कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत; इतकेच केवळ नाहीं, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायीं अभिमान बाळगतो. (रोमकरांस 5:10-11)
आपण व्यवहारिकरित्या देवाबरोबर समेट प्राप्त करून देवाच्याठायीं कसा अभिमान बाळगतो? आम्हीं तो अभिमान येशू ख्रिस्ताद्वारे बाळगतो. ज्याचा अर्थ कमीत कमी, हा आहे कीं आम्हीं बायबलमधील येशूचे प्रतिरूप – म्हणजें, येशूचे कार्य आणि शब्द ज्यांचे नव्या करारात वर्णन करण्यात आले आहे – आम्हीं त्या प्रतिमेस देवाच्याठायीं आमच्या अभिमानाचा, जयजयकाराचा तात्विक विषयवस्तू बनवतो. ख्रिस्ताला आमचा विषय मानिल्यावाचून देवाच्याठायीं अभिमान बाळगल्याने ख्रिस्ताचा गौरव होत नाहीं. आणि जेथे ख्रिस्ताचा मान नाहीं, तेथे देवाचा मान नाहीं.
2 करिंथ 4:4-6 मध्यें, पौल तारणाचे दोन प्रकारे वर्णन करतो. वचन 4 मध्यें, तो म्हणतो कीं ते “देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश” पाहणें होय. आणि 6 व्या वचनात तो म्हणतो कीं ते “येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश” पहाणें होय.
देवाच्याठायीं अभिमान बाळगण्यासाठीं आम्हीं येशूच्या प्रतिमेत जे काही पाहतो आणि त्याद्वारे देवाविषयी जें कांहीं जाणतो, त्यात आम्हीं अभिमान बाळगतो. आणि जेव्हां देवाची प्रीति पवित्र आत्म्याद्वारे आमच्या अंतःकरणात ओतली जाते तेव्हां रोमकरांस 5:5 मध्यें म्हटलें आहे त्याप्रमाणे हे त्याच्या पूर्ण अनुभवांत प्रगट होते. आणि वचन 6 च्या ऐतिहासिक वास्तविकतेवर जेव्हां आम्हीं मनन करतो, तेव्हां मधूर, देवाच्या प्रीतिचा आत्म्याने दिलेंला अनुभव मध्यस्थीद्वारे आम्हांला दिला जातो, ”आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठीं मरण पावला.”
तर मग, येथे नाताळाचा मुद्दा आहे. देवानें प्रभु येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे फक्त आमचा समेटच विकत घेतला नाहीं (रोमकरांस 5:10), आणि त्यानें फक्त आम्हांला प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तो समेट स्वीकार करावयास सक्षम केलें नाहीं, तर आता सुद्धा आम्हीं आत्म्याने, आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे स्वतः देवामध्यें आनंद करित त्याच्याठायी अभिमान बाळगतो (रोमकरांस 5:11).
येशूनें आमचा समेट विकत घेतला. येशूनें आम्हांला समेट स्वीकारावयास आणि बक्षीस उघडण्यास सक्षम केलें. आणि येशू स्वतः अवर्णनीय बक्षीस किंवा भेट म्हणून स्वतः प्रकाशमान होतो – देहधारी परमेश्वर – आणि देवाच्याठायीं आमचा सर्व अभिमान व आनंद यांस प्रेरित करतो.
या नाताळाच्या समयी येशूकडें पाहा. त्यानें विकत घेतलेला समेट स्वीकार करा. बक्षीस न उघडता शेल्फवर ठेवू नका. आणि जेव्हां तुम्हीं ते उघडाल तेव्हां लक्षात ठेवा कीं देव स्वतः देवाबरोबर समेटाचे बक्षीस आहे.
त्याच्याठायीं अभिमान बाळगून उल्हास करा. त्याला तुमचा आनंद म्हणून अनुभव करा. त्याला तुमची संपत्ती म्हणून जाणून घ्यां.