पण आपल्यां अपराधांमध्यें मृत झालों असतांहि (देवानें) ख्रिस्तामध्यें आपणांस जीवंत केलें व कृपेनेच तुमचें तारण झालें आहे. (इफिस 2:5)
महान प्रेषितीय किंवा मिशनरी आशा ही आहे कीं जेव्हां पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानें सुवार्ता सांगितली जाते, तेव्हां जे मनुष्याला करणें अशक्य आहे ते देव स्वत: करतो : तो आम्हांमध्यें तारणदायी विश्वास निर्माण करतो. मनुष्याचे पाचारण जे करू शकत नाहीं ते देवाचे पाचारण करते. त्याची पाचारण मृतांना जिवंत करते. ती आध्यात्मिक जीवन उत्पन्न करते. येशूनें कबरेंत मृत पडलेल्या लाजराला “बाहेर ये” अशी जी हाक मारली त्याच हाकेसारखी ही हाक आहे. आणि मृत पडलेल्या माणसाने त्याची आज्ञा पाळली आणि बाहेर आला. ह्या हाकेने जीवन उत्पन्न करून आज्ञाधारकपणा उत्पन्न केला (योहान 11:43). प्रत्येक मनुष्य असाच तारला जातो.
आपण हाक मारून एखाद्याला झोपेतून उठवू शकतो, परंतु देवाचे पाचारण (हाक) ज्यां गोष्टीं नाहीं त्यां गोष्टीं अस्तित्वात आणावयांस समर्थ आहे (रोमकरांस 4:17). देवाचे पाचारण या अर्थाने अप्रतीरोध्य आहे कीं ते सर्व प्रतिकारांवर मात करण्यांस समर्थ आहे. देवाच्या सत्संकल्पानुसार हे पाचारण चमत्कारीकरित्या प्रभावी आहे – इतके कीं पौलानें म्हटलें, “आणि [देवानें] ज्यांना पाचारण केलें त्यांना त्यानें नीतिमानहि ठरवलें” (रोमकरांस 8:30), तथापि आपण केवळ विश्वासाने नीतिमान ठरविलें जातो.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यांस, देवाचे पाचारण इतके प्रभावी असते कीं ते न चुकता आम्हांमध्यें तो विश्वास निर्माण करते ज्याद्वारे आपण नीतिमान ठरविले जातो. रोमकरांस 8:30 च्या प्रमाणें पाचारण करण्यांत आलेल्यां सर्वांना नीतिमान ठरविले जाते. परंतु विश्वासावांचून कोणीही नीतिमान ठरविला जात नाहीं (रोमकरांस 5:1). म्हणून देव ज्यां हेतूनें पाचारण करतो त्याचा तो हेतू पूर्ण झाल्यावांचून राहत नाहीं. तो अप्रतीरोध्यपणें असा विश्वास अस्तित्वात आणतो ज्या द्वारे तो आम्हांला नीतिमान ठरवतो.
मनुष्य हे करू शकत नाहीं. हे त्याच्यासाठीं अशक्य आहे. पाषाणरुपी-हृदय फक्त देवच काढू शकतो (यहेज्केल 36:26). केवळ देवच लोकांना पुत्राकडे आकर्षित करू शकतो (योहान 6:44, 65). केवळ देवच आध्यात्मिकरित्या मृतावस्थेंत असलेलें अंत: करण उघडू शकतो जेणेंकरून ते सुवार्तेच्या सांगण्याकडे लक्ष देईल (प्रेषितांची कृत्ये 16:14). केवळ उत्तम मेंढपाळ, जो ख्रिस्त, आपल्या मेंढरांना ओळखतो, आणि त्यांना नावाने एका अशा आकर्षक शक्तीने हाक मारतो कीं ते सर्व त्याच्या मागे येतांत – आणि त्यांचा कधीही नाश होत नाहीं (योहान 10:3-4, 14).
देवाची सर्वोच्च सार्वभौम कृपा, जी गोष्ट येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे मनुष्याला अशक्य असलेली गोष्ट अस्तित्वात आणते, ही महान प्रेषितीय किंवा मिशनरी आशा आहे.