सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. (1 पेत्र 5:8-9)
आपल्या जिवाचे दोन मोठे शत्रू पाप व सैतान हें आहेत. यांत सर्वात वाईट शत्रू पाप हा आहे, कारण सैतान ज्यां एकमेव रणनीतीने आपला नाश करू शकतो तो म्हणजें आपल्याला पाप करायला लावणें आणि आपल्याला पश्चात्ताप करण्यापासून रोखून ठेवणें. केवळ एकच गोष्ट जिचा परिणाम मरण आहे ती म्हणजें अक्षम्य पाप. सैतान नाहीं.
त्यानें आपल्याला पीडावे, कीं बहुंना आपल्याला जिवें देखील मारावें अशी देव स्वतः त्याला काहीं काळासाठीं परवानगी देऊं शकतो, जसे त्यानें इयोबाच्या बाबतींत केलें, किंवा जसें त्यानें स्मुर्णा येथील पवित्र जनांच्या बाबतींत केलें (प्रकटीकरण 2:10); पण सैतान आपला सार्वकालिक नाश करू शकणार नाहीं वा आपलें सार्वकालिक जीवन हिरावून घेऊ शकत नाहीं. त्याची एकमेव रणनीती ज्याद्वारे तो आपल्याला अंतिम हानी पोहोचवू शकतो ती म्हणजें आपल्याला पापांत पाडणें आणि मग पश्चात्ताप करण्यापासून दूर ठेवणें; तोच त्याचा मुख्य हेतू आहे.
तर मग, आपल्याला पापांत पाडणें, त्याचे समर्थन करणें, त्यासाठीं उत्तेजन देणें, त्यांत सहाय्य करणें, त्यांत असलेल्या आनंदाकडें आकर्षित करणें आणि आपला कल पापाकडेंच असावा याची खात्री करून घेणें, आणि एवढेच काय तर आम्हांला विश्वास आणि पश्चात्ताप यांपासून दूर ठेवणें, हाच सैतानाचा मुख्य नित्यक्रम आहे.
आपण हे इफिसकरांस पत्र 2:1-2 मध्यें पाहू शकतो: “तुम्हीं आपलें अपराध व आपली पातके ह्यांमुळें मृत झालेंले होता; त्या पातकांमध्यें तुम्हीं पूर्वी चालत होता. . . अंतरिक्षातील राज्याचा अधिपती… ह्याच्या धोरणाप्रमाणें चालत होता.” ह्या जगात पाप करणें हे सैतानाच्या “धोरणाप्रमाणें” चालणें होय. जेव्हा तो नैतिकदृष्ट्या एखादी वाईट गोष्ठ घडवून आणत असतो, ती तो पापाद्वारे घडवून आणत असतो. आपण पाप करतो तेव्हा आपण त्याच्या क्षेत्रात वावरत असतो. आपण त्याच्या धोरणाशी सहमत होतो. आपण पाप करतो तेव्हा आपण सैतानाला वाव देतो (इफिस 4:27).
न्यायाच्या दिवशी आपल्याला दोषी ठरवणारी एकमेव गोष्ट म्हणजें क्षमा न झालेंलें पाप – आजारपण किंवा त्रास किंवा छळ किंवा भीती किंवा भयप्रद स्वप्ने ह्या गोष्टीं नव्हे. सैतानाला हे माहीत आहे. म्हणूनच, त्याचा प्राथमिक जोर ख्रिस्ती लोकांना विचित्र घटनांनी कसे घाबरवायचे यावर नसतो (जरी अशा घटना पुष्कळ होतांत ), तर ख्रिस्ती लोकांना व्यर्थ गोष्टींची मोहिनी घालून त्यांना वाईट विचारांनी कसे भ्रष्ट करावे यावर आहे.
सैतान अशा वेळी आपल्याला गिळून टाकण्याच्या शोधांत असतो ज्यावेळी आपला विश्वास दृढ नसतो, जेव्हा तो भेद्य असतो. ही गोष्ट समजण्यास सोपी आहे कीं सैतानाला ज्या गोष्टीचा नाश करायचा असतो नेमकीं तिच त्याच्या प्रयत्नांचा प्रतिकार करण्याचे शस्त्र आहे. म्हणूनच पेत्र म्हणतो, “त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा” (1 पेत्र 5:9). म्हणूनच पौल सुद्धा म्हणतो कीं “विश्वासाची ढाल” “त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवते” (इफिस 6:16).
सैतानाचा जर पराभव करायचा असेल तर त्यासाठीं एकमेव रणनीती म्हणजें ही कीं तो ज्या गोष्टीचा नाश करण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करीत असतो – तो म्हणजें तुमचा विश्वास- त्यांत दृढ असे उभे राहणें.