हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. (स्तोत्र 25:11)
न्याय्य काय आहे हे जाणून घेण्यासाठीं, देव स्वतःहून ऊंच अशा कोणत्याही अधिकाराशी मसलत करत नाहीं. त्याचा आपला अधिकारच या विश्वातील अंतिम अधिकार आहे. म्हणून, देवासाठीं जे योग्य आहे ते करणें म्हणजें त्याच्या या अंतिम अधिकाराशी जे सुसंगत आहे तेच करणें.
देवाला ज्यांविषयी अमर्याद आवेश आहे आणि जी त्याला परम आनंद आणि प्रसन्नता देणारी आहे ती एक अति मोलवान गोष्ट म्हणजें त्याचे स्वतःचे नीतिमत्व, जो त्याची स्वतःची परिपूर्णता व त्याचा सन्मान आहे. आणि आपल्या परिपूर्णतेसाठीं त्याला असलेल्या या अमर्याद आवेशाच्या विरुद्ध जर तो कधी गेला तर तो अनीतिमान ठरेल – तो एक मूर्तिपूजक ठरेल.
असा नीतिमान देव आपल्यासारख्या देव-निंदक अशा पापी लोकांवर कशी प्रीति करू शकतो? परंतु सुवार्तेच्या बाबतींत थक्क करून टाकणारी गोष्ट म्हणजें हीच आहे कीं जे तारण तो आम्हांला देऊ करतो त्याचा पाया त्याचे स्वतःचे दिव्य नीतिमत्त्व आहे.
पित्याला आपल्या प्रिय पुत्राबद्दल असलेला अमर्याद आदर तोच माझ्यासारख्या एका दुष्ट पाप्यावर त्यां पुत्रामध्यें अशी प्रीति करणें व माझा स्वीकार करणें हे त्याच्यासाठीं शक्य करतो, कारण त्यानें आपल्या मरणाने आपल्या पित्याचा अधिकार आणि गौरव प्रमाणित केला आहे.
ख्रिस्तानें जें केलें त्यामुळें, आपण स्तोत्रकर्त्याच्या प्रार्थनेला नाविन्याने समजून तीच प्रार्थना करू शकतो, “हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे” (स्तोत्र 25:11). या प्रार्थनेविषयी नवी समज ही आहे कीं, आपण फक्त अशी प्रार्थना करण्याऐवजी कीं “तू आपल्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर,” आपण ख्रिस्तामुळें आता अशी प्रार्थना करतो, “हे परमेश्वरा, तू येशूच्या नावासाठीं माझ्या दुष्टाईची क्षमा कर.”
पहिले योहान 2:12 येशूला उद्देशून म्हणते, “मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळें तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे,”. येशूनें आता पापाचे प्रायश्चित्त केलें आहे आणि पित्याचे गौरव प्रमाणित केलें आहे जेणेंकरून “त्याच्या नावामुळें” आपल्या “दुष्टाईची क्षमा” केलीं जावीं.
देव नीतिमान आहे. तो पापाला दंड दिल्यावाचून ते असेच झाकत नाहीं. जर कोण्या पापी मनुष्याला दोषमुक्त करण्यांत आलें तर, कोणी असा आहे जो देवानें त्या पापी व्यक्तीला असेच क्षमा केलें हा डाग त्याजवर लागू नये म्हून देवाच्या गौरवाचे असीम मूल्य प्रमाणित करण्यासाठीं मरण पावतो. ख्रिस्तानें तेच केलें. म्हणून, “हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठीं” आणि “येशूच्या नावामुळें” ही दोन्ही संबोधणें एकच आहेत. आणि म्हणूनच आम्हीं पापांच्या क्षमेसाठीं मोठ्या खात्रीने प्रार्थना करतो.