“ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन.” (निर्गम 33:19)
ताठ मानेच्या ह्या लोकांवर ज्यांनी नुकतीच मूर्तिपूजा केलीं आणि ज्या देवानें त्यांना मिसर देशातून बाहेर काढले त्याची निंदा केलीं तोच देव खरोखरच दया करील या आशेची मोशेला गरज होती.
मोशेला आवश्यक असलेली आशा आणि खात्री देण्यासाठीं, देव म्हणाला, “ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, “मी जी निवड करतो ती मनुष्यांच्या दुर्गुणांवर किंवा सद्गुणांवर अवलंबून नसून केवळ माझ्या स्वतंत्र, सार्वभौम इच्छेवर अवलंबून आहे. म्हणून कोणीही असे म्हणू शकत नाहीं कीं तो मनुष्य इतका वाईट आहे कीं त्याच्यावर कृपा केलीं जाऊच शकत नाहीं.” जर निवड ही मनुष्यांच्या दुर्गुणांवर किंवा सद्गुणांवर अवलंबून असती तर देव स्वतंत्र नाहीं आणि त्याची निवड अटविरहित नाहीं असा याचा अर्थ होईल.
अटविरहित निवडलें ज्याण्याचा सिद्धांत हा सर्वात वाईट पापी लोकांसाठीं आशेचा महान सिद्धांत आहे. म्हणजें जेव्हा कृपेसाठीं पात्र होण्याचा विचार येतो तेव्हा तुमच्या पार्श्वभूमीचा देवानें केलेंल्या तुमच्या निवडीशी काहींही संबंध नाहीं. हे तर शुभवर्तमानाचेच एक स्वरूप आहे.
जर तुमचा नव्याने जन्म झाला नसेल आणि येशू ख्रिस्तावर जो तारणहार विश्वास तो जर तुम्हांला दिला गेलेला नसेल, तर तुमचा पूर्वायुष्यातील अत्याधिक दुष्टपणा किंवा मनाची कठोरता ही तुमच्या जीवनात देवाच्या कृपेंत मोठा अडथळा बनत आहे असा विचार करून नैराश्याच्या डोहांत बुडू नका. अति वाईट पापी लोकांवर कृपा करून त्यांच्या तारणांत आपल्या कृपेच्या स्वातंत्र्याचा गौरव करणें देवाला आवडते.
आपल्या पापापासून वळा; परमेश्वराला हाक मारा. या दैनंदिन भक्तीमध्येंही, जे तुम्हीं वाचत आहात किंवा ऐकत आहात, तो तुमच्यावर कृपा करत आहे, आणि तुम्हीं दयेसाठीं त्याच्याकडें यावें असे उत्तेजन तो तुम्हांला देत आहे.
“परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील” (यशया 1:18).