आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडें पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडें बसला आहे. (इब्री 12:2)
येशूचे उदाहरण ख्रिस्ती पूर्णानंदाच्या तत्त्वाशी विरोधक आहे का? म्हणजें हे कीं, प्रीति आनंदाचा मार्ग आहे आणि हे कीं मनुष्यानें याच कारणामुळें हा मार्ग निवडला पाहिजे, असे न होवो कीं कोणी सर्वशक्तिमान देवाची आज्ञा पाळण्याच्या बाबतींत गोंधळात पडलेला किंवा कृपेचे साधन बनण्याच्या विशेषाधिकाराशी असंतुष्ट असलेला किंवा प्रतिज्ञेच्या प्रतिफळांना कमी लेखताना आढळून येवो.
इब्री लोकांस 12:2 अगदी स्पष्टपणें सांगतांना दिसून येते कीं येशूनें या तत्त्वावर आक्षेप घेतला नाहीं वा त्याचा नकार केला नाहीं.
आजवर घडलेले प्रीतिचे सर्वात मोठे परिश्रम शक्य झालें कारण येशूनें जो सर्वात मोठा आनंद त्याच्यापुढे होता त्याकडें आपली दृष्टि लावली, म्हणजें, लोकांच्या सभेत देवाच्या राजासनाच्या उजवीकडें उंच केलेंल्याचा आनंद : म्हणजें तो आनंद ज्याकरता “त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला!”
हे सांगताना, लेखक येशूचे आणखी एक उदाहरण देतो, आणि त्यांत तो इब्री 11 मध्यें वर्णिलेल्या इतर पवित्रजनांचाहि उल्लेख करतो, म्हणजें त्यांचे उदाहरण जें त्यांच्यापुढे देवानें ठेविलेल्या आनंदासाठीं इतके आवेशी आणि विश्वासाने भरलेले होते कीं त्यांनी “पापाचे क्षणिक सुख भोगणें” सुद्धा नाकारले (इब्री 11: 25) आणि देवाच्या इच्छेशी एकरूप होण्यासाठीं दुःख सोसणें पसंत करून घेतले.
म्हणून, गेथसेमानेच्या त्या काळोख्या रात्री ख्रिस्ताला ज्या गोष्टीने दुख सहनांत टिकवून ठेवले तिचे किमान एक पक्ष त्या आनंदाची आशा होती जो वधस्तंभाच्या पलीकडें त्याच्यासाठीं ठेविलेला होता असे म्हणणें बायबल-विरोधी कथन होणार नाहीं. त्यामुळें आपल्यावरील त्याच्या प्रीतिची वास्तविकता आणि महानता कमी होत नाहीं, कारण ज्या आनंदाची त्याला आशा होती तो आनंद पुष्कळ पुत्रांना गौरवात आणण्याचा आनंद होता (इब्री 2:10).
त्याचा आनंद आपल्याला मुक्ती मिळावी यांत होता, जिचा परिणाम देवाचे गौरव आहे. आम्हीं येशूबरोबर त्याच्या आनंदाचे भागीदार बनतो आणि गौरव देवाचे होते.