28 April : मोठी अदलाबदल

Alethia4India
Alethia4India
28 April : मोठी अदलाबदल
Loading
/

“कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाहीं; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला – प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला – तारणासाठीं ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठीं प्रकट झालेंले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे” (रोम 1:16-17)

देवाला स्वीकारणीय ठरावे म्हणून आम्हांला नीतिमत्वाची गरज आहे. पण आमच्यांत ते नीतिमत्व नाहीं. आमच्यांत जे आहे ते म्हणजें पाप.

तर, देवाजवळ जाण्यासाठीं आपल्याला ज्याची गरज आहे आणि ज्यास आम्हीं पात्र नाहीं ते आहे  – नीतिमत्व; आणि आमच्यांत जे आहे, म्हणजें पाप, देव त्याचा तिरस्कार करतो, ते नाकारतो. देवानें या परिस्थितीचे कसे समाधान केलें?

त्याचे समाधान आहे येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र जो आमच्यां बद्दल, म्हणजें आपल्या जागी मरण पावला आणि ज्याने ती दंडाज्ञा स्वतःवर घेतली जी भोगावायांस आम्हीं पात्र आहोंत. “देवानें आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली” (रोम 8:3). कोणाच्या देहाने दंडाज्ञा सहन केलीं? त्याच्या देहानें. कोणाच्या पापास दंडाज्ञा मिळत होती? आमच्यां. ही मोठी अदलाबदल आहे. येथे पुन्हा 2 करिंथ 5:21 मध्ये म्हटलें आहे, “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्यानें तुमच्या-आमच्यांकरता पाप असे केलें; ह्यासाठीं कीं, आपण त्याच्या ठायीं देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.”

देव आमची पापें ख्रिस्तावर टाकतो आणि त्यांस त्याच्याठायीं दंडाज्ञा देतो. आणि ख्रिस्ताच्या आज्ञाधारक मृत्यूमध्ये, देव त्याचे नीतिमत्व पूर्ण करतो आणि प्रमाणित करतो, आणि ते आमच्यां लेखी जोडतो. ख्रिस्तावर आमचे पाप; त्याचे नीतिमत्व आमच्यांवर. अहाहा!

आमच्या सर्वात मोठ्या जीवनाच्या प्रश्नावर ख्रिस्त हा देवाचे उत्तर आहे, आपण याविषयी अधिक अतिशयोक्ती करूं शकत नाहीं. हे सर्व ख्रिस्तामुळे आहे.

तुम्ही ख्रिस्तावर किती अधिक प्रीति कराल? तुम्हीं त्याच्याबद्दल किती अधिक विचार कराल? किंवा कुठल्या गोष्टीपलीकडें त्याचे अतिशय आभार मानू शकता? अथवा त्याच्यावर जास्त अवलंबून राहू शकता?. आमची सर्व क्षमा, आमचे सर्व नीतिमत्व, आमची सर्व धार्मिकता ख्रिस्ताठायीं आहे.

हेच शुभवर्तमान आहे – ही सुवार्ता आहे कीं आमची पापे ख्रिस्तावर टाकली गेली आहेत आणि त्याचे नीतिमत्व आम्हांला परिधान करण्यांत आले आहे आणि ही मोठी अदलाबदल आपल्या कृत्याद्वारे नव्हें तर केवळ विश्वासाने होते. “कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेंले आहे आणि हे तुमच्या हातून झालें असे नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालें नाहीं” (इफिस 2:8-9). ही ती सुवार्ता आहे जी आमचे ओझे उचलते आणि आनंद देते आणि दृढ करते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *