहतो, तेव्हां मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते कीं कशाप्रकारे प्रभु येशूनें माझ्या जीवनाचा व सेवेचा सांभाळ केला आहे. अशा तणावापासून दूर पळण्याच्या ज्यां परीक्षा माझ्यावर आल्या त्यां कधीही विजयी होऊं शकल्या नाहीं- आजवर तर नाहीं. हे अद्भुत आहे. यासाठीं मी माझ्या महान देवाची उपासना व गौरव करतो.
मला भीतीच्या अर्धांगवायूमध्यें बुडू देण्याऐवजी किंवा मला हिरव्या गवताच्या मृगजळात पळून जाऊ देण्याऐवजी, तो मला जागे करायचा कीं अशा वेळी मी त्याच्याकडें मदतीसाठीं धावा केला पाहिजे आणि नंतर तो मला आपल्या ठोस अभिवचनांची आठवण देऊन उत्तरही द्यायचा.
मी एक उदाहरण देतो. आणि हा प्रसंग नुकताच घडला. मी एका पहाटे उठलो तेव्हां मला भावनिकदृष्ट्या दुर्बळपणा जाणवत होता. असहाय. असुरक्षित. मी प्रार्थना केलीं: “प्रभु मला मदत कर. प्रार्थना कशी करावी हेही मला कळत नाहींये.”
एका तासानंतर मी जखऱ्याचे पुस्तक वाचू लागलो आणि ज्या मदतीसाठीं मी धावा केला होता तिचा शोध घेऊ लागलो. आणि मला ते सहाय्य या वचनांत पुरविण्यात आलें :-
“यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळें भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणें तिच्यात वस्ती होईल. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायीं मी तेजोरूप होईन.” (जखऱ्या 2:4-5)
देवाच्या लोकांची अशी समृद्धी आणि वाढ होईल कीं यरुशलेमेला स्वतः भोवती यापुढे तटबंदी देखील उभारता येणार नाहीं. “माणसे व गुरेढोरे” इतके वाढतील कीं यरुशलेम भिंती नसलेल्या अनेक खेड्यांप्रमाणें होईल.
समृद्धी तर ठीक आहे, पण संरक्षणाचे काय?
वचन 5 मध्यें परमेश्वर याचे उत्तर देतो, “परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन.” होय. बस इतके पुरे आहे. हेच ते अभिवचन आहे. परमेश्वराच्या “मी करीन” यां अभिव्यक्तीं. मला त्याचीच गरज आहे.
आणि जर ते यरुशलेमेच्या असुरक्षित खेड्यांच्या बाबतींत खरे आहे तर मग मी जो देवाचे मुल आहे, ते माझ्या बाबतींत देखील सत्य आहे. मी जुन्या करारातील ही अशी अभिवचनें देवाच्या लोकांवर या पद्धतीनेच लागू करतो. सर्व अभिवचने मला ख्रिस्ताठायीं होय हेच आहेत (2 करिंथ 1:20). जे ख्रिस्तामध्यें आहेत त्यांच्यासाठीं प्रत्येक वचनानंतर “किती विशेषकरून” अशी घोषणा आहे. देव माझ्या सभोवार “अग्नीचा कोट” होईन. होय. तो होईल. तो झाला आहे. आणि तो पुढेही होईल.
आणि हे अंशा-अंशाने अधिक चांगले होत जाते. संरक्षणाच्या त्या अग्नी-कोटातून तो म्हणतो, “तिच्या ठायीं मी तेजोरूप होईन.” देव आपलें संरक्षण करण्यासाठीं आपला केवळ अग्नी-कोट बनून तिथेच थांबत नाहीं; तर आपल्याला त्याच्या उपस्थितीचा सुखद आनंद द्यावा हा त्याचा अंतीम हेतू. मला देवाची “मी करीन” ह्या अभिव्यक्तीं खूप आवडतांत!