“मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडें येतो त्याला कधीही भूक लागणार नाहीं आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाहीं.” (योहान 6:35)
हे वचन या वस्तुस्थितीकडें अंगुलीनिर्देश करते कीं येशूमध्यें विश्वास करणे येशू जे काहीं आहे त्यामधून खाणे आणि पीणे होय. ते असे म्हणणे आहे कीं आमच्या आत्म्याची तहाण येशूनें तृप्त होते, म्हणजे यापुठे मला आणखी तहाण लागत नाहीं.
तृप्तीच्या ज्या शोधांत आम्हीं होतो तो त्याचा शेवट आहे. त्या पलीकडें काहींही नाहीं, आणि काहींही उत्तम नाहीं.
जेव्हां आम्हीं येशूवर तसा विश्वास ठेवतो जसा योहानाचा हेतू होता, तेव्हां येशूचे सान्निध्य आणि अभिवचन इतके संतुष्टिदायक बनते कीं पापाचे भुरळ पाडणारे सुख आमच्यावर प्रभूत्व करू शकत नाहीं (पहा रोम. 6:14). याच कारणामुळे ख्रिस्तामधील असा विश्वास पापाचे सामर्थ्य रद्द करतो आणि आज्ञाधारकपणास समर्थ बनवितो.
योहान 4:14 याच दिशेकडें अंगुलीनिर्देश करते: “परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाहीं; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्यें सार्वकालिक जीवनासाठीं उपळत्या पाण्याचा झरा होईल.” योहान 6:35 नुसार, या ठिकाणी तारणदायी विश्वासाचे साम्य विषयी पाणी पिण्याबारोबर करण्यांत आलें आहे जे आत्म्याची खोल तहान तृप्त करते, आणि तृप्ती जणू ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यासारखी सुपीक बनते.
योहान 7:37-38 देखील यांचविषयीं आहे: “येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्यानें माझ्याकडें यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्यांप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”
विश्वासाद्वारें, ख्रिस्त आमच्याठायी संतोषकारक जीवनाचा एक अक्षय झरा बनतो जो सदाकाळ टिकतो आणि आम्हास स्वर्गात घेऊन जातो, आणि वाटेत आम्हांला इतर समाधानांच्या पातकीं भ्रमांपासून सोडवितो. हे तो आमच्याकडें त्याचा आत्मा पाठवून करतो (योहान 7:38-39).