29 March : देवाची प्रीति त्याच्या पुत्रावर जितकीं निश्चित आहे

Alethia4India
Alethia4India
29 March : देवाची प्रीति त्याच्या पुत्रावर जितकीं निश्चित आहे
Loading
/

ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला सर्वकाहीं कसे देणार नाहीं? (रोम 8:32)

देव प्रत्येक दुःखाचे विध्वंसक सामर्थ्य निशस्त्र करतो. तुम्हीं यावर विश्वास केला पाहिजे, नाहींतर ह्या आधुनिक जीवनातील तनाव आणि परीक्षांमध्यें तुम्हीं ख्रिस्ती म्हणून कधीहि उत्कर्ष पावणार नाहीं किंवा कदाचित टिकून राहणार नाहीं.

खूप वेदना आहेत, खूप अडचणी आणि निराशा आहेत, अनेक वादविवाद आणि तनाव आहेत. सर्वशक्तिमान देव प्रत्येक अडचण, प्रत्येक निराशा, प्रत्येक वाद, प्रत्येक तणाव आणि प्रत्येक वेदना घेऊन त्याचें विध्वंसक सामर्थ्य काढून टाकत आहे आणि देवामधील माझ्या आनंदाच्या वाढीसाठीं कार्य करीत आहे यावर माझा विश्वास नसेल तर मी कोठे जावें हे मला माहित नाहीं.

1 करिंथ 3:21-23 मधील पौलाचे अद्भुत शब्द ऐका, “पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाहीं तुमचे आहे; आणि तुम्हीं ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.” जग आपले आहे. जीवन आपले आहे. मृत्यू आपला आहे, ज्याचा अर्थ मी असा घेतो : देव त्याच्या निवडलेल्यां लोकांच्या वतीने असे सर्वोच्च राज्य करतो कीं आज्ञापालन आणि सेवेच्या जीवनकाळात आपल्यांला ज्यां ज्यां संकटाना तोंड द्यावे लागते त्यां सर्वांचा देवाच्या सामर्थ्यवान हाताने पराभव करून त्यांस अधीन केलें जाईल आणि त्यांना आपल्यां पवित्रतेचा सेवक आणि देवामध्यें आपला सार्वकालिक आनंद होईल.

जर देव आमच्यासाठीं असेल, आणि जर देव हा देव असेल, तर हे खरे आहे कीं आमच्याविरुद्ध काहींही यशस्वी होऊ शकणार नाहीं. ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला अचूकपणे आणि विनामूल्य सर्वकाहीं कसे देणार नाहीं  – सर्व काहीं – जग, जीवन, मरण आणि स्वतः परमेश्वर.

रोम 8:32 हा एक मौल्यवान मित्र आहे. देवाच्या भावी कृपेचे अभिवचन अतिशय प्रबळ आहे. पण सर्वांत महत्वाचा म्हणजे पाया आहेः मी त्याला स्वर्गाचा तर्क म्हटलेंले आहे. येथे तो मोर्चा आहे ज्यावर उभें राहून आपण सर्व अडचणींविरुद्ध लढा देऊं शकतो. देवानें स्वतःच्या पुत्राला राखून ठेवले नाहीं! म्हणून! म्हणून! स्वर्गाचा तर्क! म्हणून, ख्रिस्ताने जे विकत घेण्यासाठीं मरण पत्करले ते सर्व – सर्व गोष्टी, सर्व चांगले आणि सर्व वाईट हे आपल्यां कल्यांणासाठीं कार्य करण्याकरिता तो आणखी प्रयत्न करणार नाहीं का!

त्यानें आपल्यां पुत्रावर जितकीं प्रीति केलीं तितकेच हे निश्चित आहे!

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *