. . येशू आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. (1 थेस्सलनी 1:10)
लहानपणी तुम्हीं कधी हरवला अशी एखादी वेळ तुम्हांला आठवते का, किंवा एखादा असा प्रसंग आठवतो का कीं तुम्हीं घसरून पडला किंवा तुम्हीं बुडला असा एखादा प्रसंग आठवतो का? मग अचानक तुमची सुटका झाली. तुमचे ‘‘प्रिय जीवन’’ टिकवून ठेवण्यासाठीं तुम्हांला धरल्या गेलें, तुम्हांला वाचविण्यात आले. तुम्हीं ज्या गोष्टी गमावल्या त्याकरिता तुम्हीं थरथर कापले असाल. परंतु तुम्हीं आनंदी होता. अरे, खूप आनंदी होता आणि आभारी होता आणि आनंदाने थरथर कांपता.
देवाच्या क्रोधापासून माझी सुटका झाल्याबद्दल मला वर्षाच्या शेवटी असेच वाटते. नाताळाच्या दिवशी आम्हीं शेकोटी पेटवत असू. कधी-कधी निखारे इतके गरम असायचे कीं मी ते निखारे आत टाकल्यावर माझा हात थोडा भाजायचा. लगेच मी हात मागे घ्यायचो आणि नरकातल्या पापाविरुद्ध देवाच्या क्रोधाच्या भयंकर विचाराने मी थरथर कापायचो. अरे, ते किती भयानक होते!
नाताळाच्या दुपारी मी एका अशा स्त्रीला भेट दिली जिचे शरीर 87 टक्के जळले होते. ती ऑगस्ट महिन्याासून रुग्णालयात होती. माझे हृदय तिच्यासाठीं तुटत होते. येणार्या युगात नवीन शरीरासाठीं देवाच्या वचनातून तिला आशा बाळगणें किती छान होते! परंतु मी केवळ तिच्या या जीवनातील दुःखाचाच विचार करीत नाहीं, तर येशूनें सार्वकालिक वेदनांपासून मला वाचविले त्याचा देखील विचार करितो.
माझ्या सोबत माझ्या अनुभवांचे परिक्षण करा. हा थरथरणारा आनंद वर्ष संपवण्याचा योग्य मार्ग आहे का? पौलाला आनंद झाला कीं “येशू . . . येणार्या क्रोधापासून आपली सुटका करतो” (1 थेस्सलनी 1:10). त्यानें ताकीद दिली, ‘‘परंतु जें … सत्याला न मानिता अनीतीला मानितात त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश ही येतील (रोम 2:8). आणि “लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि लोभामुळें, आज्ञा मोडणार्या लोकांवर देवाचा कोप होतो’’ (इफिस 5:6).
येथे वर्षाच्या शेवटी, मी बायबलमधून माझा प्रवास पूर्ण करीत आहे आणि शेवटचे पुस्तक, प्रकटीकरण वाचत आहे. ही देवाच्या विजयाची एक गौरवशाली भविष्यवाणी आहे, आणि “जीवनाचे पाणी फुकट” घेणार्या सर्वांचा सार्वकालिक आनंद आहे (प्रकटीकरण 22:17). यापुढे अश्रू नाहींत, आणखी वेदना नाहींत, आणखी उदासीनता नाहीं, आणखी दुःख नाहीं, मृत्यू नाहीं, पाप नाहीं (प्रकटीकरण 21:4).
पण अरेरे, पश्चात्ताप न करण्याची आणि येशूची साक्ष न घ्येण्याची भयावहता! ‘‘येशूची अधिक प्रीती असलेला प्रेषित” (योहान) याने देवाच्या क्रोधाचे वर्णन भयंकर रीतीने केलें आहे. जे देवाच्या प्रीतीचा तिरस्कार करतात ते तोहि ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यांत निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस पितील,’ आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोंकर्यासमक्ष त्याला ‘अग्नि व गंधक ह्यांपासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो; त्यास ‘रात्रंदिवस’ विश्रांति मिळत नाहीं. (प्रकटीकरण 14:10-11).
‘‘ ज्या कोणाचें नांव ‘जीवनाच्या पुस्तकांत लिहिलेलें सांपडलें नाहीं,’ तो अग्नीच्या सरोवरांत टाकिला गेला’’ (प्रकटीकरण 20:15). येशू ‘‘ सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचें ‘कुंड तुडवितो’’ (प्रकटीकरण 19:15). ‘तें द्राक्षकुंड’ नगराबाहेर ‘तुडविलें गेलें;’ त्यांतून रक्त वाहिलें, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांस पोहोंचेल इतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला’’(प्रकटीकरण 14:20). योहानाला झालेंल्या दृष्टांताचा अर्थ काहीही असो, त्याचा एक अर्थ असा आहे कीं अशी एक वास्तविकता आहे जी फार भयंकर आहे, आणि ती सांगणें कठीण आहे.
मी आनंदाने थरथरत आहे कीं मी वाचलो आहे! पण अरेरे, देवाचा पवित्र क्रोध एक भयानक नियती आहे. बंधूंनो, पळून जा. सर्व शक्तीनिशी पळून जा आणि आपण जमेल तितक्या लोकांना वाचवू या! नव्वद नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पाप्यासाठीं स्वर्गात जास्त आनंद आहे (लूक 15:7) यात काही आश्चर्य नाहीं!