29 August : ख्रिस्त येशूमध्यें असणें म्हणजें सहा गोष्टीं

Alethia4India
Alethia4India
29 August : ख्रिस्त येशूमध्यें असणें म्हणजें सहा गोष्टीं
Loading
/

[देवानें] आमच्या कृत्यांप्रमाणें नव्हे तर स्वत:च्या संकल्पाप्रमाणें व कृपेप्रमाणें आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे; ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायीं आपल्यावर करण्यात आली होती. (2 तीमथ्य 1:9)

“ख्रिस्त येशूमध्यें” असणें हे एक अद्भुत सत्य आहे. ख्रिस्ताशी एकरूप होणें चित्तथरारक आहे. ख्रिस्ताशी बांधलेलें.

जर तुम्हीं “ख्रिस्तात” आहांत तर तुमच्या बाबतींत ते काय आहे हे ऐका:

1. जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायीं तुम्हांवर कृपा करण्यात आली होती. दुसरा तीमथ्य 1:9, “ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायीं आपल्यावर करण्यात आली होती.”

2. देवानें जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्हांला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतले. इफिस 1:4, “[देवानें] जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायीं निवडून घेतले.”

3. ख्रिस्त येशूमध्यें देवानें तुमच्यावर अशी प्रीति केलीं जिच्यापासून तुम्हांला कोणतीही गोष्ट विभक्त करू शकणार नाहीं. रोमकरांस 8:38-39, “कारण माझी खातरी आहे कीं, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्यें देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाहीं.”

4. ख्रिस्त येशूमध्यें तुम्हांला मुक्ती आणि तुमच्या सर्व अपराधांची क्षमा मिळाली आहे. इफिस 1:7, “[ख्रिस्तात] त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजें आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे.”

5. ख्रिस्त येशूमध्यें तुम्हीं देवासमोर नीतिमान ठरला आहांत आणि ख्रिस्ताच्या ठायीं देवाचे नीतिमत्व हे तुमचे नीतिमत्त्व गणण्यात आलें आहे. दुसरे करिंथ 5:21, “[ख्रिस्ताला] पाप ठाऊक नव्हते त्याला [देवानें]  तुमच्या-आमच्याकरता पाप असे केलें; ह्यासाठीं कीं, आपण त्याच्या ठायीं देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.”

6. ख्रिस्त येशूमध्यें तुम्हीं नवी उत्पत्ती आणि देवाचे पुत्र झाला आहांत. दुसरे करिंथ 5:17, “म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायीं असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झालें आहे.” गलती 3:26, “तुम्हीं सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात.”

माझी तुमच्यासाठीं अशी प्रार्थना आहे कीं “ख्रिस्त येशूमध्यें” असण्याचा जो अतुल्य विशेषाधिकार तुम्हांला प्राप्त झाला आहे त्यावर चिंतन करण्यापासून आणि त्याचा आनंद घेण्यापासून तुम्हीं कधीही खचून जाऊ नये.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *