27 जानेवारी : त्याला तुमची गरज माहीत आहे

Alethia4India
Alethia4India
27 जानेवारी : त्याला तुमची गरज माहीत आहे
Loading
/

ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” (मत्तय  6:31-32)

आपल्या शिष्यांनी चिंतामुक्त असावें अशी येशूची इच्छा आहे. मत्तय 6:25-34 मध्ये, तो आपलीं चिंता दूर करण्याच्या उद्देशाने तयार केलेंलें किमान सात तर्क देतो. त्यापैकीं एक तर्क देतांना तो खाणे, पिणे व वस्त्र यांचा उल्लेख करतो आणि लगेच म्हणतो, “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे” (मत्तय 6:32).

येशूला खचितच असे म्हणायचे होते कीं देवाला आमच्या गरजा ठाऊक असणें  ही गोष्ट त्या गरजा पूर्ण करण्याच्या त्याच्या इच्छेशी अनुकूल आहे. आमचा स्वर्गीय पिता आहे असें तो जोर देऊन म्हणतो. आणि हा पिता आमच्या ऐहिक पित्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

मला पाच लेकरं आहेत. मला त्यांच्या गरजा पूर्ण करणं आवडतं. परंतु मला त्यांच्या गरजांची असलेली जाणीव ही देवाला आमच्या गरजांची असलेल्यां जाणीवेपेक्षा कमीतकमी तीन प्रकारे उणी पडते.

सर्व प्रथम, आता ह्या क्षणी मला ठाऊक नाहीं कीं माझी मुलें कुठे आहेत. मी केवळ अंदाजाने सांगू शकतो. ते कदाचित आपापल्या घरी असतील किंवा ऑफिस मध्यें असतील किंवा शाळेत जात असतील, तें सर्व निरोगी आणि सुरक्षित आहेत. पण जर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल, तर तें कुठेतरी रस्त्यावर पडलेलें सुद्धा असूं शकतात.

दुसरे, कोणत्या वेळी ते काय विचार करतात हें मला ठाऊक नाहीं. मी कधी कधी केवळ एक अंदाज लावू शकतो. पण कदाचित त्यांना कुठल्यातरी गोष्टीची भीती वाटत असेल, किंवा त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला असेल, किंवा त्यांना राग आलेला असेल किंवा त्यांना कुठल्यातरी गोष्टीची इच्छा किंवा तिचा लोभ असू शकतो, किंवा ते आनंदी असतील किंवा एखाद्या गोष्टीची आशा करत असतील. मी त्यांच्या मनांत काय चाललय ते पाहू शकत नाहीं. त्यांना तर स्वतःच्या अंत:करानातील गोष्टीं देखील पूर्णपणे ठाऊक नसतील.

तिसरे, मला त्यांचे भविष्य ठाऊक नाहीं. आज तें मला एकदम निरोगी आणि ठणठणीत दिसत आहेत. पण उद्या मात्र त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळू शकतो.

याचा अर्थ असा कीं मला त्यांच्याविषयीं असलेली जाणीव त्यांना स्वतःची काळजी न करण्याचे मोठे निमित्त देऊं शकत नाहीं. त्यांच्या जीवनांत या क्षणी काहीं तरी घडामोडी होत असतील किंवा उद्या घडून येतील ज्यांविषयीं आज मला तिळमात्रहि कल्पना नाहीं. परंतु जेव्हा हींच बाब त्यांच्या स्वर्गातील पित्याच्या बाबतींत येते, तेव्हा दृश्य पूर्णपणे वेगळे आहे. “तुमचा स्वर्गीय पिता!” त्याला आपल्याबद्दल सर्व ठाऊक आहे, म्हणजे आपण कुठे आहों, आणि उद्या कुठे असणार, आपलं मन कसं आहे आणि बाहेरून आपण कसे वागतो, तें सर्वकांही तो जाणून आहे. त्याला आपली प्रत्येक गरज ठाऊक आहे.

याशिवाय, त्याला आपल्या गरजा पूर्ण करावयांची नेहमीच मोठी उत्कंठा लागलेली असते. मत्तय 6:30 मधील विशेषेकरून”  या शब्दाची आठवण ठेवा “जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरून  तुम्हांला पोशाख घालणार नाही काय?”

या व्यतिरिक्त, जे करण्याची त्याला उत्कंठा लागलेली आहे ते करण्यांस तो पूर्णपणे समर्थ देखील आहे (तो एकांच वेळी जगभरातील कोट्यवधी पक्ष्यांना खाऊं घालतो, मत्तय 6:26).

यास्तव, येशू आमच्या सर्व गरजा पूर्ण करतो ह्या त्याच्या वचनावर मजबरोबर विश्वास ठेवा, “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे” असें जेव्हा येशू म्हणतो तेव्हा तो हेंच आवाहन करत आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *