3 March : चांगुलपणाच्या मनोदयाद्वारें देवाचे कार्य

Alethia4India
Alethia4India
3 March : चांगुलपणाच्या मनोदयाद्वारें देवाचे कार्य
Loading
/

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यासाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्यां देवानें तुम्हांला झालेल्यां ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. 2 थेस्सलनी 1:11

आपले चांगुलपणाचे मनोदय पूर्ण करण्याकरिता देवाच्या सामर्थ्याचा शोध करणे याच अर्थ असा होत नाहीं कीं आपण संकल्पच (मनोदय) करत नाहीं किंवा आपण आपल्यां इच्छाशक्तीचा वापर करत नाहीं.

देवाच्या सामर्थ्याची बाजू आपल्यां इच्छेच्या बाजूची जागा कधीच घेत नाहीं, आपल्यां पवित्रीकरणातील देवाचे सामर्थ्य आपल्यांला निष्क्रिय बनवत नाहीं! देवाच्या इच्छेचे सामर्थ्य आपल्यां इच्छेची जागा न घेता, ते आपल्यां इच्छेच्या मुळाशी किंवा मागे आणि इच्छेमध्यें राहून कार्य करते.

आपल्यांतील इच्छेचा अभाव हा देवाच्या सामर्थ्याचा पुरावा नसून, आपल्यां इच्छेचे सामर्थ्य व आपले आनंदाने इच्छा करणे याचा पुरावा आहे.

जर कोणी म्हणत असेल कीं, “माझा देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास आहे आणि म्हणून मी नुसतं बसून राहणार,  काहींच करणार नाहीं, तर त्याचा देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास नाहीं आहे. कारण जर कोणी देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास ठेवत असेल तर तो का बरं उघडपणे देवाची आज्ञा मोडेल?

जेव्हां तुम्हीं काहींच न करण्याचा निर्णय घेता, तेव्हां तुम्हीं काहींच करत नाहीं असे होत नाहीं. तुम्हीं तुमची इच्छाशक्ती सक्रियपणे काहींच न करण्यासाठीं वापरत आहात. आणि जर तुम्हीं अशाप्रकारे तुमच्या जीवनात येणारे पाप आणि मोहाला हाताळत असाल तर ते देवाची आज्ञा मोडण्यासारखे आहे, कारण आपल्यांला आज्ञा दिली आहे कीं, सुयुद्ध कर (1 तिमथ्य 1:18), सैतानाला अडवा ( याकोब 4:7), पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा ( इब्री 12:14) आणि शरीराची कर्मे ठार मारा ( रोम 8:13).

2 थेस्सलनी 1:11असे म्हणते कीं, आपले चांगुलपणाचे मनोदय आणि विश्वासाचे कार्य हें देवाच्या सामर्थ्याने पूर्ण होतात. म्हणून “चांगुलपणाचे मनोदय” आणि “कार्य” या शब्दाचे महत्व रद्द होत नाहीं. आम्हांला झालेल्यां ह्या पाचारणाला योग्य असे चालण्याकरिता, नीतीमत्वाला शोभेसे कृत्य करण्याच्या सत्संकल्पामध्यें आपल्यां इच्छेला सक्रियपणे सहभागी करणे आवश्यक असते.

जर तुमच्या जीवनात प्रदीर्घ काळापासून काहीं पाप आहे, किंवा तुम्हीं काहीं तरी चांगले कर्म करण्याकडें दुर्लक्ष करत आहात कारण तुम्हीं त्याच्याशी लढा न देताच विजय मिळवू पाहता, तर तुम्हीं तुमच्या आज्ञाभंगामध्यें वाढ करीत आहात. देव त्याच्या सामर्थ्याचा वापर तेव्हांच करतो, जेव्हां आपण आपल्यां इच्छेचा वापर करतो, व आपल्यां इच्छेद्वारें देवाचे सामर्थ्य आपल्यां चांगुलपणाच्या मनोदयातून – आपल्यां सदभावातून आणि योजना आणि उद्देश यातून कार्य करते.

यासाठींच, जे लोक देवाच्या सार्वभौमतेमध्यें विश्वास ठेवतात त्यांनी त्यांच्या इच्छांना पावित्र्यासाठीं झटण्याकरिता सहभागी करण्यास भिऊ नये. “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो कीं, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाहीं.” (लुक 13:24). केवळ विश्वासाने प्रयत्न करीत रहा, व आपल्यां प्रयत्नाद्वारें इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्यां सत्यसंकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे (फिलिप्पै 2:13).

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *