ह्या पुस्तकात लिहिली नाहींत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूनेंआपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्हींविश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. (योहान 20:30-31)
मला इतक्या प्रकर्षाने असें वाटते कीं आमच्यापैकीं जे लोक मंडळीत लहानाचे मोठे झालेंत आणि आपल्या झोपेतही आपल्या विश्वासाचे मोठमोठे सिद्धांत मुखपाठ म्हणूं शकतात, आणि तरीही जे प्रेषितांचा मतांगिकार म्हणतांना जांभई देतात – कीं आमच्यामध्यें असे कांहीं कार्य घडून आलें पाहिजे ज्यामुळें पुन्हा एकदा आम्हांला देवाच्या ह्या पुत्राचा, जो सनातन काळापासून पित्याचा एकुलता एक पुत्र आहे, देवाचे सर्व तेज प्रतिबिंबित करतो, त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे, ज्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्यात, आणि जो आपल्या सामर्थ्याच्या शब्दानें विश्वाधार आहे, त्याचा आदर, भिती, विस्मय आणि आश्चर्य वाटेल,
तुम्हीं कोणतीही लिहिलेली प्रत्येक परिकथा वाचू शकता, प्रत्येक रहस्य-रोमांच, भुताच्या गोष्टी वाचू शकता, आणि तुम्हांला देवाच्या पुत्राच्या देह धारणेंच्या गाथेसारखे इतके विस्मयकारक, इतके विचित्र, इतके तऱ्हेवाईक, इतके मंत्रमुग्ध करणारे असे कधीहि काहीहि आढळणार नाहीं.
आम्हीं कसें मेलेलें आहोत! हे देवा! तुझें गौरव आणि तुझी महती याविषयी आम्हीं किती बेपर्वा आणि निष्ठूर आहोत! मला कितीदा तरी पश्चाताप करावा लागला आणि म्हणावे लागले, “देवा, मला दुःख वाटते कीं तुझ्या स्वतःच्या खऱ्यागोष्टीपेक्षा मनुष्यनिर्मित कथा माझ्या भावना उद्वेलित करतात, माझा विस्मय आणि आदर आणि प्रशंसा आणि आनंद प्रेरित यांस करतात.”
कदाचित आमच्या काळातील रोमांचक चित्रपट आमच्यासाठीं कमीत कमी हे चांगले करू शकतात : ते आम्हांस नम्र बनवू शकतात आणि आमच्यात पश्चातापभावना निर्माण करू शकतात, आम्हांस हे दाखवून कीं आम्हीं खरोखर काही विस्मय आणि भिती आणि आश्चर्य प्रगट करण्यास सक्षम आहोत जे आम्हांला अगदी क्वचितच अनुभवास येते जेव्हां आम्हीं सनातन देवावर आणि ख्रिस्ताच्या स्वर्गीय गौरवावर आणि त्यांच्यामधील आणि आमच्यामधील नासरेथच्या येशूसोबत खऱ्या जीवन संपर्कावर मनन करतो.
जेव्हां येशूनें म्हटलें, “मी ह्यासाठीं जगात आलो आहे” (योहान 18:37), तेव्हां त्यानें असे काही म्हटलें जे तुम्हीं कधी वाचलेल्या कोणत्याही काल्पनिक विज्ञान कथेतील विधानासारखे खुळचट आणि विचित्र आणि विक्षिप्त आणि भयावह आहे.
ओह, मी कितीतरी प्रार्थना करतो कीं देवाचा आत्मा मजवर आणि तुमच्यावर सामर्थ्यानें उतरून यावा; पवित्र आत्म्याने भयावह पद्धतीने माझ्या अनुभवात प्रगट व्हावे, आणि मला देवाच्या अकल्पनीय वास्तविकतेचे भान येण्यासाठीं जागृत करावे.
या दिवसांत कधीतरी उदयाचलापासून तो अस्ताचलापर्यंत वीज आकाशास व्यापून टाकील, आणि देवाचा पुत्र आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसह प्रकट होईल. आणि आम्हीं त्याला स्पष्टपणें पाहू. आणि भितीमुळें असो अथवा उत्साहमुळें, आम्हीं कंपायमान होऊ आणि विचार करू कीं आम्हीं अशा घरगूती, निरूपद्रवी ख्रिस्तासोबत इतका काळ कसे राहिलो.
या गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत – संपूर्ण बायबल लिहिण्यात आले आहे – कीं आम्हीं विश्वास ठेवावा – कीं आम्हीं या चमत्काराप्रत विस्मित आणि जागृत व्हावे – कीं येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे जो जगात आला.