“हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केलीं; परंतु त्यानें मला म्हटलें आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. (2 करिंथ 12:8-9)
ख्रिस्ती लोकांना छळवणूकमुळें उद्भवणारी संकटें व दुःखें यांमुळें ज्यां वेदना सोसाव्या लागतांत त्यां कर्करोगामुळें सोसाव्या लागणाऱ्या वेदनांसारख्यांच असतांत का? जर देवानें एखाद्या गोष्टी संदर्भात काहीं अभिवचनें दिलीं तर ती दुसऱ्या गोष्टींवर देखील लागू होतांत का? माझे उत्तर होय आहे. संपूर्ण जीवन, जेव्हां ते देवाच्या गौरवासाठीं आणि इतरांचे तारण व्हावें या कळकळीने विश्वासाद्वारें जगले जाते, तर अशा जीवनांत कोणती ना कोणती अडखळणें आणि दुःखें येतीलच. आज्ञाधारक जीवन जगण्यासाठीं ख्रिस्ती लोकांना जी किंमत मोजावी लागते, दुःखें ही त्याचा एक अविभाज्य भाग आहे जी सोसून तुम्हीं देवानें केलेंलें पाचारण अनुसरत असतां.
ख्रिस्त ज्या मार्गाने घेऊन जातो त्या मार्गाने त्याच्या मागे मागे जाण्याचा निर्धार करून, आपण या मार्गात त्यानें त्याच्या सार्वभौम इच्छेने ज्यां ज्यां गोष्टीं नेमून दिल्यां आहें त्या सर्व गोष्टी निवडतो. अशाप्रकारे, आज्ञाधारकतेच्या मार्गात येणारी सर्व दुःखें व संकटें ही ख्रिस्तासोबत आणि ख्रिस्तासाठीं सोसलेलीं दुःखें व संकटें असतांत- मग ती घरातच झालेला कर्करोग असो किंवा बाहेर अविश्वासणाऱ्यांनी मांडलेला आपला करणारा छळ असो.
शिवाय, ती आपण “निवडलेलीं” असतांत — म्हणजें, जिथें जिथें दुःख आपल्यावर येतांत तिथें तिथें आपण स्वेच्छेने आज्ञाधारकतेचा मार्ग निवडतो आणि आपण देवाविरुद्ध कुरकुर करत नाहीं. आपण अशी प्रार्थना करूं — जशी पौलाने केलीं — कीं हे दुःख माझ्यापासून दूर व्हावे (2 करिंथ 12:8); परंतु जर देवाची इच्छा असेल, तर स्वर्गाच्या मार्गावर असतांना आज्ञाधारक शिष्य म्हणून आम्हांला जी किंमत मोजावी लागते तिचा एक भाग म्हणून आम्हीं ती स्वीकारतो.
ख्रिस्ती आज्ञाधारकतेच्या मार्गात सोसावी लागणारी सर्व संकटें व दुःखें, मग ती छळामुळें उद्भवोत किंवा आजार किंवा अपघात यांमुळें उद्भवोत, त्यां सर्वांचा स्वभावगुण हा एकच आहे : ती सर्व देवाच्या चांगुलपणावर आपल्या विश्वासाला धोका निर्माण करतांत आणि आपण आज्ञाधारकतेचा मार्ग सोडून द्यावा म्हणून प्रवृत्त करतांत.
म्हणून, विश्वासाचा आपला प्रत्येक विजय, आणि आज्ञाधारकतेमध्यें आपली सर्व चिकाटी, ही सर्व देवाच्या चांगुलपणाची आणि ख्रिस्तच आमच्यासाठीं सर्वकाही आहे याची साक्ष देतांत – मग तो शत्रू आजार, सैतान, पाप असो किंवा विध्वंस असो. म्हणून, आपल्या ख्रिस्ती पाचारणाच्या मार्गात आपण सहन करत असलेलीं सर्व दुःखें, नाना प्रकारची सर्व दुःखें ही “ख्रिस्ताबरोबर” आणि “ख्रिस्तासाठीं” आहेंत.
त्याच्याबरोबर या अर्थाने कीं आपण त्याच्याबरोबर विश्वासाने चालत असताना दुःखें आपल्यावर येतांत, आणि या अर्थाने देखील कीं आपण ती सर्व दु:खें त्यां सामर्थ्याने सहन करतो जो तो आपल्याला त्याच्या सहानुभूतीपूर्ण महायाजकीय सेवेद्वारे पुरवतो (इब्री 4:15).
आणि त्याच्यासाठीं या अर्थाने कीं ही दुःखें आपण त्याचा चांगुलपणा आणि सामर्थ्य यांवर किती विश्वास ठेवितो याची कसौटी घेऊन तो प्रमाणित केला जातो, आणि या अर्थाने देखील कीं ही दुःखें तोंच सर्वांमध्यें सर्वकाही भरून काढतो याबाबतींत त्याची योग्यता प्रकट करतांत.