“सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्हीं सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे.” (कलस्सै 1:11).
“समर्थ व्हावे” हा योग्य शब्द आहे. प्रेषित पौलाने कलस्सै येथील मंडळीसाठीं प्रार्थना केलीं, कीं “सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्हीं सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे.” (कलस्सै 1:11). धीर हा आंतरिक सामर्थ्याचा पुरावा आहे.
उतावळे लोक दुर्बळ असतात, आणि म्हणून ते बाहेरील मदतीवर अवलंबून असतात – जसे कीं वेळापत्रके जी योग्य असतात पण त्यांच्या नाजूक हृदयाला आधार देणारी परिस्थिती. त्यांच्या शपथांचा आणि धोक्यांचा आणि त्यांच्या योजनांस आड येणाऱ्या गुन्हेगारांच्या कठोर टीकांचा भडीमार दुर्बळ वाटत नाहीं. पण तो गलबला हे सर्व दुर्बलतेचे आवरण आहे. धीरासाठीं अति विशाल आंतरिक बळाची गरज भासते.
खिस्ती व्यक्तीच्या बाबतींत, हे सामर्थ्य त्याला देवाकडून प्राप्त होते. म्हणूनच पौल कलस्सैकरांसाठीं प्रार्थना करत आहे. तो देवाकडे विनंती करत आहे कीं खिस्ती जीवनासाठीं आवश्यक असलेल्या धीर व सहनशीलतेसाठीं त्यानें त्यांना सामर्थ्य द्यावे. पण जेव्हां तो म्हणतो कीं धीराचे सामर्थ्य हे “(देवाच्या) गौरवाच्या पराक्रमानुसार” आहे, तेव्हां त्याच्या बोलण्याचा अर्थ केवळ हा नाहीं कीं ख्रिस्ती व्यक्तीला धीर देण्यासाठीं दैवीय सामर्थ्याची गरज लागते. त्याच्या बोलण्याचा अर्थ असा कीं या “गौरवाच्या पराक्रमात” विश्वास ते माध्यम आहे ज्याद्वारें धीराचे सामर्थ्य येते.
धीर खरे तर पवित्र आत्म्याचे फळ होय (गलती 5:22), परंतु पवित्र आत्मा (त्याच्या सर्व फळांसह) “विश्वासाने ऐकण्याद्वारें” (गलती 3:5) सामर्थ्य देतो. म्हणून पौल प्रार्थना करत आहे कीं परमेश्वर देव आपल्याला धीरास सामर्थ्य देणाऱ्या “गौरवाच्या पराक्रमाशी” जोडेल. आणि तो जोड म्हणजें विश्वास.