3 December : दीर्घकाळ प्रलंबित भेट

Alethia4India
Alethia4India
3 December : दीर्घकाळ प्रलंबित भेट
Loading
/

“इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्यानें ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे; आणि आपल्यासाठीं त्यानें आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे; हे त्यानें युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते;’ म्हणजें आपल्या ‘शत्रूंच्या’ व आपला ‘द्वेष करणार्‍या’ सर्वांच्या ‘हातून’ सुटका करावी.” (लूक 1:68-71)

लूक 1 मधील अलीशिबेचा पति, जखऱ्या याच्या शब्दांतून निघालेल्या दोन अद्भुत गोष्टींकडें लक्ष द्या.

पहिली, नऊ महिन्यांपूर्वी, जखऱ्याला विश्वास नव्हतां कीं त्याच्या पत्नीला मूल होईल. परंतु आता, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, त्याला येणाऱ्या मशीहात देवाच्या मुक्तीच्या कार्याविषयी एवढा विश्वास आहे कीं तो ते भूतकाळात मांडतो: “त्यानें ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे.” विश्वास ठेवणाऱ्या मनासाठीं, देवाचे अभिवचनदत्त कार्य जणू ते पूर्ण झाल्याइतकेच उत्तम आहे. जखऱ्या हा देवाच्या शब्दावर विश्वास करावयास शिकला आणि म्हणून त्याला ही अद्भुत खात्री पटलीं : देवानें “भेट घेऊन…सुटका केली आहें!” (लूक 1:68).

दुसरी, येशू ख्रिस्ताचे येणें हे देवानें जगाची घेतलेली भेट आहे : इस्राएलाच्या देवानें भेट घेऊन सुटका केली. अनेक शतके, यहूदी लोक या विश्वासाखाली खितपत पडले होते कीं देव हा पाठमोरा झाला होता : संदेशाचा आत्मा थांबला होता; इस्राएल रोमी लोकांच्या हातात दास्यांत पडले होते. आणि इस्राएलातील सर्व भक्तिमान लोक देवाच्या भेटीची प्रतीक्षा करीत होते. लूक आम्हांला सांगतो कीं आणखी एक वृद्ध पुरुष, भक्तिमान शिमोन, होता जो “इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता” (लूक 2:25). त्याचप्रमाणें, प्रार्थनाशील हन्ना ही देखील “यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत” होती (लूक 2:38).

हे मोठ्या आशेनें भरलेलें दिवस होते. जिची ते दीर्घकाळ प्रतीक्षा करित आलें होते ती देवाची भेट आता घडून येणार होती – कोणीही अपेक्षा केली नव्हती अशाप्रकारे तो खरोखर येण्याच्या मार्गावर होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *