पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीनें चांगलें आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठीं जड अन्न आहे. (इब्री 5:14)
पाहा, हे किती अद्भुत आहे. हे समजून घ्यां. हे तुमची वर्षे वाया जाण्यापासून वाचवील.
या वचनाचा अर्थ असा आहे कीं जर तुम्हांस प्रौढ व्हावयाचे असेल आणि वचनाची आणखी जड अशी शिकवण समजून तिचे महत्व जाणायचे असेल, तर परमेश्वराच्या सुवार्तेत असलेल्यां अभिवचनांच्या समृद्ध, पोषक तत्वांनी भरपूर, आणि बहुमूल्य दुधामुळें तुमची नैतिक ज्ञानेंद्रिये – तुमचे आत्मिक मन – बदलने गरजेचे आहे- यासाठीं कीं तुम्हांला चांगलें आणि वाईट समजण्याचा सराव व्हावा.
किंवा, मीं हे दुसऱ्या शब्दांत मांडतो. परमेश्वराच्या सर्व वचनाचा आस्वाद घेण्यास तयार होणें प्रथमतः एक बौद्धिक आव्हान नाहीं; ते प्रथमतः एक नैतिक आव्हान आहे. जर तुम्हांला वचनाचे जड अन्न खावयाचे असेल , तर तुम्हीं तुमच्यां आत्मिक ज्ञानेंन्द्रियांस तसा सरावही दिला पाहिजे, यासाठीं कीं तुमच्यांठायीं असें मन उत्पन्न व्हावे ज्यास बऱ्यावाईटाची ओळख आहे. हे फक्त बौद्धिक आव्हान नसून एक नैतिक आव्हान आहे.
उल्लेखनीय सत्य हे आहे कीं, जर तुम्हीं उत्पत्ती आणि इब्रीकरांस लिहिलेंल्या पत्रातील मलकींसदेकास समजून घेण्याविषयी अडखळणत असाल तर त्याचे कारण कदाचित हे असू शकते कीं तुम्हीं दूरदर्शनावरील आक्षेपार्ह कार्यक्रम पाहता. देवानें जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या लोकांची केलेलीं निवड यामुळें जर तुम्हीं अडखळत असाल, तर कदाचित त्याचे कारण हे आहे कीं तुम्हीं अजूनही कुठल्यातरी लबाड टीवी उपदेशाकाला ऐकत आहां. जर तुम्हीं वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या परमेश्वर-केंद्रित कार्याबाबत अडखळत असाल, तर याचे कारण कदाचित हे आहे कीं तुमचे पैशावर प्रेम आहे आणि तुम्हीं जास्त खर्च करता आणि फार कमी देता.
प्रौढपणाकडे आणि पवित्र शास्त्राच्या जड अन्नाकडे जाणारा मार्ग प्रथमतः बौद्धिक व्यक्ती बनणें नाहीं, तर आज्ञाधारक व्यक्ती बनणें आहे. तुम्हीं दारू आणि यौनसंबंध आणि पैसा आणि फुरसतीची वेळ आणि अन्न आणि कम्प्युटर यासोबत काय करता, आणि तुम्हीं इतर लोकांशी कसे वागता, याचा संबंध तुम्हीं कोणत्या शाळेत जाता किंवा कोणते पुस्तक वाचता यापेक्षा जड अन्न पचविण्याच्या तुमच्यां क्षमतेशी आहे.
हे अत्यंत महत्त्वाचे आहे याचे कारण आपल्या उच्च तंत्रज्ञानसंपन्न समाजात आपण असा विचार करण्याची शक्यता असते कीं शिक्षण – विशेषेकरून बौद्धिक शिक्षण – प्रौढपणाची किल्ली आहे. असें अनेक पीएच.डी. झालेलें लोक आहेत जे त्यांच्या आध्यात्मिक अप्रौढत्वात परमेश्वराच्या गोष्टींवर अडखळतात. आणि असें अनेंक कमी-शिक्षित पवित्र जन आहेत जे अतिशय प्रौढ आहेत आणि जे परमेश्वराच्या वचनाच्या गहन गोष्टींवर भरण-पोषण पाऊन प्रगती करूं शकतांत.