कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. (फिलिप्पै 4:6)
आपण आपल्या विनंत्या देवाला कळवतो तेव्हा आपण ज्या गोष्टींसाठीं आभारप्रदर्शन करतो त्यांपैकीं एक म्हणजें त्यानें आम्हांला दिलेंली त्याची अभिवचनें. ही अभिवचनें तोफेत वापरला जाणारा दारूगोळा आहेत जीं चिंतेला जन्म देणाऱ्या अविश्वासाला ध्वस्त करतांत. म्हणून, मी कसा युद्ध करतो ती नीति येथे आहे.
माझी सेवा निरुपयोगी आणि व्यर्थ आहे या विषयीं मी चिंताक्रांत होऊन जातो तेव्हां मी यशया 55:11 मध्यें असलेले अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो. “त्याप्रमाणें माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठीं मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडें विफल होऊन परत येणार नाहीं.”
मी माझे कार्य करण्याच्या बाबतीत अशक्त आहे अशी मला चिंता वाटू लागते, तेव्हा मी ख्रिस्तानें दिलेंलें हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते” (2 करिंथ 12:9).
मला भविष्याविषयी निर्णय घ्यायचे असतांत आणि मी त्यांविषयी चिंताग्रस्त असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन” (स्तोत्र 32:8).
जेव्हां मीं माझ्या विरोधकांना तोंड देण्याविषयीं चिंताक्रांत असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?” (रोमकरांस 8:31).
मी ज्यांच्यावर प्रीति करतो त्यांच्या कल्याणासाठीं मीं चिंताक्रांत असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो कीं, मीं वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणें मला समजते, “तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतांत त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल!” (मत्तय 7:11).
आणि मी माझे आध्यात्मिक जीवन स्थिर राखण्यासाठीं स्वतःला हे अभिवचन स्मरण देऊन लढतो कीं ज्याने ज्याने ख्रिस्ताकरितां आपलें घर किंवा भाऊ किंवा बहिणी किंवा आई किंवा वडील किंवा मुले किंवा शेती सोडली आहे, “अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकींबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाहीं” (मार्क 10:29-30).
जेव्हा मी आजारी असण्याविषयीं चिंताक्रांत होतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “नीतिमानाला फार कष्ट होतांत, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो” (स्तोत्र 34:19).
आणि मी थरथर कापत हे अभिवचन स्मरण करतो : “कीं, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाहीं;’ कारण आपल्याला दिलेंल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतिचा वर्षाव झाला आहे” (रोमकरांस 5:3-5).